Skip to main content

अभंग मुक्तछंद

लेखक यकु यांनी बुधवार, 25/01/2012 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
‍रचावा अभंग परि मनी मुक्तछंद चितारु क्षणरंग एकएका अफाट हे जग लोकही अफाट सुटले ते सुसाट दाहीदिशा परि एक जलाशयी जैसे येती जगपक्षी तैसे उतरती जालस्थली रोजरोज अवघे ते विश्व जाली प्रगटले नगास ते नग गेले मिळौनिया बसावे एकजागी कराव्या त्या गोष्‍टी चाखावी समष्‍टी वेद बोले स्थळाचे महात्म्य काय वर्णू मी पामर हरएक जाणे गूज जेव्हा तो सदस्य स्वये झाला जनाचे मनाचे काथ्याकुटी काठ्‍या कविंच्या कविता विडंबिती दुष्‍ट पाककृती शोभा कलेचे दालन गृहे पाकगृहे सोडून सुगरणी आल्या पायाची भिंगरी फिरविते दाही दिशा भटकत येती आश्रया भटकंतीच्या विषय अगम्य प्रतिसाद महान किती कूटगूढरम्य चर्वण चाले करीती वादावादी विषयांतरे मोठी रंगले समस्ती मजा घ्याया प्रतिसादी फेडीती अवघी ती धोतरे कुणाची पितरे धन्य झाली खरडी तैसे व्यनि जाती झडकरी बोलायची चोरी काय सांगू विनोद फळाया जाणा जालभाषा न कळे त्यासी हाय काय कैसे सांगू संपादके टेकीले टेबली ते हात हा हंत ते करीत बैसले की हो मालक ते सुखी गेले वनांतरी येती कधीतरी चुकोनिया हुतात्मे-संन्यस्त पाहती ही शोभा न कळे कोण्‍या भोगा कैसे गेले यारे कधीतरी जाल गाजवाया पुन्हा करु मजा मागे केली ऐसी मजामजा रोजचीच चाले जाल हे गेले दणाणूनी शेवटी शेवटी कलला दिवस चढली ती रात्र थकले ते गात्र अवघियांचे हपिसे मिटली खुरच्या सुटल्या जाल झाले थंड पडा आता थंड रात्रीतरी बैसलो हपिसी रिकामा केव्हातरी रिकाम्या मस्तकी काव्य झाले जैसे मनी आले तेची खरडले फार विचारीले कधी नाही असेल चुकलो काहीबाही बोललो करा आता क्षमा पामरासी
काव्यरस

वाचने 3163
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मस्त रे. संत यशवंत महाराज की जय!!!

In reply to by प्रचेतस

निव्वळ अप्रतिम रे यशवंता....सुरेख रचना !!

आवडला. तुम्हा सर्वाना बिचार्‍या संपादकांची इतकी काळजी आहे हे पाहून अगदी भरून येतंय!

_/\_

मस्त! :)

जैसे मनी आले तेची खरडले फार विचारीले कधी नाही असेल चुकलो काहीबाही बोललो करा आता क्षमा पामरासी नै नै, छान चालू आहे. चालू दे...! :) -दिलीप बिरुटे

यशवंतराव, एकदम झाक काव्य उतरलंय. चालू द्या जोरात!

@प्रतिसादी फेडीती अवघी ती धोतरे कुणाची पितरे धन्य झाली खरडी तैसे व्यनि जाती झडकरी बोलायची चोरी काय सांगू>>>> य.क्कू.शेठ खतम झालो हाय...!