फ्री चा फुगा!
तीन संतूर साबणासोबत एक पेन फ्री अशी जाहिरात बघितली आणि मला वाटले, पेन आणि साबण यांचा काहीएक संबंध नसतांना एकावर दुसरे फ्री नेमके कोणत्या कारणास्तव देत असतील?
बहुतेक तीन साबण वापरून संपले रे संपले की ती साबण वापरणारी महिला वयाने इतकी लहान होऊन जाते की मग तिला नोकरी सोडून शाळेत जावे लागते आणि मग शाळेत जायला पेन नाही का लागणार? तेही स्वत:च्या मुलीच्या वर्गात जाऊन!
त्वचा से उम्र का पता नही चलता! काय कमी समजला की काय तुम्ही साबणाला? मम्मी!! मम्मी??
मागे एकदा टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्र क्लीन आणि क्लियर शाम्पू फ्री द्यायचे रविवारी! मुखपृष्ठाला चिकटवलेला असायचा!
मिसळपाव