महाराष्ट्र माझा

लेखनविषय:
लेखनप्रकार
महाराष्ट्र माझा..' आहाहा!ज्या दिवसांची या महान राकट कणखर महाराष्ट्र देशातील कमीजास्त अंदाजे नवू कोटी जनता (सगळे लाडके लहान थोर धरुन) आतुरतेने वाट पाहत होती तो दिवस आता उजाडला च नाही तर चक्क भरदुपार झाली आहे.आता भर दुपार म्हणलं की चटके बसणारच! आणखीही बसतील,पण फिकीर कुणाला अन् कशाला?आता एवढे सगळे छान छान होत आहे,होणार आहे तर अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष या राकट कणखर महाराष्ट्रातील न.को.ज.(स.ला.ल.थो.ध.)कशाला देईल?

दहीभात...

पुण्यात कुणाकडे कधीतरी दही-बुत्ती हा दहीभाताचा प्रकार ताटात पडला. दही-बुत्ती हे मूळचे दाक्षिणात्य अपत्य असले तरी पुण्यातल्या घरी वास्तव्यास आल्यामुळे साहजिकच "गोssड" झाले होते. पण “यजमान-दाक्षिण्य” दाखवून मी तो भात गोड (न) मानून कसातरी गिळला. एरवी पित्तशामक असणारा दहीभात, पित्त खवळायलाही कारणीभूत ठरू शकतो हे तो साखर परलेला दहीभात खाऊन त्या दिवशी नव्याने उमगले. हिंदुस्तानात भाषावार प्रांतरचना स्वातंत्र्यप्राप्तिनंतर झाली असली तरी "भाता-वार” प्रांतरचना जिथल्या तिथल्या खाद्यसंस्कृतीनुसार फार पूर्वीच झालेली आहे.

पाट्या

लेखनविषय:
पाट्या! जग बदलत चाललं आहे हे वाक्य मला वाटतं वेदांमध्ये सुद्धा असेल कदाचित! म्हणजे प्रत्येक पिढी हे वाक्य कधी ना कधी म्हणतच असते. मी सुद्धा त्याला अपवाद नाही. काय बदललं आहे? तर बरच काही! पण असं असलं तरी काही जुन्या गोष्टी एकदमच दिसून येतात. पण बऱ्याच गोष्टी आठवायला लागतात. त्याच असं झालं की सध्या मला एक नवीनच छंद लागला आहे. सांगतो. पाट्या वाचायचा. मी पुण्यात राहत नाही हे आधीच सांगतो. पाट्या काही फक्त पुण्यातच आहेत असं नाही. मला दुकानांच्या नावाच्या पाट्या वाचायला आवडत आहेत कारण मी नवी भाषा शिकतो आहे.

टुकार कविता: मामीचे गाणे

लेखनविषय:
मामीची अदा पाहा मामींचे गाणे ऐका. मर्दानी आवाज आहे छान छान छान. मामीचे गाणे ऐकून मामाची झोप उडाली. वेश बदलून मामा आता दिन - रात भटकतो. मामाच्या सभेत मामी गायली रिकाम्या खुर्च्यांनी सभा गाजवली. मामीच्या गाण्याला हजारों प्रतिसाद मामी मुळे होतो मामाचाच प्रचार.

अ‍ॅनिमल...नी अंमळ मळ मळ

अ‍ॅनिमल पाहिला आणि लेखणी हाती घेतली. अ‍ॅनि मल की मळ, जे काही असेल ते आणि त्यामुळे झालेली मळमळ उलटी करून टाकावी म्हटले, म्हणजे मन शांत होईल म्हणून हा प्रपंच. सुरुवातीलाच वाईट जोक. कोणी आगाऊ म्हणेल कि मळ बाहेर काढायची दुसरी क्रिया पण असते ती इथे नाही केली याबद्दल धन्यवाद. असो कोटीचा मोह आवरला नाही. मूळ मुद्दा चित्रपटाबद्दल. Violence presented in entertaining way (काही दृश्य सोडली तर ) हे दिग्दर्शक व कलाकार या जोडीने दाखवून दिलं. आणि खरंच, चित्रपटात जेव्हा हाणामारी चालते तेव्हाच बरं वाटतं. फॅमिली ड्रामा येतो तेव्हा बोअरच होतं. तरीपण सध्याचा अति हिंसाचार नाही झेपत आपल्याला .

संगीत प्र(या)वास

लेखनविषय:
अलीकडेच एका मित्रासोबत कुठल्या तरी बुवांच्या गायनाला गेलो होतो. त्यांनी 'केदार'चा एक स्वनिर्मित प्रकार गायला. गायकाचं नाव 'खार'कर असल्यानं बहुधा त्याच्या रागाचं नाव 'झुब-केदार' असं असावं असं माझ्या उगाच मनात येऊन गेलं. पण अर्थात, मला ते मित्राला सांगायचं धारिष्ट्य झालं नाही. उगाच (त्याचं ते आडनाव नसलं तरी) तो माझ्यावर खार खायचा. माझी सांगितिक वाटचाल कशी झाली असं जर कुणी विचारलं तर त्यावर 'अगतिक' हेच उत्तर मला पटकन सुचतं. त्या प्रयासाचं 'प्रागतिक'शी (मात्रा जुळत नसल्या तरी) यमक जुळवायचा त्रास मात्र मला टाळावासा वाटतो. प्रथम, संगीत म्हटलं की सूर आले.

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" - मराठीच्या एका भावी प्रोफेसरची कहाणी.

"ती धावत आली आणि गच्च मिठी मारून मुका घेतला" -- यावरून मला "कदम चूम लूं या, ये आंखे बिछा दूं" या ओळी, आणि लागलीच "आंखों से जो उतरी है दिल मे तस्वीर है इक अनजाने की" " ही गाणी आठवली, मग त्यावरून "तस्वीर तेरी दिल मे जिस दिन से उतारी है" आठवलं आणि त्यावरून मग "दिल विल प्यार व्यार मै क्या जानू रे" हे आठवलं आणि मग त्यावरून आणखी काहीच आठवलं नाही पण तेवढ्यात शेजारच्या गण्याच्या घरात रेडियोवर "पल भर के लिये कोई हमे प्यार करले" हे वाजू लागलं आणि मग "गाता रहे मेरा दिल" वाजत होतं तेवढ्यात गण्या धावत आला आणि म्हणाला "फिरायला चल बे लौकर, बेबी आणि सुम्मी फिरायला निघाल्यात चल पटकन" -- पण मी

'बाट्या' (पुणेकर झालेल्या इंदोरकराची व्यथा)

पेर्णा १: पेर्णा २. ( काटा रुते कुणाला ) 'बाट्या' हव्यात मजला ऐकीत नाही कोणी मिळतील का पुण्यात ठावे कुणास नाही विसरू कशी आता मी इंदोरची ती बाटी पुणे-तेथ कायुणे भलतीच बात खोटी स्वगृही करू पहातो रुजतो अनर्थ तेथे भार्या पुणेकरिण ती हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची बाट्या न खात जगणे मज शाप हाचि आहे हे भाग्य वंचना की काहीच आकळेना आयुष्य ओघळोनी मी रिक्त-पोट आहे.

पौलोमी शची: नवरा माझ्या मुठीत

लेखनप्रकार
एक दिवस माझ्या एका सहकर्मीने त्याची व्यथा माझ्यासमोर मांडली. पगाराच्या दिवशी घरी पोहचताच त्याला महिन्याचा पगार त्याला बायकोच्या चरणी अर्पण करावा लागतो. त्याची बायको ऑफिस जाण्या-येण्यासाठी आणि चहासाठी मोजून जेबखर्ची त्याला देते. त्याला घरी यायला थोडा उशीर झालाकि त्याची बायको आकांड-तांडव करते. कधी-कधी त्याचा तोंडाचा वास ही घेते. त्याला लहान-सहान गोष्टींसाठी तिची संमती घ्यावी लागते. बायकोच्या जाचाला कंटाळून त्याला आत्महत्या करावीशी वाटत होती. सहकर्मीचे गऱ्हाणे ऐकून मी म्हणालो, लेका, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाक. या जगात लग्न झालेले सर्व पुरुष हे त्यांच्या बायकोच्या मुठीतच असतात.
Subscribe to विनोद