(छंद दे)
प्राजूची सुरेख कविता 'छंद दे' वाचली आणि आमची संक्रांत आलीच! ;)
गर्दकाळा वीग भारी, छान थोडा रुंद दे
जीवघेणी ही निराशा, लपवण्याला गोंद दे..
ध्येय नाही फ़ार मोठे जीवनाचे माझिया
केस टकला उगवलेले, पाहण्या आनंद दे..
तेल नुसते भिजवणारे तळपणार्या डोसक्या
चार थेंबानी खुलावे, आगळे 'महाभृंग' दे..
बधिर झाल्या भावना मी लोकलज्जा का धरू?
खवट नजरा झेलण्याला, या शिरी वेखंड दे..
रोज जोडूनी तुटावी ही अशी नाडी नको
केस सारे बांधणारा मज इलॅस्टिकऽबंद दे ..
मी न छोटा, मी न मोठा, ना असे मी बावळा
दर्शनाने चिरतरुण मज, तोच 'देवानंद' दे..
स्तोम नाही कंगव्याचे, केशकर्तन मुळिच ना
खाज 'काका'ची खरी, नवयौवनाचा छंद दे!
चतुरंग
काव्यरस
याद्या
3495
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
हाहाहाहा
ही ही ही!
In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक
हाहाहाहा
In reply to ही ही ही! by रेवती
हीही
+१
In reply to हीही by विनायक प्रभू
मस्त आहे
सुपर- डुपर
बहोत खुब रंगाशेठ
___/\____ सलाम!! -
एक
गर्दकाळा
हा हा..
बर्याच
बर्याच
जबराट...
खी खी
प्रतिसाद