कटोरी
आमची प्रेरणा : मिपावरची अनेक बुडीत खाती , त्यांना मिळालेले उदंड प्रतिसाद आणि प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "फांदी".
........................................ कटोरी ........................................ ही जरा घटना तशी आहे अघोरी! मालकाने आपली भरली तिजोरी! नाव खादाडी असे हे ठेवलेले... सोबतीला टंच अन आहेत पोरी! लोक सामोरे कसे एकेक आले... समजता हाती अता उरली कटोरी! बात फाट्यांची तशी ही ओळखीची... आमचे तू बांधले बिस्तर नि बोरी! जर तुझ्या केलेच होते धन हवाली... का तरी केलीस लेका सांग चोरी? वाचली कर्मे तुझी एकेक जेव्हा... गाठली होतीस तू सगळीच गोरी! आयडीबाहेर काढा ठेवणीतिल... हा अता तुमचा लढा; ही बंडखोरी! आयडी भलतेच बघ चमकून गेले ओकले त्यांनी गरळ समजून मोरी लोक या धाग्यास कंटाळून गेले... "केशवा" तू बंद कर लिहिणे टपोरी - केशवसुमार ........................................ रचनाकाल १४ मे २०१० ........................................लेखनविषय:
याद्या
3780
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
अगायायायायायायायायायायायाया
:-)
ज ब रा!!!
आराराराआर
हुच्च!!! ___/\____
हा हा हा.
मस्त!
आयाय गं..
दंडवत!
"गाठली
नमन
धन्यवाद!
थांबा...
In reply to धन्यवाद! by केशवसुमार
हहपुवा.
लई भारी . .
अशक्य
जबरदस्त. _/\_
साष्टांग
शि सा न
अगायाया!!!