शुक्रवारी एका मित्राला भेटलो. गडी चांगलाच वैतागला होता! त्याला विचारलं-" कावलायस का भावा? शनिवार, रवीवार बी हाफिस हाय काय?" मित्र -" अर एक मराठी पोरग आलय आमच्या कंपनीत." मी-" भावा चांगल हाय की मग!" मित्र-"घंटा! खुळ्या ल@#$च हाय ते." मी-" आयला, आल्या आल्या काय केल भावान?" मित्र - " त्याला ईचारल- तु बी मराठी काय , तर ते म्हणतय - नाही मी पुण्याचा आहे!" ऐकून हसून हसून पुरेवाट झाली. लिहायला एक विषय भेटला!
तसा मी पुन्यात फार कमी वेळ राहिलेलो आणि पून्यातल्या लोकांचा पून्याबाहेरच संपर्क आला. त्यामुळे इथ त्यांच्याबद्दलचे काही समज, गैरसमज आणि काही नसमजलेल्या गोष्टी लिहून त्यांची मजा करन्याचा एक प्रयत्न. जरा अतिशयोक्ती करतोय खरा. पण असो !
खरे पुणेकर कोन? - हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण उत्तर फार विवादस्पद आहे. सदाशिवपेठेला केंद्र मानून एक किलोमीटर त्रिज्येचं वर्तुळ काढा आणि त्रिज्या एक-एक किलोमीटरने वाढवून नवीन वर्तुळं काढत जा ( पुणे महानगर पालि़केची हद्द आली की थांबायच बघा. प्रत्येक वर्तुळाच्या सीमेवरील लोक तुम्हाला सांगतील-" आमच्या वर्तूळातले लोक खरे पूणेकर बाहेरचे लोक नंतर आलेले." आताचं माहीत नाही पण पूर्वीच्याकाळी शनिवार वाडा आणि सदाशिव पेठ ह्यातील अंतर एक किलोमीटरपेक्षा जास्त असणार, कारण पेशवे बाह्रेरून आले होते.
आणि इथ प्रसिद्ध काय तर- सुरेखा पुनेकर आणि बुधवार पेठ, म्हणजे तिथली पुस्तकां ची दुकानं [;)]! आजकाल हवा कशाची आहे तर पूनेरी पाट्यांची! म्हणजे एक तर समोर येवून भांडायचा दम नाही. वर एक पाटी चिकटून देवून निघून जायच. ह्द्द म्हणजे असल्या पाट्या ढ्कल-पत्रातून पाठवून आमच एकोळी वाङ्गमयास कीती मोठ योगदान आहे अस दाखवायचा प्रयत्न! आपल्या भित्रेपणाचं साहित्यीक गौरवीकरण करन्याचा कुटीलपणा ह्यांच्या़कडूनच शिकावा.
संस्कृती: पूणे हे मराठी संस्क्रुतीच माहेर घर मानल जात. तिथ होणारे काही कार्यक्रम बरेच नावाजलेले पन आहेत. पण हीच पूणेकर मंडळी जेंव्हा महाराष्ट्रा बाहेर राहण्यास जातात तेंव्हा चित्र पालटून जातं. बाहेरची जी काही मराठी मंडळ असतात, त्यातले सांस्क्रुतिक विभाग पूणेकरांकड आहेत बर्यापैकी. आणि ह्या लोकांना पुण्याम्ध्ये स्पर्धा खूप असल्यामूळे कलागूण दाखवन्याची संधी मिळत नसनार, म्हूणून एकदा महाराष्ट्रा बाहेर पडल की हे लोक संधी सोडत नाहीत. सगळी पूणेकर मंडळी रंगमंचावर आणि कार्यक्रम पण पूणे आणि संबधीत विषय हयांच्या अवती-भवतीच घुटमळतो. म्हणजे लोक कविता वाचनार ते पण संदीप खरेच्याच! आता ह्या माणसाला काही दणकेदार लिहिता येत नाही का वाचनारे त्याची वाट लावतात ते माहीत नाही. पण त्या कवितावाचन आणि तथाकथित संस्क्रुतिक कार्यक्रम पाहीले की महाराष्ट्रात कोणी मर्द उरला नाही की काय अशी शंका येते. मग मर्दुनकी सिद्ध करण्याची जबाबदारी कोल्हापूरकर आणि नागपूरकर ह्यांना भाषास्वातंत्र्य आणि गरज पडली तर दोन हात करून पूर्ण करावी लागते!
भाषा - अस्सल ( स ला किती स जोडावे लागतात ते माहीत नाही!) मराठी फक्त ह्यांचीच. ह्यांना शाळेत शिकवला जाणारा पहिला समानार्थी शब्द् म्हणजे -" सज्जन = शामळू" हाच असणार. कारण जरा कुठ आवाज करायचा असेल तर - सभ्य माणसानं ह्यात भाग घेवू नये अस म्हणून पळ काढन्यात हे लोक एक नंबर. कुठ वाद विवाद् हरायला लागले की ह्यांच ब्रह्मास्त्र - आवडती म्हण -" गाढवापूढे वाचली गीता.!" बघा म्हणजे कीती उद्धटपणा करायचो तो. ज्ञानेश्वर महाराजांनी पण एवढी हिंमत केली नव्हती. ते पण रेडा वगैरेच्या खाली गेले नव्हते. पण पूणेरी लोकांना आत्मविश्वास प्रचंड- चक्क डायरेक्ट गाढवासमोर गीता वाचन्याचा अट्टाहास. आणि बाहेरच कुणी जर काय बोललं तर ह्यांच लगेच -" शुद्ध मराठीत अस नसतं" हा रेमटा चालू. आज ज्ञानेश्वर महाराज इथ असते तर विचारल असतं- "पूणेरी मराठी देवे केली तर ईतर मराठी काय चोरे निर्मीली?"
बर ह्यांची वर्णनं पन एकदम पूचाट. कोण पूणेरी तरूण नील फीतीच वर्णन कस सांगेल ह्याचा नमुना -"तुम्हाला सांगतो अशी मज्जा आली. चित्रपटातली नगरवधू अशी होती की तिला पाहून चित्रपट ग्रुहातल्या सर्व सदगृहस्थांना अवघड्ल्या सारख झालं." असले न झेपणारे अवघड चित्रपट पाहाण्यास हे सदगृहस्थ का जातात देव जाणे. आणि अपशब्द कुठला तर -"शिंच्या." एकदा पूणेकरान एका नागपूरकरला ही शिवी दिल्यावर त्याला वाटल, बेट्याला सर्दी येवून शिंकतो आहे. त्याने आपुलकीन विचारल-" कुछ लेते क्यों नही? कोल्ड्रीन ली?" ईतर अपशब्दांचं फार सुतक ह्यांना! चार शिव्या हासडल्याकी, जेवायला जरी बसले असतील तरी उठून दुसर्या टेबलावर जावून बसतील. पूर्वीच्या काळी तर म्हणे असा शाब्दीक विटाळ झाला की गोमूत्रान कान धुवून काढत. पण गायी दुर्मीळ झाल्यान आजकाल पंचाईत झाली आहे.
धर्म आणि जात - पूण्यात धर्मभेद हा प्रकार नाही. आणि सगळ्यांची जात एकच कोकणस्थ बामन ( त्यालाच मानवता अस दुसर नाव आहे! देशस्थ का नाही हा खटला नंतर कधी तरी सोडवू). पूण्याबाहेर कुठही जा. मानसान एकदा तोंड उघडला की त्याचा धर्म, जात, भुगोल बर्यापैकी सांगता येतो. पण पुण्यातले इतर हिंदू सोडाच, मशिदीला मौला आणि चर्चमधला पाद्री पन दशग्रंथी बामनासारखेच बोलतात. ( बामन आणि ब्राम्हण हे वेगळे शब्द आहेत ह्याची नोंद घ्यावी. अशुद्ध लेखन झालं आहे असा गोड गैरसमज करून घेवू नका!)
वेषभूषा-
सणासुदीला कुर्ता किंवा शेरवानी असल काही घालून मराठीत गप्पा मारनारं टोळक दिसलकी हे पूणेकर म्हनून ओळखायच. म्रराठी लोक प्रत्येक सणाला दांडीया खेळातात असा लोकांचा समज झाला आहे आता!
आणि पूणेरी स्त्रियांची वेषभूषा हा लहानपनापासून आवडीचा विषय. त्याकाळी आमच्याकडं मुलींनी पंजाबी ड्रेस घालनही अति फॅशनेबल समजल जायचा. अशा काळात एका लग्न समारंभात एक पूणेरी काकू स्लिट स्कर्ट घालून आल्या होत्या. मी आपलेपणान त्यांना सांगितल-" काकू तुमचा फ्रॉक फाटला आहे. शेजारीच शिंप्याच दुकान आहे. जावून शिवून घेवून या!" ह्यावर तिथ उपस्थित महीला मंडळ असं काही हसल की आमच्या मातोश्रींनी पाठीत धप्पा घालून मला सुनावल-" खबरदार असल्या उचापत्या करशील तर पून्हा!" दुसर्यांची मदत केल्याने अस अडचणीत पडत माणूस ह्याची शिकवण मिळाली.
पूढ काही वर्षानी हाय्स्कूल मध्ये असताना एक कन्या तिच्या बाबांची बदली होवून आमच्या गावी आली. ती सर्रास जीन्स घालूल यायची. अशाच एके दिवशी " अरे आज तिचे बाबा गावाला गेले आहेत ना म्हणून" असा विनोद करून मित्र मंडळ खिदळत असताना बाईंनी एकल्यानं हातवर छड्यांचा पावूस पडला होता.
त्यानंतर पूढ काही दिवस पूण्यात राहण्याचा योग आला! मित्रांबरोबर एफ. सी रोड्ला गेलो. तिथली फॅशन बघून अजूनच गोंधळ. एक कन्या टाईट टी शर्ट घालून आली होती आणि त्यावर छातीवरच काही तरी बांधल होत. ह्या पूण्यातल्या पोरी आतलं बाहेर का घालतात असा एक निरागस प्रश्न मनात आला.
फॅशनचे अजून काही नमुन:-. डोक्यावर फकीरासारख काही तरी बांधायच. हे भले मोठले लांबलचक मोजे हातात घालायचे आणि डोळ्यावर बच्च्न गॉगल घालून गाडीवर बसायच. म्हणजे एक्दम घोड्याच्या ढापण्या लावलेल्या म्हशीवाणी! ह्यांना बिन बाह्याच्या अंगरख्याच काय इतक अप्रूप देव जाणे. अजून दहावीस रुपये जास्त दिले तर फुल बाह्याचा अंगरखा नाही का मिळणार आणि वर लांबलचक मोज्यांचा खर्च देखील वाचेल. ;) ह्या मूली दिवसेंदिवस जास्त चालू व्हायला लागल्या आहेत. इकड मराठी मंडळातील एक कन्या आल्या आल्या अध्यक्षाबरोबर फिरायला लागली. पूढ ती नवीन अध्यक्षा बरोबर दिसू लागली अस तीन वर्ष झाल. म्हणजे बघा आपण आनंदी बाईंना उगाच नावं ठेवतो. तिन तर फक्त राघोबाला पेशवा बनवण्याचा प्रयत्न केला होता. आणि ही तर जो पेशवा होईल तोच माझा राघोबा असं म्हणत होती ;)
योगदान- पूण्याबाहेर महाराष्ट्रात हल्ली जो काही ब्राम्हण द्वेष निर्माण झाला आहे, त्यात पूणेरी लोकांच मोठं योगदान आहे. हे लोक आपल्याकढं सुट्टीला कोणी पाहूणे येण्याआधी, उन्हाळ्याच्या सुट्टीत सर्व पाहुणे मंडळींकड रहायला जातात. तिथ काही ना काही किडा करून अस्सल मराठी भाषेत भाषणबाजी करून येतात. पुण्याबाहेर असल मराठी फक्त ब्राम्हणच बोलत असल्यामुळे, हे बेणं बामन हाय असा भोळ्या जनतेचा समज होतो.
असो- पूणे तिथे काय ऊणे ? - माणुसकी.
ह्यांची विनोदबुद्धी आता प्रतिक्रियांमध्ये दिसेलच!
अवांतर- अशुद्ध ले़खनाची आता काळजी नाही. ध चा मा अशा सुधाराणा करण्याचा सराव असल्यांमुळे सगळ ठीक होईल अगदी शीर्षकासकट :)
वाचन संख्या
9873
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुण्याचं व्यक्तीमत्व उठून
वाद नाही
In reply to पुण्याचं व्यक्तीमत्व उठून by शुचि
खरय मी पुणेकर असले तरी अगदी
In reply to वाद नाही by रन्गराव
जळल्याचा वास आणि धुर आला.
काहिहि म्हना पन जे कै लिवल
नशीब दुसर्या कोणत्या शहराबद्दल लिहिले नाही!
अजुन अस्स्सल पुणेकरांच्या
मस्त..
निषेध. सविस्तर पंचनामा
आजच्या दिवशी आपल्या
हेहेहे!
In reply to आजच्या दिवशी आपल्या by रेवती
प्रियाली शी बाडिस
In reply to हेहेहे! by प्रियाली
प्रतीसादांच्या हव्यासापोटी हा
छान!
कशाला इतके लांब उत्तर
In reply to छान! by समीरसूर
छे ब्वॉ अजिबातच विनोदबुद्धी
In reply to छान! by समीरसूर
जाउदे नको एवढा त्रागा..येडे
In reply to छे ब्वॉ अजिबातच विनोदबुद्धी by मृत्युन्जय
बरोबर
In reply to जाउदे नको एवढा त्रागा..येडे by Dhananjay Borgaonkar
अरे व्वा
In reply to छे ब्वॉ अजिबातच विनोदबुद्धी by मृत्युन्जय
मी कुठे विनोद केला ब्वॉ? तो
In reply to अरे व्वा by रन्गराव
सुंदर !लेखन आपल्या
सहमत आहे. मी पण विवेचन
In reply to सुंदर !लेखन आपल्या by परिकथेतील राजकुमार
+१ बाडिस शी सहमत आहे
In reply to सहमत आहे. मी पण विवेचन by अवलिया
नाना, पराशी सहमत. लेखकाने
In reply to सहमत आहे. मी पण विवेचन by अवलिया
छ्या काय रे परा तुझ्याकडे
In reply to सुंदर !लेखन आपल्या by परिकथेतील राजकुमार
अकलेचे तारे तोडणे
लेख फारच मनावर घेतलेला
In reply to अकलेचे तारे तोडणे by प्रियाली
उगी उगी रन्गुबाळा
In reply to लेख फारच मनावर घेतलेला by रन्गराव
अरेच्चा!
In reply to लेख फारच मनावर घेतलेला by रन्गराव
फाट्यावर
फाट्यावर मारा पण चौफुल्याच्या
In reply to फाट्यावर by नावातकायआहे
फाट्यावर मारा पण चौफुल्याच्या
In reply to फाट्यावर मारा पण चौफुल्याच्या by मालोजीराव
चौफुल्या चा चुकीचा अर्थ घेतलात !
In reply to फाट्यावर मारा पण चौफुल्याच्या by सुहास..
या लेखाचा ऊत्तरायणरूपी
जरा हळू
In reply to या लेखाचा ऊत्तरायणरूपी by सुहास..
कुठे "न" वापरायचा आणि कुठे
तुम्ही टारझन ला ओळखता काय हो
In reply to कुठे "न" वापरायचा आणि कुठे by Dhananjay Borgaonkar
मला खुप वेळा फाट्यावर मारयची
In reply to तुम्ही टारझन ला ओळखता काय हो by सद्दाम हुसैन
पॉपकॉर्न
हॅ हॅ हॅ
रग्णराव ..... तुम्हि
शुद्ध पुणेरी भाषा वाचून मन
In reply to रग्णराव ..... तुम्हि by Raju S