Skip to main content

विडंबन

मर्कट फोटोग्राफीचा एक प्रयत्न

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 27/04/2011 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
शरद व स्पा यांच्या धाग्यामुळे मीहि खूप प्रभावित झालो, आणि नुकतेच माथेरानला काही काढलेले फोटो उकरून बघितले... ;) त्यात मला पण अस वाटल कि होय, मी सुद्धा काही हटके फोटो घेतलेले आहेत.. डकवतोय बघा आवड्तायेत का? माथेरानच्या लुईझा कडेटोकावर बसलेले हे मर्कट, उन्हातान्हाचे वैतागलेले, उदास भाव असलेले. हे एक छोटे कुटुंब. दंगा चालला होता यांचा.

चष्मा असुनी दिसले नाही -

लेखक विदेश यांनी मंगळवार, 26/04/2011 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले - ) चष्मा असुनी दिसले नाही - रस्त्याच्या पलीकडले , प्रथम तुला पाहियले ; पाउल खड्ड्यात कसे पडले ? शर्ट नवा मी खास घातला - पँट नवी, अन् चष्माहि नवा ! त्या दिवशी का प्रथमच माझे बूट सांग अडखळले ? आवडते कपडे त्या रात्री ; खड्ड्यातच फाटले किति तरी ... परीटघडीच्या त्या कपड्यांचे रफू न मज परवडले !

पोटपाल

लेखक तिमा यांनी बुधवार, 20/04/2011 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोणा एका राज्यात भ्रष्टाचार अतोनात माजला होता. राजा देखील या मलिन प्रतिमेमुळे अतिशय त्रस्त झाला होता. पण त्याच्या भोवतीचे कोंडाळे, प्रधानजी, राजाच्या पूर्वजांनी अनेक वर्षे पोसलेले वतनदार या सगळ्यांपुढे तो काहीच करु शकत नव्हता. स्वतः साधे रहाणे यापलिकडे तो लोकांसमोर कुठलाही आदर्श ठेवू शकत नव्हता. प्रजा ही एके काळी साधी होती. परन्तु सततच्या भ्रष्टाचारामुळे तीही अशा गोष्टी गृहीत धरु लागली होती. संपूर्ण लोकसंख्येमधे अतिशय स्वच्छ चारित्र्याचे फारच थोडे लोक राहिले होते. ज्यांना कुठे ना कुठे हात मारता येत होता ते यथेच्छ ओरपत होते. ज्यांना संधीच मिळत नव्हती ते नाईलाजाने प्रामाणिक राहिले होते.

[पेग घ्यायची ओढ लागली]

लेखक निनाद यांनी बुधवार, 20/04/2011 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
पाषाणभेदाची क्षमा मागून एक टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन सादर करत आहे. [पेग घ्यायची ओढ लागली] नकोच आता दुर सुराही पेग घ्यायची ओढ लागली ||१|| पत्ते वाटा बसू गच्चीवर नसे कुणाची दृष्टी तेथवर ||२|| ओळखीच्यांना उधार दिली माज करत ती सांडवत नेली ||३|| वायू परिचीत नाकास लागला टुरटुर आवाज देवूनी गेला ||४|| नजरेच्या टापूत आले समोर मारून फेकले लाटणे तोवर ||५|| पत्यांच्या खेळात कुरुकुर झाली जुन्या उधारीची आठवण आली ||६|| गेमच कसला असला नसता मुकाट पत्ते पिसणे आता ||७|| पेगही पुरले भेळही सरली 'आत' जायची ओढ लागली ||८||
काव्यरस

फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा -

लेखक विदेश यांनी रविवार, 17/04/2011 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : देहाची तिजोरी - भक्तीचाच ठेवा ) फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ? नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची , तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची - सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ?
काव्यरस

कार्ट्यांस...

लेखक नगरीनिरंजन यांनी शनिवार, 16/04/2011 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरच्या सर्व कार्ट्यांस समर्पित. (चालः चल री सजनी अब क्या सोचे) लिही रे भावा तू अपुल्या मनचे डोहाळे कशाला प्रतिक्रियांचे लिही रे... टाकून खरडी भिक्षा मागणे जमवून कंपू गोंधळ घालणे असं काही ऽऽ करू नकोऽऽ, करू नकोऽ रे लिही रे... असेलही तुझी लेखणी धमाल करिती इथले सगळेचि लाल स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽऽ, स्वतःचीऽच रे लिही रे... लिहीले जरी तू ओतुनि तनमन गेले जरी पुढच्या पानी ते पटकन दबलेलाऽ कोळसाऽ तो होईल हिरा रे लिही रे... जुन्या जाणत्यांचे लागावे चरणी आतल्या गोटात लावावी वरणी भाषा नाहीऽ शैली नाहीऽ पीआर हवा रे लिही रे...

मुन्नी बदनाम- एक रसग्रहण

लेखक प्यारे१ यांनी मंगळवार, 12/04/2011 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांनो, आज आपला रसग्रहणासाठीची कविता आहे 'मुन्नी बदनाम हुई' काही चहाटळ लोक तिला आयटम साँग देखील म्हणतात. आपण त्याकडे दुर्लक्ष करु. म्हणतात ना हाथी चले अपनी चाल.... तर थोडी माहिती. गीत- मुन्नी बदनाम हुई' चित्रपट - दबंग्ग संगीत - ललित सेन ( जतिन ललित मधला) हे पद्य मुख्यत्वे सलमान खान, मलायका (इतर उच्चारही आहेत) अरोरा खान आणि सोनू सूद यांवर चित्रित केले गेलेले असून इतर वडापाव( नीट वाचावे) वालेही कवायत करताना दिसतात. मुख्य तेवढ्याच मुद्द्यांचे रसग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करुया.
काव्यरस

वाच वाचुनी अति मी दमले -

लेखक विदेश यांनी रविवार, 10/04/2011 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : नाच नाचुनी अति मी दमले -) वाच वाचुनी अति मी दमले - विटले रे कवितेला ! कविता-लेखन तुज न झेपले , निमुटपणा ना कसला ! आजच कचरा-कुंडी-स्थानी सफाईवाला आला ! निरुपयोगी कविता-कागद रद्दी घातली त्याला ! विषय आज ना काही सुचेना , अती ताप तो झाला ! अजब तुझ्या त्या छंदापायी , सुसंवाद ना घडला ! रोख मानधन... नाही काही - मजवर राग का धरला ? स्वत: दुजांच्या घेता फिरक्या - अंगलटी त्या आल्या ! कवितेतील मज काव्य कळेना... कागद वाया गेला ! अंधारी ही डोळ्या पुढती - जीव वाचना भ्याला !!

एक त्रागा सुनेचा

लेखक विदेश यांनी मंगळवार, 05/04/2011 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : एक धागा सुखाचा -) एक त्रागा सुनेचा , शंभर त्रागे सासूचे - घरोघरी हे चित्र माणसा , तुझिया संसाराचे ! तू असशी जरी कर्ता तगडा , सासू सुनेचा बघशी झगडा - सुटकेसाठी करशी नाटक - तूच आजारांचे ! उचलबांगडी बालपणाची , धुळीत स्वप्ने तारुण्याची - जीर्ण माय मग उरे शेवटी - अजीर्ण अर्धांगीचे ! सासू सुनातें बघतो कोणी , एक सारखी बसती फुगोनी - कुणा न दिसले , भांडणात त्या - हाल बिचाऱ्याचे !
काव्यरस