Skip to main content

फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा -

लेखक विदेश यांनी रविवार, 17/04/2011 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : देहाची तिजोरी - भक्तीचाच ठेवा ) फोडली तिजोरी - लुटला सर्व ठेवा पकडणार चोरांना त्या - पकडणार केव्हा ? नसे दूर चौकी इथुनी फार पोलिसांची , तरी चोरटयांच्या नाही भीती मुळी त्यांची - सरावल्या चोरांनी का दंड थोपटावा ? उजेडात होते पहाणी - अंधारात साsssफ चोरट्यांच्या हाती लागे द्रव्य ते अमाप - दक्ष पोलिसांची कैसी नसते गस्त तेव्हां ? फार्स जणू जप्तीकरता - कायदा कचेरी आपुलीच वर्दी होते आपुलीच वैरी - माल मनी तो जप्तीचा सत्वरी मिळावा !!
काव्यरस

वाचने 1786
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया