Skip to main content

विडंबन

जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा...

लेखक विदेश यांनी मंगळवार, 05/07/2011 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : गंगा जमुना डोळयात उभ्या का -) होंडा इंडिका थाटात उभ्या का जा मुला जा, तिच्या घरी तू सुखी रहा... |धृ | कडकडुनी तू मिठी मारता, डोळे माझेपण झाले ओले, चुकवित तोंड बळे आठवले सारे सारे गहाण ते गाळे तुज कर्जाचे भय न संगती, जा |१| जा मुला जा.... श्रीमंत उभी सासरा नि सासू जोडी बघ धूड सासुचे हसले तोंड ती वेंगाडी पूस रे डोळे या सदऱ्याने - आवर ती जाडी रूप दर्पणी नसे देखणे, जा |२| जा मुला जा.... आय.टी.ची ती सून वाढत्या पगाराची जमले तिचे रे कैसे तुजवर लव्ह - लफडे हटू नकोस मागे मागे काम कितीही पडे नकोस विसरू धुणि-भांड्याला, जा |३| जा मुला जा....

(हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद).

लेखक नितिन थत्ते यांनी सोमवार, 27/06/2011 14:37 या दिवशी प्रकाशित केले.
. . . प्रेरणा आज ओळख करून घेऊ, भारतात जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व हिंदूंना एकत्र आणणारी विश्व हिंदू परिषद. इतिहासात पाहिले असता, महात्मा गांधींच्या खुनानंतर हिंदुत्ववादी लोकांना भारतात तोंड दाखवायला जागा उरली नाही. त्यांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सर्वसामान्य हिंदू घटनेत समावेश केलेल्या पुरोगामी तरतुदींकडे आकृष्ट होऊ लागला होता. पुराणमतवादी हिंदुत्ववाद्यांना असलेला हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी नेहरूंच्या मृत्यूनंतर लवकरच स्वामी चिन्मयानंद यांनी विश्व हिंदू परिषदेची स्थापना पवई मुंबई येथे १९६४ मध्ये केली.

संथ पाडते गझला बाई ....

लेखक विदेश यांनी गुरुवार, 23/06/2011 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
(चाल : संथ वाहते कृष्णामाई ....) संथ पाडते गझला बाई - गझलेवरच्या प्रतिसादांची जाणिव तिजला नाही |धृ | संथ पाडते .... कधी न कामें करी लौकर ती , कूर्मगतीने सदा करी ती ; बॉसगिरीची काही पर्वा नाही तिज ठायी |१| संथ पाडते .... कुणी पुरे ना म्हणती गझला , कुणी वर्णिती उच्च गेयता ; मात्रागणाची करून जंत्री - मोजित कुणी राही |२| संथ पाडते .... सतत चालते काव्य-टंकणी , होई न व्यनितुनी बाई शहाणी ; वाचकास ही व्हावी कैशी , सांगा सुखदायी |३| संथ पाडते ....
काव्यरस

[कथा एका यशोगाथेची]

लेखक चिरोटा यांनी सोमवार, 20/06/2011 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
स्फूर्ती-http://www.misalpav.com/node/18334 (जयनीत ह्यांची माफी मागून) त्याला नेहमी पासूनच खूप खूप मोठं होण्याची इच्छा होती, पहिले त्यानी छोट्या कंपनीत धडपड करून बघितली, पण जमलं नाही. मग विप्रो,ईन्फी मध्ये खटपट करून बघितली, पण त्याच्या programs ना कोणी programs म्हणेना, आणि design ला ही दाद मिळेना. स्वतः शिवाय कधी दुसरा विचारच केला नसल्या मुळे testing पण करता येईना. मग प्रोजेक्ट मॅनेजमेन्टमध्ये हातपाय चालवून बघितले. CMMi,PMP वगैरे भानगडी त्याला कधी पटल्याच नाहीत, त्याला स्वतःलाच CEO व्हायचे होते.

([ज्योतिष] दिनांक १ जुलै २०११ रोजीचे अभद्र प्रोडक्शन रिलिज)

लेखक धन्या यांनी सोमवार, 20/06/2011 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १ जुलै २०११ रोजी हिंजवडी आयटी पार्कात फेज २ मध्ये प्रोडक्शन रिलिज होत असून हे प्रोडक्शन रिलिज क्लायंट, प्रोजेक्ट मॅनेजर आणि डेवलपमेंट टीम बरोबर केंद्र योग करते. त्यात क्लायंट बरोबर होणारा केंद्रयोग अत्यंत तीव्र स्वरुपाचा आहे. याशिवाय हे प्रोडक्शन रिलिज पोस्ट डिप्लॉयमेंट सपोर्ट टीम बरोबर प्रतियुती करते.

(वडा म्हणे मढ्याला)

लेखक प्रभो यांनी शनिवार, 18/06/2011 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा : कोणत्याही जातीवर चिखलफेक करण्याचा इरादा नाही. इनो घेऊन विडंबन वाचावे ही विनंती. प्रेरणा , वडा म्हणे मढ्याला, 'भलताच खास आहे' भात आहे बासमती, त्याचीच रास आहे. केले आहे पिंड, ठेवले आहे नदीकाठी अगं म्हशी, पण त्याला शिवणार कावळाच आहे. करे कधी सव्य अन कधी अपसव्य असे ते जानवे त्याला नेहमी हवेच आहे. दानं, फळे, सुपार्‍या अन् दक्षिणा भटाला, (जाणारे)पैसेच फक्त माझे? हा शुद्ध माज आहे!

लेखक बोलला..

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 17/06/2011 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा - http://misalpav.com/node/18275 -- वड बोलला यमाला लेखक बोलला संपादकाला ' हा काय पेच आहे ?' उडवावयला धागा का मी एकटाच दोड्का आहे ? धागा इथे काढावा, खरडी जरा कराव्या वाचकांस त्या म्हणावे ' मी पण नवाच आहे' जो आय्डि कंपुबाजी करण्यास वापरावा ऐसा अजुन एक डुआय्डि हवाच आहे प्रतिसाद,खरडी अन व्यनि फक्त ज्येष्ठां वाचने फक्त माझी, हा शुद्ध जाच आहे अमरता अन अभय मिळु दे मम धाग्यास आता मगच सांगेन आय्डि हा, माझा सातवाच आहे ५० फक्त ही इथली एंट्री आहे..(म्हणजे मी इथं तरी नवा आहे)
काव्यरस

(पाव्हनं चला, झाडावरती बसू !)

लेखक केसुरंगा यांनी बुधवार, 15/06/2011 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
वेताळणीनं वेताळाला सांगितली गोष्ट अन मग आमीबी म्हनलं जरा गुलुगुल बोलूयात पावन्यासंगं..... ;) वाद असे बहरात वाचका, तुम्ही नका ना रुसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! बघा थेरडा मेला 'घोडा' शिव्या हासडून मारा जोडा लाज संस्कृती सारी सोडा उगा वाटतं खूप लिहावं नकाच काही पुसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! काढिल खोडी नव्या दमाच्या पुचाट गप्पा स्वातंत्र्याच्या स्टोरी सांगिल वेताळाची जरा मोकळ्या ह्या जालावर खविस नागरी हसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! तीन गटांची थेरी मांडा जुन्या दुव्यांची घेउन खांदा हलक्या हाताने काड्या घाला अता खातरी ही शतकाची पब्लिक लागं फसू पाव्हनं चला, झाडावरती बसू ! -केसुरंगा
काव्यरस

(येस , वी आर...)

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 10/06/2011 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
काल अगदी असंच मला तो नेसकॅफेवर कॉफी पिताना भेटला मी "मी पाटील" म्हणताच, "मी नातलग" काहीसं तो म्हटला माझं सारं बोलणं तसं अगदी पुर्णपणे ईंग्रजीतून चालू होतं तो मात्र मराठी आणि ईंग्रजी दोन्हींची काशी घालताना दिसला माझ्याच वयाचा, पण "सार्‍या जगाचं ओझं माझ्या खांदयावर" असं शब्दाशब्दाला भासवणारा, मला जरा तो आगाऊच वाटला पोरगा नक्कीच सुखवस्तू अन खात्यापित्या घरातला असावा "मोबाईल, गाडीचा" अभिमान त्याच्या चेहर्‍यावर होता साचला म्हटलं माझ्या मित्रा, तू तेविसाव्या वर्षी आयायटीचा प्रोफेसर हो अगदी त्या सिकंदरासारखं जिंकण्याची उर्मीही तुझ्यात असू दे "Confidence.