Skip to main content

[पेग घ्यायची ओढ लागली]

लेखक निनाद यांनी बुधवार, 20/04/2011 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
पाषाणभेदाची क्षमा मागून एक टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन सादर करत आहे. [पेग घ्यायची ओढ लागली] नकोच आता दुर सुराही पेग घ्यायची ओढ लागली ||१|| पत्ते वाटा बसू गच्चीवर नसे कुणाची दृष्टी तेथवर ||२|| ओळखीच्यांना उधार दिली माज करत ती सांडवत नेली ||३|| वायू परिचीत नाकास लागला टुरटुर आवाज देवूनी गेला ||४|| नजरेच्या टापूत आले समोर मारून फेकले लाटणे तोवर ||५|| पत्यांच्या खेळात कुरुकुर झाली जुन्या उधारीची आठवण आली ||६|| गेमच कसला असला नसता मुकाट पत्ते पिसणे आता ||७|| पेगही पुरले भेळही सरली 'आत' जायची ओढ लागली ||८||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2341
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

निनाव- गेमच कसला असला नसता मुकाट पत्ते पिसणे आता ||७|| पेगही पुरले भेळही सरली 'आत' जायची ओढ लागली ||८|| छान .चव मस्त वाटली !!

अतिशय हा शब्द विसरलात का? खरोखर 'एक अतिशय टुकार आणि 'शब्द करूण' विडंबन' हे योग्य वाटते.