Skip to main content

....... इथले संपत नाही

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 05/12/2014 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
(कवी ग्रेस आणि त्यांच्या असंख्य चाहत्यांची जाहीर माफी मागून.) थोडासा वेगळा प्रयत्न आहे, मूळ कवितेतील कमीत कमी शब्द बदलून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. मूळ कवितेत ५४ शब्द होते. एकूण शब्दसंख्या तशीच ५४ ठेवीत त्यातले फक्त १२ शब्द बदलून उर्वरीत ४२ शब्द तसेच ठेवून विडंबन साधण्याचा प्रयत्न केलाय. कितपत जमलेय ते सांगा. चणे इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते मी संध्याकाळी गातो, तू मला शिकविली गीते ते झरे मधुशालेचे, तो टेबल फसवी माया नाल्याशी निजलो आपण, नाल्यात पुन्हा उगवाया तो कोक थंड हळवासा, आयुष्य स्पर्शूनी गेला होस्टेलच्या वनवासातील, जणू अंगी पदर ओला स्तोत्रात इंद्रीये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे हे सरता संपत नाही, चादणे तुझ्या स्मरणाचे Enjoy Friday Evening!! मित्रहो http://mitraho.wordpress.com
लेखनविषय:

वाचने 2974
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

किमान शब्द-बदलात कमाल विडंबन! कठीण काम होतं पण चांगलं केलं आहे :-)

In reply to by दिपक.कुवेत

अगदी प्रकाशित करा ह्यावर क्लीक करेपर्यंत विचार करीत होतो काय योग्य. जणू अंगी पदर ओला कि जणू तिचा पदर ओला. शेवटी अंग ठेवले कारण कवितेच्या लयीत तेच बसत होते.