Skip to main content

( हे चिकन मस्त आहे )

लेखक अमोल केळकर यांनी सोमवार, 21/07/2008 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
इथे दिलेली चिकनची पा.कृ. पाहिली आणि हे गाणे सुचले. चालः 'चौकर राजा" मधील गाणे "हे जीवन सुंदर आहे." ----------------------------------------------------------------------- हे चिकन सुंदर आहे !! धृ !! निसर्ग धाबा हायवेवरचा अन् मित्रांची पार्टी ! रसात बुडल्या तंगड्यांना चापायाची घाई !! (अहो विसरा हे सगळ. एथं सगळेच विचित्र. वर कोंबड्या चिकनगुनियाने त्रस्त. सोबतीला ही प्रचंड महागाई !!!) पापलेट, बोंबील , वडे , खिमा हेही मस्त आहे ! हे चिकन सुंदर आहे !! १!! तांबडा रस्सा कोल्हापुरचा अन तंदुरी रोटी ! ग्लासातल्या फेसासंग जेवण मस्त होई !! कांदा मिरची, सॅलेड, लोणचे साथ साथ आहे. ! हे चिकन सुंदर आहे !! २!! -----------------------------------------------------------------------
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2011
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

चागलं विडंबन केलंत्...लगे रहो. सुंदर च्या ऐवजी 'रूचकर' शब्द वापरलात तर?