(तनःशांती!)
ॐकारशेठचा 'मनःशांती' चा शोध वाचला आणि आम्हाला पूर्वीचे अथक प्रयत्न आठवले! ;)
तनःशांतीचा शोध घेत होतो
रात्रंदिवस
'फिटनेस'वर शोधले,
'वेटलॉस'वर आलो जाऊन
'बुलवर्कर' धुंडाळले
'टर्बो बॅग' काढली बुकलून
'केक' पाहिले बदलून
'लो कॅलरी'ही शोधत राहिलो
'ट्रेडमिल' झाले फिरवून
'स्पिनिंग' करत फिरलो
निवांत क्षणी एका
लकाकले डोळे, फिटली भ्रांती
'लॅपटॉप' वर कोक-बर्गर आला
सापडली तनःशांती!
'भार'नियमनाचा मला कळलेला
हा एकमेव फायदा
बाकी तीच झोप, तेच घोरणे
आणि तोच वायदा
चतुरंग
वाचने
3844
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
हाहाहाहा!
लॅपटॉप = ??
In reply to लॅपटॉप = ?? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
'लॅपटॉप'वर = मांडीवर
मस्त...
झक्कास
प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट !
छान!
In reply to छान! by कोलबेर
येस!
सही
वा वा