Skip to main content

वावर

सुट्टे पैसे

लेखक सुमित_सौन्देकर यांनी शनिवार, 22/08/2015 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वेच्या तिकीट खिडकीवर भली मोठी रांग लागली होती. १५ मिनिटे गेली त्याला पुढे पोहचायला. या वेळेत मागे उभ्या असलेल्या आजोबांची कुरकुर कित्येकदा कानी आली. स्वताच तिकीट काढून उरलेले सुट्टे पैसे घेण्यासाठी थांबला. इतक्यात शेजारचा संवाद कानी आला..... ''अहो आजोबा २ रुपये सुट्टे दया'' नाहीत हो माझ्याकडे सुट्टे कुठून आणू? ''मग घेऊन या सुट्टे बाहेरून'' आजोबा हताश नजरेने आजूबाजूला पाहत होते, याचवेळी त्याला खिडकीतून त्याच्यासाठी पुढे केलेले पैसे दिसले.. ''एक काम करा यांना तिकीट दया त्याचं..हे सुट्टे तुम्हीच ठेवा.....अस बोलून क्षणात निघून सुद्धा गेला तो.....

कांहीही ह श्री ! (गुळगुळीत वाक्प्रचार)

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 11/08/2015 05:41 या दिवशी प्रकाशित केले.
टीव्ही मालिकांमध्ये पात्रे खूपदा तीच ती वाक्ये म्हणत असतात . आधी मला वाटायचे, की पाणी टाकून वाढविण्याचाच तो एक प्रकार आहे. पण थोडे निरीक्षण केल्यावर लक्षात आले, की प्रत्यक्ष जीवनात देखील आपण तीच ती वाक्ये बोलत असतो. उदाहरण म्हणून कुठलेही कडाकडा वाजणारे भांडण ऐका. जिथे आपले म्हणणे दुसऱ्याला पटवून देण्याचा कोणी प्रयत्न करीत आहे. एक कारण जर पटले नाही, तर काही नवीन तर्क मांडावा की नाही?

सिर सलामत तो ...(परदेशकथा)

लेखक मंदार कात्रे यांनी सोमवार, 10/08/2015 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
(** देशाचे नाव देणे हेतुपूर्वक टाळले आहे. ) शाहिद ने विमानातळावरून कराचीच्या विमानात बसल्यावर सर्वप्रथम अल्लाहतालाचे आभार मानले “या खुदा शुकर है तेरा की तूने जिंदा निकाला मुझे इस जहन्नम से! मै शुक्रगुजार हू तेरा!...........” बरोबर दोन वर्षापूर्वी तो इथे आला होता . पाकिस्तानमध्ये मॅट्रिकपर्यन्त शिक्षण कराचीजवळच्या एका छोट्याशा गावात झाले होते. शेजारचे अनेक मित्र आखाती देशात कामाला होते . मग स्वप्नाळू शाहिदलाही आखाती देशात जाण्याची स्वप्ने पडू लागली. मग अब्दुलचाचाच्या ट्रकवर क्लीनर म्हणून काम करू लागला आणि वर्षभरातच तो ट्रक चालवू लागला.

पळसधरी (पुण्यनगरी) कट्टा वृतांत

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 09/08/2015 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
(काट्याचा वृतांत लिहिणे हा प्रांत नसताना आणि अंगावर जबाबदारी पडून कसातरी लिहिला आहे , डॉक्टर ,मूवी , कंजूस आणि माप ह्यांनी अजून छायाचित्र क्षण चित्रे / किस्से जरूर टाकावेत) रविवारी सकाळी भल्या पाहते मऊ दुलईतून खिडकीबाहेर पाहिले अजूनही अंधारलेल होत पाउस अगदी कोसळत होता समोरचा येउरचा डोंगरही ढगात लोपला होता , परत मस्त ताणून देऊ का ह्या विचारात होतो इतक्यात लक्ष्यात आल अरे आज "पळसदरी कट्टा" , त्या तीन दिवस आधी डॉक्टर खरेंनी "काय आप्पा" कट्ट्यावर आमंत्रण दिल होत आणि त्यांना सांगूनही टाकल होत येतो म्हणून !!

आमची 'कर्म'फळे

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी गुरुवार, 06/08/2015 23:08 या दिवशी प्रकाशित केले.
नुक्ताचं बुवांना भेटलो. त्याचा आफ्टरइफेक्ट =)) आमचा पेर्णास्त्रोत:माझी मुक्ताफळे मुळ कवितेचा आशय खरचं खुप सुंदर आहे. पण हाताची खाज अगदीच नं आवरली गेल्याने धागाकर्त्याची माफी मागुन.
काव्यरस

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

लेखक एस यांनी मंगळवार, 04/08/2015 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

मराठी विकिपीडियावरून स्वांतत्र्य दिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी

लेखक माहितगार यांनी रविवार, 26/07/2015 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, ऑगस्ट महिन्यात मराठी विकिपीडियास सर्वाधीक वाचकांच्या भेटी मिळतात. या कालावधीत नवनवीन सदस्यांना मराठी विकिपीडियाशी जोडण्यासाठी आणि लिहिते करण्यासाठी काही वेगळे करून पहाण्याचा मानस होता आणि आहे. या वेळी स्वांतत्र्य दिवसा निमीत्त मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत फारसे लेखन न केलेल्या लोकांनी दिलेले - म्हणजे तुमचे स्वतःचे शुभेच्छा संदेश ठळक पणे प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. उद्देश हाच कि लिहिण्याच्या फारशा अटी ठेवायच्या नाही आणि काय लिहू हा प्रश्नही कमीत कमी ठेवायचा. आजकाल प्रत्येक प्रसंगी प्रत्येकाला हॅप्पी...

कोकणात रबर लागवड - भाग २ (जमीन खरेदी)

लेखक चलत मुसाफिर यांनी शुक्रवार, 24/07/2015 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला भाग कोकणात रबर लागवडीचा विचार आहे ---- पहिला भाग हा नोव्हेंबर २०१४ मध्ये, बहुधा काथ्याकूट सदरात टाकला होता. दुसरा भाग टाकायला बराच विलंब होत आहे. कारण आमचा उपक्रमही वेळखाऊ आहे. योजलेल्या वेळापत्रकाप्रमाणे काहीही होत नाहीये आणि खोडे घालणारे लोक/घटक विपुल आहेत. असो. मागील भागात सांगितल्याप्रमाणे आमचा बेत, मार्च २०१५ मध्ये एकूण २० एकर जमीन खरेदी करायची, मे महिन्यापर्यंत जमिनीत माजलेल्या जंगलाची सफाई करून घ्यायची आणि जून २०१५ मधे पहिला पाऊस होताच रबर लागवड करून टाकायची असा होता.

आधार (शतशब्दकथा)

लेखक पगला गजोधर यांनी शुक्रवार, 24/07/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
(डिसक्लेमर: सदर कथा ही सत्यघटनेवरून जरी प्रेरित असली, तरी, भारतातील कोणत्याही जिवंत अथवा मृत, व्यक्ती/संघटना/घटना यांच्याशी त्याच्या काहीही संबंध नाही.) डोकी भडकतील, अशी अतिरंजित भाषणे करून, दिशाभूल घडवणे, नंतर तरुणांच्या हातून दंगली, नरसंहार सारख्या घटना, घडवून आणणे, ही प्रविण बुगाडियाची स्पेश्यालीटी. धर्मरक्षणाचा गदर करून, विश्वधर्म-परिषदेवर, स्वतःची पकड मजबूत केलेली.

रस्ते, नियम आणि पोलिस

लेखक सतिश पाटील यांनी गुरुवार, 16/07/2015 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
रस्ते, नियम आणि पोलिस कोपर खैरणे नवी मुंबई ते ठाणे घोडबंदर हा माझा रोजचा ऑफिस ला जाण्या येण्याचा रस्ता. तसा मी नेहमीच वाहतुकीचे सर्व नियम पाळत ठाणे बेलापूर रस्त्यावर माझी दुचाकी चालवत असतो.