Skip to main content

वावर

भवताल

लेखक शिवोऽहम् यांनी बुधवार, 16/09/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
नवं घर भर रहदारीच्या रस्त्यापासुन म्हटलं तर आत, म्हटलं तर जवळ असं होतं. किल्ल्याचे बुरूज असावे तशा दोन दुमजली इमारती रस्त्यावर तोंड करून उभ्या होत्या, त्यांच्या मधून घराच्या आवारात येणारी वाट होती. घराच्या आजुबाजुला लहानमोठे कारखाने, शेजारी मुन्सिपाल्टीची बंद होऊ घातलेली एक सुस्त शाळा, समोर वेगवेगळी दुकानं, डोक्यावर एक लोकप्रिय इस्पितळ आणि मागच्या बाजुला जरा लांबवर दिसणारं मुसलमानांचं कब्रस्तान असं सेटिंग होतं सगळं. शिवाय समोरचा रस्ता ओलांडला की ख्रिश्चन मिशनचे कंपाऊंड. त्यामुळे सर्व थरातल्या लोकांचा राबता त्या भागात असे.

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

किती भाग्यवान आम्ही!

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/09/2015 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले! किती गंडलो आम्ही! मायभूमीच्या आठवांचे गाणे आम्ही, 'चिट्ठी आयी है वतनसे' मध्ये ऐकले! उमाळे, उसासे विमानतळावरच विरतात बहुतेक! नव्या जगातल्या शांतसमृद्ध किनार्याचा मोह नसतोच, छातीठोकपणे सांगावेच कुणी! आठवणी तर येणारच...... अथपासून इतिपर्यंत सगळ्या... नव्या मातीवर मृगजळामागे धावले नाहीत, असे पाय दाखवावेतच कुणी! प्रेमामायेचे पाश कुणाला चुकलेत? 'सुटलो एकदाचा जंजाळातून' म्हणत अनोळख्या टापटिपीत स्वच्छंद शीळ घातलीच नाही असा त्रिशंकू भेटावाच कधी! किती भाग्यवान आम्ही, आमचे देश आम्ही स्वखुशीने सोडले!

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 09/09/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

बंधन बँक

लेखक सतिश गावडे यांनी सोमवार, 07/09/2015 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला आयुष्यात केव्हा ना केव्हा आर्थिक मदतीची गरज भासते. काही वेळा आपण ही मदत नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून घेतो तर काही वेळा कर्ज पुरवठा करणा-या वित्त संस्थांकडून. जर आर्थिक साहाय्याची मागणी करणारी व्यक्ती सधन वर्तुळातील असेल किंवा पगारदार नोकर असेल किंवा त्या व्यक्तीचा चांगले उत्पन्न असणारा व्यवसाय असेल तर आर्थिक मदत मिळण्यास शक्यतो अडचण येत नाही. मात्र ही व्यक्ती जर का आर्थिकदृष्टया कनिष्ठ स्तरातील असेल किंवा जर गरीब असेल तर मात्र अशी मदत मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. बरेचदा नातेवाईकही या व्यक्तीसारखेच गरीब असतात. वित्त संस्था परतीची हमी नसल्याने कर्ज देत नाहीत.

सच्चे वरण

लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 06/09/2015 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

नात्यातले लुकडे जाडे

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 03/09/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

मिपावर ट्रॉल वाढत आहेत

लेखक इस्पिक राजा यांनी गुरुवार, 03/09/2015 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या मिपावरील ट्रोलांची संख्या बघुन मन भरून येते. मागच्या काही वर्षापासून आपल्या मिपावर वेगाने ट्रोलांची संख्या वाढते आहे. मिपा सारख्या संस्थळावर जिथे चांगल्या लेखकांना मखरात सजवले जाते, तिथे अशा प्रकारचे ट्रोल बघुन मन अस्वस्थ होते. खरच आपण इतके पुढारलेले आहोत का की आज आपल्याला जेन्युइन आयडी दुरापास्त होत आहेत. ज्यांनी मिपाला उत्तमोत्तम प्रतिसादांनी सजवले, आपला वेळ देउन मोठे केले तेच आज (असल्या टोळांमुळे) मिपापासुन दूर गेलेले पाहून मन दु:खी होते. सामान्य वाचक अशी आशा करतात की चांगले लेखक उत्तमोत्तम लेख देत राहतील.

दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी सस्णेह आवताण

लेखक दिव्यश्री यांनी सोमवार, 24/08/2015 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे? आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :) तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा. आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल. स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील. तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची. वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची.