Skip to main content

वावर

मिपासार

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी बुधवार, 08/07/2015 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपावर) जे झालं ते चांगलंच झालं….(रोज नवीन गोंधळ हो !) जे चाललय त्यातही आनंदच आहे……. ( डूआयडी म्हणू नका , कट्टे म्हणू नका , लेख रतीब म्हणू नका, धुळवड म्हणू नका …) जे पुढे होईल तेही चांगलंच होईल (अशी आशा करूया…जय भोलेनाथ ! ) तुमचा असा कोणता आयडी होता, की जो तुम्ही घेणार होतात आणि तो आधीच मिपावर आला म्हणून तुम्ही रडताय ? तुम्ही मिपावर अशी कोणती लेखमाला लिहिलीत जी कोणीतरी दुसर्याने त्याच्या नावावर इतरत्र खपवली ? तुमचा असा कोणता आयडी होता जो सं मं कडून उडवण्यात आलाय ? तुम्ही जे काही वाङ्ग्मयचौर्य केलंत ते इथूनच केलंत…( पण कुणालाही न कळू देता….

३१ जूनच्या कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे झालेल्या कट्ट्याचा वृत्तांत

लेखक दमामि यांनी बुधवार, 01/07/2015 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री बरोब्बर साडे अकराला माझा मोबल्या वाजू लागला," अरे दमाम्या, तू कुठेयस रे? गचकलास तर नाही ना? ? पोचले बरं मी कुर्डू वाडीच्या स्मशानात. इथ काळं कुत्रं सुद्धा नाही. तरी आमचे हे म्हणत होते कुठं जातेस रात्रीची कट्ट्याला, त्या दमाम्यावर विश्वास ठेवून …. " माई श्वास घ्यायला क्षणभर थांबल्या त्या संधीचा फायदा उठवत मी बोललो, " माई ,शून्य मिनटात आलोच … "असे म्हणून बायकोवर (म्हणजे बाइक वर ) ढांग टाकली आणि सुसाट सुटलो . स्मशानात पोचतो तर माईसाहेब कुणा काकूशी गप्पात गुंग झाल्या होत्या. मिपाकरांची ही खासियत! यांच्या गप्पा अशा रंगतात की शंका देखील येणार नाही हे पहिल्यांदा भेटतायत म्हणून.

आमचेही प्रवासवर्णन…

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 29/06/2015 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
Jack_Bauer भाऊंचे उसगावच्या दौर्‍याचे प्रवास वर्णन वाचून आम्हालाही आमी लिहीलेल्या एका प्रवासवर्णनाची आठवण झाली. तेव्हा मुक्तपिठ नामक मुक्तपिठल्यावर गाजत असलेल्या कुणा काकुंच्या अमेरिकेचे प्रवासवर्णन वाचून आम्हालाही प्रेरणा झाली होती. (प्रवासवर्णन लिहिण्याची प्रेरणा) आता ते इथे टाकावं की नको, पोस्टू की नको करत एकदाचं पोस्टूनच टाकलं. ******************************************************** मागच्याच आठवड्यातली गोष्ट आहे. आम्ही (आम्ही म्हणजे अस्मादिक आणि सौभाग्यवती) चक्क झोप्या मारुतीच्या देवळामागे असलेल्या भाजी मंडईत आतपाव मिरच्या आणि कोथिंबीर-कडीपत्ता आणावयास गेलो होतो.

(खरा) इनर पीस

लेखक टवाळ कार्टा यांनी मंगळवार, 23/06/2015 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ची पेर्णा - http://www.misalpav.com/node/31745 कमुंची माफी मागून -------------------------------------------------------------------------------------------- "तुला निवड करावीच लागेल, हे शेवटचं सांगतोय" त्याच्या पोटाच्या घेराने कच्चकन आवळून सांगितलं आणि टीव्हीवर "ये तो बडा टॉइंग है" बघत असलेल्या त्याला इलॅस्टिक काचत गेली. तो सुन्न होऊन स्वतःच्या पोटाकडेच पाहत होता. शेजारच्या बेडरूममध्ये अती ताणल्याने फाटलेली "रूपा" पायपुसण्याबरोबर बाहेर आली आणि बरंच काही सांगून गेली. अशी (पर्फ़ेक्ट फ़िटिंगची आणि स्टाईलची) निवड करता येते? दोन्हीपैकी एक?

माझा पुणे सिटी बसमधील प्रवास

लेखक शब्दानुज यांनी रविवार, 21/06/2015 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
सुट्टयांचे दिवस. गतसालाप्रमाणे याही वेळेस आमचे पुण्यात आगमन झाले. पण इतर वर्षी न होणारी गोष्ट यावेळेस होणार होती ती म्हणजे माझे पाय सिटी बसला लागणार होते. नेहमी पुण्यात फिरताना मी नातेवाईकांच्या कारचा किंवा गाडीचा आधार घेऊनच फिरतच असे. कारमद्धये मोबाईलमद्धये घातलेली मूंडी इष्ट स्थळी पोहचल्यावरच बाहेर निघायची. त्यामुळे रस्ते स्थळे खाणाखूणा लक्ष्ात ठेवण्याची गरजच पडली नव्हती. बसचा प्रवास आजपर्यंत मी कौशल्याने टाळत होतो. कारणे अनेक होती.लहानपणापासुनच मुळात प्रवासाविषयी अढी होती. लहानपणी उलट्यांसाठी अनेक पिशव्या घेऊन प्रवास करावा लागे. बसमद्ये माझे रक्त आणि अन्न दोन्ही शोषले जाई.

हे हृदय कसे बापाचे......!

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 20/06/2015 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
(उद्या जगभरात माणसांच्या दुनियेत Father’s Day साजरा होईल. पण पक्ष्यांच्या मुक्त जगातला हा रोजचा Father’s Day वाचकांसाठी....) रणरणते वाळवंट. निर्मम सूर्य. नजर टाकली तरी, आपले डोळे भाजून जावेत! अशा ठिकाणी कुठला पक्षी रहात असेल, वस्ती करीत असेल, मनातही येत नाही. पण निसर्गाची किमया आणि माया अगाध! ............. ............. ................ एक पक्षीण आपल्या नवजात पिलांना पोटाशी घेऊन खुरट्या झुडपांआड बसलेली. पिलेही आपल्या आईच्या पोटाच्या सावलीला बिलगून, आजूबाजूला टुकूटुकू पाहतायेत. असल्या रणरणत्या वाळवंटात त्यांना दानापाणी कुठून मिळत असेल?

उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत)

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 16/06/2015 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मिसळपाव संकेतस्थळ हे एक येथे नमुद धोरणांच्या परिघात सामुदायिक लेखन वाचन सहभागास अनुमती देणारे खाजगी मालकीचे संकेतस्थळ आहे. सदर संकेतस्थळाने दिलेल्या नियमांच्या चौकटीच्या मर्यादा सांभाळून संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी उपलब्ध असलेल्या कुणालाही लेख धागे काढता येतील प्रतिसाद देता येतील अशी या संकेतस्थळाची रचना आहे. माझे या संकेतस्थळावरील लेखन मुख्यत्वे हौशी लेखन असून ज्या धागालेखांवर प्रताधिकार मुक्ततेची सुस्पष्ट सूचना दिलेली नाही ते लेखन प्रताधिकारीत समजावे.

निरागस

लेखक अनुप७१८१ यांनी शुक्रवार, 12/06/2015 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
निरागसता : परवाच ऑफिस च्या कामासाठी चेन्नईला जाव लागले, सकाळचे ( ६.५० चे ) विमान होते, घाई गडबडीत विमानतळावर पोचलो! वेब-चेक-इन न केल्यामुळे, मुकाट्याने लाईनीत उभा होतो, बोर्डिंग पास मिळाला. नंतर bag स्क्रीनिंग, security चेकिंग इ. formalities झाल्या, त्या नंतर ज्या गेट चा नंबर दिलेला होता त्या समोर बसून प्रतीक्षा करत होतो. माझ्या पुढे एक त्रिकोणी कुटुंब बसले होते, मुलगा लहान होता फारतर ४-४.५ वर्षाचा असेल, एक तर पहाटे उठवल्या मुले चुलबुल- चिडचिड चालू होतीच, त्यात हे नको करू, ते नको करू, शांत बस इ.

ये दोस्ती ......

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 09/06/2015 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
( १८ एप्रिल २०१५ रोजी या http://www.bbc.co.uk/news/blogs-ouch-32325809 संकेत स्थळावर दोन मित्रांची एक प्रेरणादायी कहाणी वाचनात आली. तिचे मराठी कथेत रुपांतर करताना, केवळ आणि केवळ एकच हेतू मनात आहे – लिहिणाऱ्या/वाचणाऱ्या सर्वांनी ‘एक तरी झाड लावावे, जगवावे, वाचवावे!’ ) हेग्झिया आणि वेंकी. उत्तर चीन मधील येली या छोट्याशा खेड्यातील दोन शाळूमित्र. दोघांत एखाद वर्षाचा फरक. पाठच्या भावंडासारखे सोबत वाढले. हसले. खेळले. ..... आणि दोघांच्या वाट्याला आलेले दुर्दैव आणि त्यावर केलेली मातही जगावेगळी! ..... ........

७ जून २०१५ पाताळेश्वर पुणे!

लेखक अजया यांनी सोमवार, 08/06/2015 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिपक_कुवेत पुण्याला येण्याच्या निमित्ताने पुणे कट्टयाचा धागा नंबर एक ६-७ जूनच्या कट्टयाचा घोळ घालण्यात डबल सेंचुरी मारुन गेला!अर्थातच त्यातून काहीही निष्पन्न न होता!