Skip to main content

वावर

सरस कट्टा (अर्थात महालक्ष्मी सरसला भेट)

लेखक सविता००१ यांनी मंगळवार, 06/01/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणेच टीपी करण्याकरता भगवान शंकर आणि पार्वती त्यांच्या स्पेशल चार्टर्ड विमानातून चालले होते. पार्वती आपली नेहमीप्रमाणेच निरागसतेने विचारती झाली- "भगवान, या कलियुगात स्त्रियांना चार घटका आनंदी, सुखी ठेवणारं असं काही व्रत आहे का?" भगवान ताबडतोब उत्तरले- "हो देवी. हल्लीच्या संगणक युगात या मिसळपाव नामे संस्थळाला फार महत्त्व आलय. आणि त्यात अनाहिता नामक एक अध्याय फक्त स्त्रियांसाठीच राखून ठेवलाय.

होउ दे श्वास मोकळा

लेखक टवाळ कार्टा यांनी बुधवार, 24/12/2014 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर गुर्जींचा (इथे दोन्ही कानांच्या पाळ्यांना हात लावण्यात आलेला आहे याची ज्याची त्याने नोंद घ्यावी) प्रभाव जास्तच झाल्याने ह्या ईडंबणावर त्यांची छाप दिसू शकते (दिसेलच ;) )...हे ईडंबण गुर्जींना अर्पण...जिल्बी मात्र मीच पाडली बर्का ;) आम्ची पेर्णा http://www.misalpav.com/node/29809 ------------------------------------------------------------------------------- जगने न तुज्य(कृपे)विना , का रडवतो तू मला, गेला कोंडून तू मजला, जणू श्वास माझा गेला, ये ना परत दाराकडे, कुंथणे आता मुश्किल झाले, नाक माझे हिरमुसले, कससचं म्हणुन बसून राहिले, "ब"

अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 06/12/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या.

क्विझ वगैरे

लेखक आशु जोग यांनी गुरुवार, 27/11/2014 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

पाकिस्तान !

१. 'पाकिस्तान'चा जीना यांनी सांगितलेला अर्थ काय... २. ज्याची आई हिंदू होती अशा पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे नाव सांगा ३. मदर ऑफ तालिबान, डॉटर ऑफ ईस्ट असे कुणाला म्हणतात ! ४. लारकाना मतदारसंघाशी कोण संबंधित आहे ५. राज्ये किती आहेत आणि सर्वात मोठे राज्य(सुभा) कोणते ६. या सर्वात मोठ्या राज्याने देशाचा किती टक्के भाग व्यापला आहे ७. हिंदू लोक तिथे आहेत का ८. हिंदूंचा बाप असे कोणाला म्हणतात ९. पाकिस्तानात विलिन झालेले असे संस्थान सांगा जिथला राजा हिंदू आणि प्रजाही बहुसंख्य हिंदूच होती १०.

माझं कोकणातलं गांव :- भाग-६ माझा एन्रॉनमध्ये प्रवेश

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 20/11/2014 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचे भाग भाग-१. भाग-२ . भाग-३. भाग-४. भाग-५ या लेखामालेतील पाचवा भाग प्रसिध्द झाल्यानंतर टंकनाचा कंटाळा आल्याने मध्येच ७ महिने निघुन गेले. त्यामुळे क्षमा असावी. मागिल लेखापर्यंत मी माझ्या कोकणातल्या गावाचे वर्णन केले होते.

त्यागासारखं ढोंग नाही

लेखक वडापाव यांनी बुधवार, 19/11/2014 00:34 या दिवशी प्रकाशित केले.
सिनेमा पाहता? हिरो पाहता? मारामारी पाहता? काय उद्देश असतो? अन्यायाविरूद्ध लढा वगैरे. कधी? स्वतःवर शेकेपर्यंत तर हिरो हिरवीणीचे तळवे चाटण्यात वेळ घालवत असतो. अचानक काय होतं त्याला? गझनीत हिरवीण मरते. अग्निपथात बाप मरतो. क्रिशमध्ये बाप जिवंत असल्याचं कळतं. अजूनही बरीच उदाहरणं मिळतील. सारांश, वैयक्तिक पातळीवर काहीतरी चेतना मिळेपर्यंत आमच्या हिरोंना उर्वरित जगाशी काहीही घेणंदेणं नसतं. पण सगळा लढा वैयक्तिक पातळीवरच ठेवून कसं चालेल. तसं केलं तर लोकांना हिरो हा हिरो न वाटता सूडबुद्धीनं पेटलेला माथेफिरू वाटेल. म्हणून मग व्हिलनला जास्तीत जास्त व्हिलनीश करायचं.

काही प्रसंग

लेखक सुज्ञ यांनी बुधवार, 29/10/2014 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
काही प्रसंग. वेळ: तुमच्या मनात येईल ती … स्थळ: तुम्हाला वाटते तेच. प्रसंग पहिला सर्वच लोक आपापली वैचारिक समृद्धी किती प्रगाढ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसाठी ते इथे जमलेले आहेत. दुसरा माणूस आपल्याकडे बघतोय हे बघित्यावर वा! क्या बात है! स्स ! असे मोठमोठ्यानदा उद्गार काढतात. कोणी टाळ्या पिटलयास आपणही पिटतात. थोडक्यात असे 'रसिक' लोक इथेच सापडतात. एक साधारण माधाम्वार्गीय स्त्री : अग मालीनितैंच गाणं आजकाल किती कंटाळवाण होतं नं दुसरी : हो नं गं खूपच संथ गाइल्या नं.

चहा, सिगरेट आणि तत्वज्ञान - सुशिक्षित कि …. ?

लेखक खोंड यांनी शुक्रवार, 24/10/2014 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
"५ कटिंग दे रे…. " माझ्या कडून ऑर्डर गेली … "जोश्या चल ना … " सावंतने डोळयाने खुणावलं … दोघे सिगरेटी घेऊन आले…. "च्यायला या दुचाकी वाल्यांच्या…. " सावंत कडाडला … सकाळपासूनच मूड खराब होता "काय झालं रे " मी सावंतने फक्त निराशार्थी मान हलवली सिगरेटचा एक मोठा झुरका घेतला आणि हळू हळू धूर सोडू लागला सगळे सावंत कडे डोळे लाऊन "सकाळी ऑफिस ला येताना गाडी ठोकली एकानं … वितभर डेंत पडलाय डाव्या दरवाज्याला … " "अर्रर्र ….

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.