इंडिया-इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती. इंग्लंडचे फलंदाज टिच्चून फलंदाजी करत होते. आतापर्यंत चौथ्या दिवशीच्या पहिल्या सेशनमध्ये इंग्लंडच्या दुसऱ्या डावांत ३ बाद २९८ धावा झालेल्या. इंग्लंड १२७ धावांनी पिछाडीवर होता आणि कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात इंग्लंडला यश येईल असेच एकंदरीत चित्र होते.
मी लॉंगऑफला उभा होतो. विकेटमागे धोनी, ही जोडी कशी फोडावी या विचारात होता. ॲलिस्टर कुक जरा चाचपडत होता पण उपुल थरंगा अगदी फॉर्मात बॅटींग करत होता. हरभजनला अगदी निष्प्रभ करून टाकले होते त्याने. तरी हरभजननेही अजून हार मानली नव्हती. अचानक हरभजनने त्याची नेहमीची बॉलींग ॲक्शन सोडून मिडीयम फास्ट टाकायला सुरूवात केली.