पुणे रनिंग
धावण्याचं एवढं वेड लागु शकतं हे मला पुणे रनिंगशी संबंध येईपर्यंत कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. पुणे रनिंग (https://www.facebook.com/PuneRunning) हा एक धावण्याची आवड असलेल्या पुण्यातील लोकांचा ग्रुप आहे. धावपटू घडवून भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देणे वगैरे मोठी स्वप्न नाहीत, घटना नाही, पदाधिकारी नाहित, राजकीय पाठींबा नाही पण सामान्य लोकांना धावण्यासारखी आरोग्यदायी सवय लावणे हा साधा स्वच्छ हेतु. एकट्याने खूप वेळ धावणे बहुदा कंटाळवाणे होते म्हणून ग्रुपमधे धावले जाते. या एका पॅशनसाठी पुण्याच्या कानाकोपर्यात लोकं धावतात, नवीन लोकांना धावायला उद्युक्त करतात, मॅरॅथॉन इव्हेंट भरवतात.