Skip to main content

तंत्र

सुपर स्ट्रेसबस्टर

लेखक तिमा यांनी सोमवार, 30/09/2013 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
माझा भाचा, गेले वर्षभर कुठलातरी संगणक कार्यक्रम लिहित होता. काय ते पत्ता लागू देत नव्हता. परवा माझ्या वाढदिवसाला तो आला आणि एक छोटा पेन ड्राइव्ह भेट देऊ लागला. मी विचारले, " हे काय आहे ?", त्यावर तो हंसून म्हणाला," मामा, तुला ही सरप्राइज गिफ्ट आहे. हल्लीच्या आसपासच्या अनेक घटनांमुळे तू वैतागलेला असतोस ना ? म्हणून तुझ्यासाठी हा स्ट्रेस्-बस्टर गेम आहे. तू वापरुन बघ, तुला आवडला तर तुझ्या वयाच्या लोकांसाठी मी तो लाँच करीन." दुसर्‍या दिवशी मी तो संगणकावर उतरवला. बरोबर एक त्रिमिती दिसावे, म्हणून डोळ्यावर चढवण्याचा एक स्पेशल गॉगलही होता. त्याच्या वायर्स संगणकाला जोडल्या. व्वा! काय छान प्रकार होता.

दप्तराचे ओझे कमी करा

लेखक शनआत्तार यांनी बुधवार, 04/09/2013 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
दप्तराचे ओझे कमी करा कालच एका सामाजिक संस्थेने दप्तराचे ओझे या वर एक सर्वेक्षण करून त्याचे आलेले निष्कर्ष प्रसिध्द केला आणि सर्वांना विचार करायला भाग पाडले. मी ही एक साधा माध्यमिक शिक्षक गेली २२ वर्षे अध्यापनाचे काम प्रामाणिक पणे शिरगाव ( ता. देवगड ) च्या शिरगाव हायस्कूल शिरगाव मध्ये करत आहे. विद्यार्थ्यानी शिकायचे व शिक्षकानी शिकवायचे ही दोन्ही बाजूने चालणारी अखंड क्रिया. आज काल विद्यार्थ्याच्या पाटीवर असणार्या दप्तराचे ओझे इतके जास्त आहे की त्याच्या आरोग्यावर आणि पर्यायाने अध्ययनावर परिणाम होत आहे. या वर काही उपाय मी येथे देऊ इच्छितो.

४ निमिष, ३९ क्षण - अग्निसराव

लेखक सार्थबोध यांनी बुधवार, 28/08/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या संस्थेत (कंपनी) अग्निसराव (फायर ड्रील) नुकताच पार पडला, त्यातील एकूणच अनुभव इथे मांडत आहे. लेख मुद्दामच पूर्ण मराठीत लिहित आहे, काही शब्दांना कंसात पर्यायी आंग्ल शब्द लिहिले आहेत. या लेखातील नावे / व्यक्ती काल्पनिक आहेत, कुणाचा संदर्भ जुळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.   आमच्या संस्थेत सहामाही अग्निसराव असतो, या सरावात मी एक सहायक/अधीक्षक (फायर वॉर्डन) म्हणून काम करतो. मागल्या वर्षी देखील मी हे काम केले होते.

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

लेखक गंगाधर मुटे यांनी मंगळवार, 27/08/2013 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)

अलेक्साच अधिकृत वाहतूक दर्जा Extension आपल्याला अलेक्सा वाहतूक क्रमांकाची माहिती फक्त एका टिचकीवर पुरवते.

लेखक विनोद निंबाळकर यांनी मंगळवार, 27/08/2013 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
गुगल क्रोम आपल्याला अलेक्सा वाहतूक दर्जा विस्तारची सेवा विनामुल्य देतो, आणि हे एकमेव विस्तार (Extension) आहे, ज्यामध्ये अलेक्सा रहदारी पॅनेल सामाविष्ट आहे. आपला ब्राउझिंगचा प्रवास खंडीत न करता, आपण ज्या संकेतस्थळास भेट देत आहात त्या संकेतस्थळाची माहिती सहजतेने पुरवतो. KideGiri.Com किडेगिरी.कॉम | Alexa Traffic Rank किडेगिरी.कॉमचा अलेक्सा क्रमांक पाहण्यासाठी येथे टिचकी द्या.

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 14/07/2013 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

'बिग डेटा' - म्हणजे काय रे भाऊ?

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 08/07/2013 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
आज तंत्रज्ञानाचा वेग आणि झपाटा इतका आहे की त्या वेगाने बावचळूनच जायला होते. त्यात सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या सगळ्या ‘दादा’ कंपन्यांना 'मार्केट शेयर'वर ताबा मिळविणे गरजेचे असल्याने त्यातली स्पर्धा अतिशय जीवघेणी झालेली आहे. त्यामुळे ‘टाइम टू मार्केट’ ह्याला इतके महत्त्व आले आहे की थोडा उशीर झाला तर स्पर्धेतून बाहेर फेकले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मग एखादी संकल्पना घेऊन बाजारात त्यावर आधरित एक गरज निर्माण करून, त्यावर आधारित प्रॉडक्ट्स बनवून ती विकण्यासाठी ‘बाजारपेठ’ तयार करण्याचे काम ह्या बलाढ्य सॉफ्टवेअर कंपन्या नेमाने करत असतात.