मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संगीत

“मेरे प्रिय आत्मन् . . ."

मार्गी ·
नुकतीच इथे ओशोंवर झालेली चर्चा वाचली. अनेकांनी मांडलेले विचार बघितले. छान वाटलं. त्यातून थोडी भर घालावीशी वाटली व म्हणून इथे लिहितोय. . . ओशो. . . . जुलै २०१२ च्या शेवटी ओशो आयुष्यात आले. . योगायोगाने पहिल्याच प्रवचनांमध्ये ध्यान सूत्र ही प्रवचन मालिका मिळाली. तिथून नंतर मग 'एस धम्मो सनंतनो', 'संभोग से समाधी तक', 'ताओ उपनिषद', 'अष्टावक्र महागीता', 'मै कहता आखं देखी' आणि इतर अनेक प्रवचन मालिका ऐकल्या. . . अजूनही रोज प्रवचन ऐकतोय. त्यातून इतकं काही मिळत गेलं आणि मिळतं आहे की, जुलै २०१२ पासून एक नवीनच जीवन सुरू झाल्यासारखं वाटतं. . . .

गीतगुंजन - २२: बेबी, व्हेन यो'र गॉन...

प्रास ·
जगात प्रेमाच्या संदर्भात दोन मतप्रवाह आढळतात. पहिला म्हणजे स्वभाव जुळले पाहिजेत आणि दुसरा अपोझिट अट्रॅक्स. असंच काहीसं मैत्रीच्या बाबतीतही होतं आणि म्हणूनच कधी कधी संभ्रम होतो, ही निखळ मैत्री आहे की प्रेम? स्वभाव जुळले म्हणून किंवा स्वभाव विरुद्ध आहेत म्हणून वादविवादाचे प्रसंग टाळता येत नाहीत. किंबहुना ते तसे येतातच. मग सुरू होतो राग आणि अबोला यांचा सिलसिला! एकान्तात राहवत नाही आणि गर्दी भावत नाही. काऊन्टर करण्यासाठी नेमका विषय टाळून कुणाशी गप्पा, नाटक-सिनेमा-रेडीओ-पुस्तक यामध्ये मन गुंतवण्याचे प्रयत्न सुरू होतात. दिवस कशा ना कशा त-हेने पार पडतो पण मग रात्रं खायला उठते.

इंडिपॉप - ९० चे दशक !

माम्लेदारचा पन्खा ·
गोरी तेरी आँखें कहें रातभर सोई नहीं ......... माईरी याद वो आई !..... मेड इन इंडिया ........ आँखों में तेरा ही चेहरा .... तुम्ही विचार करत असाल ना की आज अचानक मला असा काय झालंय आणि मी ही गाणी एकामागून एक का म्हणायला लागलोय....... पण त्याला कारण आहे... ही आणिक अशी कितीतरी गाणी जी अंतर्मनात कुठेतरी ठसली आहेत ती काही केल्या डोक्यातून जात नाहीत ....... आजच्या धांगडधिंगा असणाऱ्या आणि अळवावरच्या पाण्यासारख्या संगीताच्या काळात आवर्जून सतत आठवणीत येणारी गाणी म्हणजे इंडिपॉप संगीत आणि तेही खास ९० च्या दशकातलं !

रंजीश ही सही ...

ज्याक ऑफ ऑल ·
आज खूप दिवसांनी "रंजीश-ही सही " ही मेहंदी हसन साहेबांची अजरामर गज़ल ऐकायचा योग आला . "गज़ल" .. खरं तर हा असा गायन प्रकार आहे की हा न आवडणारा प्राणी विरळाच सापडेल . मग ती जगजीत ची "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो " असो किंवा अगदी अलिकडची हरिहरन ची "मरीज-ए- इश्क " असो . गज़ल हा प्रकारच गारुड करणारा आहे . तर अश्या अनेक गझलांपैकी एक अत्यंत आवडणारी गज़ल म्हणजे अहमद फराज साहेबांची "रंजीश ही सही ". अहमद फराझ यांच्या तशा खूपश्या गज़ल , रचना अत्यंत सुरेख आहेत. पण अत्यंत लोकप्रिय अशी म्हणावी ती ही गज़ल. ओघवतं काव्य अत्यंत सोपी सुरेख मांडणी , समजायला सोपं आणि एक "कशीश” असलेलं लेखन म्हणजे अहमद फराज.

खेलन आयो रे...ब्रजराज कुंवर...अबीर-गुलाल उडावत, गात-वसंतराव देशपांडे

महामाया ·
‘ख्याल गायन का प्रस्तुतीकरण’ या विषयावर इथे बिलासपुर ला वसंतराव देशपांडे यांचे शिष्य पं. प्रभाकरराव देशकरांनी कार्यशाळा घेतली होती...त्या निमित्ताने त्यांच्या भेटीचा योग आला...धागा एकच-वसंतराव देशपांडे...कार्यशाळे नंतर मी पंडित देशकरांना सविस्तर पत्र लिहिलं होतं...हेच ते पत्र- रा.रा. प्रभाकर रावांना माझा स.न. त्या दिवशी कार्यक्रमानंतर मी खरंच आनंदून गेलो होतो. एकाच दिवशी यमन, अल्हैया बिलावल, मुल्तानी, मधुवंती, शंकरा...ऐकायला मिळणं...सगळंच कसं कल्पनातीत होतं. काफी मधील टप्प्याच्या चार ओळी (हा टप्पा मी मालिनी राजुरकरांचा ऐकलाय, इथल्या कार्यक्रमांत त्यांनी म्हटला होता.

माहिती हवी आहे.

उपयोजक ·
खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने मिपाकरांकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो. 1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल? 2)संगीतकार यशवंत देव यांनी मल्याळी गायक के जे येसुदास यांच्याकडून गाऊन घेतलेलं "शब्दमाळा पुरेशा न होती स्पर्श सारेच सांगून जातो" हे सुप्रसिध्द गीत Mp 3 किंवा व्हिडिओ स्वरुपात आंजावर

शेवटचा पदन्यास एक

बहुगुणी ·
पंधरा वर्षांपूर्वी एक तंत्रज्ञ काम करायचा हाताखाली, डॅरेन कोल्स्टन नावाचा. "आपलं काम बरं आणि आपण बरं" असा एकाग्र चित्ताने, इतरांमध्ये फारसा न मिसळता रहायचा. उत्तम कमावलेली शरीरयष्टी. त्यामुळे त्यामुळे एक श्वेतवर्णी आणि एक कृष्णवर्णी अशा नटखट म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोन्ही सहकारी तंत्रज्ञ सहकारी कन्यका त्याच्या आगे-मागे रुंजी घालायच्या, पण हा कुणाच्या अध्ये-मध्ये न पडता, कानांत इअरफोन्स घालून गाणी ऐकत आपलं काम करीत रहायचा.

चुकचुकली पाल एक...!

खेडूत ·
गीत : चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी गीतातील सूर असे का मधेच पण तुटले तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार ही अशीच तव छाया पण मागे धावणार सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६ *** अत्यंत आवडीचे हे गीत कितीही ऐकले तरी 'अजून एकदाच' ऐकल्याशिवाय थांबवत नाही.

किशोर कुमार ची गाणी आणि शास्त्रीय संगीत

बहुगुणी ·
मला व्यक्तिशः रागदारीतलं काहीही कळत नाही. हे माझं दुर्दैव! इच्छा असूनही इतक्या वर्षांमध्ये वेळ काढू शकलो नाही ही एक खंत आहे, आणि उर्वरित आयुष्यात जमेल अशी शक्यता अति-धूसर आहे. पण तरीही जमेल तशी माहिती गोळा करीत रहातो, कधीतरी वाचेन या आशेवर! पूर्वी मिपावर संस्थापक तात्यांना विनंती केली होती की रागदारीवर आधारित हिंदी-मराठी चित्रपट संगीतावर एक लेखमाला लिहा, त्यांनी 'बघू' म्हणत टाळलं.