खालील माहिती हवी आहे.बरीचशी शोधाशोध करुनही न मिळाल्याने मिपाकरांकडे आलो आहे.अाता सर्वजण गणेश आगमनाच्या तयारीत असतील.त्यामुळे नमनाला घडाभर तेल न घालता थेट प्रश्न विचारतो.
1)पूर्वी CNBC या वाहिनीवर GE (General Electric)corporation ची एक जाहिरात लागत असे.बरीच मोठी अशी ही जाहिरात होती.या जाहिरातीत tion वरुन शेवट होणार्या बर्याचश्या शब्दांचा,विशेषणांचा वापर केलेलं हे गाणं होतं याचा व्हिडिओ किंवा Mp3 आंजावर कुठे मिळेल?
2)संगीतकार यशवंत देव यांनी मल्याळी गायक के जे येसुदास यांच्याकडून गाऊन घेतलेलं "शब्दमाळा पुरेशा न होती स्पर्श सारेच सांगून जातो" हे सुप्रसिध्द गीत Mp 3 किंवा व्हिडिओ स्वरुपात आंजावर किंवा कोणाकडे मिळेल का?किंवा
खाली दिलेल्या लिंकवर ते आहे.
https://m.youtube.com/watch?v=GXVzBI34h4E
पण दर्जा खराब आहे.खरखर ऐकू येते.ते कोणते software वापरुन ते सुश्राव्य करता येईल?
3)खुप पूर्वी ईटीव्ही मराठीवर सुनिल बर्वे,रविंद्र मंकणी,रसिका जोशी,सुलभा देशपांडे यांची "भुमिका" नावाची मालिका लागायची.याचं शीर्षक संगीत नरेंद्र भिडे यांनी केलं होतं ते Mp3 स्वरुपात आंजावर कुठे मिळेल?
4)छ.शिवाजी महाराजांनी तमिळनाडूतील तंजावर पर्यंत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला होता.त्यांच्याबरोबर शेकडो मराठी कुटूंबे वेगवेगळ्या कार्यासाठी त्यांच्याबरोबर तिकडे गेली;तिथेच राहिली.
त्यांनी तिकडे मराठी भाषा,संस्कृती अद्यापही जपली आहे.यावर मुंबई दुरदर्शनने चेन्नई दुरदर्शनच्या सहकार्याने एक व्हिडीओ रिपोर्ट बनवला होता.तो आंजावर कुठे मिळेल?
5)खाली मराठी शादीच्या एका व्हिडिओची लिंक देतोय.
https://m.youtube.com/watch?v=PQ866yYfDdM
यात अभिनेते रुषी देशपांडे यांच्या पत्नीचे काम केलेल्या अभिनेत्रीचे नाव काय?त्यांनी कोणत्या सिनेमात काम केले आहे का?
6)कृष्णमुर्ती ज्योतिष पध्दतीचे जनक प्रोफेसर के एस कृष्णमुर्ती यांनी या पध्दतीच्या प्रसारार्थ मलेशिया देशाचा दौरा केला होता.त्यावेळी त्यांनी मलेशियाच्या दूरदर्शनवरून एक व्याख्यान दिले होते.याचा व्हिडीओ कुठे मिळेल?त्यांचा हा एकमेव व्हिडिओ असावा असा अंदाज आहे.
सर्वांना उद्यापासून येणार्या गणेशागमनाच्या शुभेच्छा!!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
10795
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
५) मराठी शादीच्या अॅडमधील
सॉरी. त्या नाहीत. त्यांच्या
In reply to ५) मराठी शादीच्या अॅडमधील by अभ्या..
अजून एक
४)राहूल कुलकर्णीने
खात्रीशीर
In reply to ४)राहूल कुलकर्णीने by कंजूस
२९ जून २०१४ ची suhasg यांची
पूर्वग्रह
In reply to २९ जून २०१४ ची suhasg यांची by कंजूस
श्रेय नक्की कुणास द्यायचे असं
In reply to पूर्वग्रह by उपयोजक
एबीपी माझा
In reply to पूर्वग्रह by उपयोजक
भाते
In reply to एबीपी माझा by भाते
खुप पूर्वी ईटीव्ही मराठीवर
ही अभिनेत्री कोण?
ही अभिनेत्री कोण?
In reply to ही अभिनेत्री कोण? by उपयोजक
या फोटोतील
In reply to ही अभिनेत्री कोण? by उपयोजक
ही अभिनेत्री कोण?
यांचंही
पांढर्या