आईसक्रीम
‘टबुडी टबुडी’ चाच (http://www.misalpav.com/node/26051) हा पुढचा भाग आहे असे समजावे, म्हणजे पुन्हा सर्व पात्रांची ओळख करुन द्यायची आवश्यकता नाही.
तो वेडा जागा सोडून गेल्यावर तिथे दुसरे एक श्रीमंत गुजराती कुटुंब रहायला आले. त्यांचा बहारिनला मोठा धंदा होता. कुटुंब मोठे, मुख्य मोटाभाई म्हणजे आसुभाई, दोन तीन महिन्यांनी कधी एखादा आठवडा घरी यायचे. त्यांचे धाकटे भाऊ, नवीन आणि खिमन, मुंबईतला बिझिनेस सांभाळायचे. एक बहीण, बायको आणि दोन मुली आणि तीन मुले, शिवाय एक म्हातारी दमेकरी आई.
मिसळपाव