Skip to main content

समाज

एक गरजू शाळा.

लेखक इरसाल कार्टं यांनी गुरुवार, 08/12/2016 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो! आज एका वेगळ्या विषयावर लिहितोय, तुमच्या सहकार्याची अपेक्षा करूनच. हि गोष्ट आहे एका शाळेची, तिचे नाव आहे प्रकट विघ्नेश माध्यमिक विद्यालय. ही शाळा १५ जून २००६ पासून कार्यरत आहे पालघर या आदिवासी जिल्यातील वाडा तालुक्यातील कोंढले गावाजवळील रावतेपाडा या छोट्याश्या पाड्यात. पाचवी ते दहावी या वर्गांमध्ये मिळून एकूण २२६ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. सगळेच्या सगळे आदिवासी पाड्यांमधून पायी येणारे. १० शिक्षक यांना शिकवण्याचे काम करत आहेत तेही कोणतेही वेतन अथवा मानधन न घेता. तसेच ३ शिक्षकेतर कर्मचारीही इथे कुठल्याही मानधनाव्यातिरिक्त काम करत आहेत.

आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे पुस्तकाला पारितोषिक

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 05/12/2016 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या अनुवादाला,
"आव्हान जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाचे" ह्या
ब्रिगेडिअर हेमंत महाजन लिखित पुस्तकाला,
महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे,
’लोकहितवादी रा.ब.गोपाळ हरी देशमुख’ पारितोषिक देण्याचे ठरले आहे.

इष्ट जनांस आमंत्रण आहेच.

महेश्वरची मंतरलेली पहाट!

लेखक आर्या१२३ यांनी मंगळवार, 29/11/2016 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
२००९ मधे नारेश्वर, गरुडेश्वर दौरा झाला आणि झपाटल्यासारखी नर्मदा परिक्रमेवर असलेली मिळतील ती पुस्तके वाचून काढली. त्यात प्रतिभा चितळे यांची सीडी, मिपावर खुषीताईंनी लिहिलेली लेखमाला,हे भर घालतच होते. 'महेश्वर' या नावाचं भूत मानगुटीवर बसलं ते जगन्नाथ कुंटे यांच 'नर्मदे हर' वाचल्यावर.. मग सुरु झाल, इंटरनेट वरून महेश्वर च्या नर्मदामाईचे फोटो बघत तासन तास त्यात हरवून जाणं ! ध्यासच घेतला महेश्वर ला जायचा. एक जबरदस्त गारुड होत या नावाच! ... आणि मागच्या वर्षी २०१५ डिसेंबर मध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले. नविन वर्षाची सुरुवात नर्मदा किनारी करायची हे ठरवलच.

कंट्रोल रूम - २

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 29/11/2016 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
(जुनाच ढिस्क्लेमर: या लेखातील घटना जरी खरया असल्या तरी पात्रांची नावे बदलली आहेत आणि विनोदनिर्मितीसाठी काही प्रसंगांना तिखटमीठ लावण्यात आलेले आहे!) ०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-० कंट्रोल रूम ०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-०-० "नमस्कार, कंट्रोल रूम, काय मदत करू शकते आपली?" "हॅलो, म्याडम, ते याडं टाकीवं चलडय... उडी माराय." "पत्ता सांगा, कुठून बोलताय तुम्ही" "प...त्ता... हां लिहून घ्या ॲड्रेस...

बलुची लोक व बलुचिस्तान : एक संक्षिप्त आढावा

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 28/11/2016 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
पंतप्रधान मोदींनी बलुचिस्तानचा आपल्या १५ ऑगस्ट २०१६ च्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात उल्लेख केल्यानंतर त्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, जगभरच्या लोकांत, बलुचीस्तानबद्दल जितकी माहिती आहे त्यापेक्षा अनेक पटींनी अज्ञान आहे. तेव्हा माझे अल्पज्ञान इथे मिपाकरांबरोबर वाटून घ्यावे असे वाटले म्हणून हा लेखनप्रपंच. असो. स्वानुभव १९८२ ते १९९६ या कालखंडात मी माझ्या एका परदेशी नोकरीत अनेक सामान्य व अधिकारी बलुची लोकांबरोबर १४ वर्षे रोजचे काम केले आहे. सर्वसाधारण बलुची मित्रत्वाचा व्यवहार करणारा, शिस्तप्रिय, कामाला वाघ व विश्वास बसला की जीवाला जीव देणारा असलेला पाहिला आहे.

उडदामाजी "काळे"-गोरे

लेखक गुलाम यांनी मंगळवार, 22/11/2016 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
'प्रधानसेवकांची मोठी घोषणा. काळ्यांविरुध्द सर्जिकल स्ट्राईक.' (आता सगळे काळे हद्दपार होणार.. आपले तर १००% पांढरे.) गुलाम बेहद खुष झाला. "अगं ऐकलंस का? १०० चे किती आहेत तुझ्याकडे?" "४ फक्त. तुमच्याकडे?" "२. आणि पेपरचं बिल पण द्यायचं आहे अजुन. सकाळीच येउन गेला तो." "अहो मग त्याला ५०० ची नोट देउन टाका ना. आत्ताच आलीय बातमी. त्याला अजुन कळलं सुध्दा नसेल." "अगं पण तो बिचारा..." "लवकर जा. एकदा कळलं की घेणार नाही तो." . . . "हे काय बिनकांद्याचे पोहे?" "अहो तिकडे आपले सैनिक रोज शत्रुच्या गोळ्या खातात.

योगशिबीरातले दिवस २: योगाभ्यास- A man is as old as his spine is flexible

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 21/11/2016 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात शिबीराची ओळख, दिनचर्या सांगितली . या लेखात शिबीरात काय काय शिकलो हे थोडक्यात सांगत आहे. अर्थात शेवटी, केंद्रातले व्यासंगी, प्रगल्भ वक्ते हे सगळे अतिशय प्रभावीपणे अगदी सहजगत्या उलगडुन सांगतात. तिथले प्रदुषणमुक्त वातावरण, आहार-विहार आणी मुख्यतः सामुहिक साधनेचा खुप फरक पडतो. सकारात्मक स्पंदने मिळतात. अष्टांग योगात यम नियम वगैरे असतात हे आपण वाचले/ऐकले आहे. पण यम नियम म्हणजे तरी काय, याबद्दल जे आम्हाला सांगितले ते इथे मुद्द्यानिशी मांडतेय .

योगशिबीरातले दिवस १- ओळख, दिनचर्या

लेखक आर्या१२३ यांनी सोमवार, 21/11/2016 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
विवेकानन्द केन्द्र, योग शिबिर तसे कॉलेजात असताना रोटरॅक्टचा युथ कॅम्प अटेन्ड केला होता. पण तो अगदीच ४ दिवसाचा. ४ दिवस भुर्र्कन उडुन गेले होते. त्या त्या वयातले अनुभव वेगळेच असतात. तेव्हा शरीर, मन दोन्हीही तरल असते. इतरांसोबत कुठल्याही सवयीचे अ‍ॅब्सॉर्बीन्ग चटकन होत असते.

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ कार्य

लेखक आर्या१२३ यांनी शनिवार, 19/11/2016 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
एकनाथजी रानडे यांचे कार्य शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न: अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता, त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.