स्वारस्याची अभिव्यक्ती
वामन आणि मी, आम्ही दोघेही बसमध्ये बसून तासभर कसा काढावा ह्याचा विचार करत असता, ही चर्चा सुरू झाली. आणि मग उत्तरोत्तर रंगतच गेली. तिचाच हा वृत्तांत. हा संवाद कमीअधिक प्रमाणात प्रत्यक्षात असाच घडलेला आहे.
मीः हे बघा, तुम्हाला ह्यात रुची आहे का?
वामनः छे! हे सगळे गणिताने भरलेले आहे. ह्यात आपल्याला काय ’इंटरेस्ट’ असणार?
मीः ’इंटरेस्ट’? म्हणजे तुम्हाला ’स्वारस्य’ म्हणायचाय काय?
वामनः हो. तेच ते.
मीः तुम्हाला ह्यात स्वारस्य नसेल, तर आपण अधिक सुरस गप्पा करू या! तुम्ही ’इंस्ट्रुमेंटेशन’ मध्ये एवढी वर्षे काम करताय.
मिसळपाव