Skip to main content

समाज

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ कार्य

लेखक आर्या१२३ यांनी शनिवार, 19/11/2016 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
एकनाथजी रानडे यांचे कार्य शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न: अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता, त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.

Cashless

लेखक निओ१ यांनी शनिवार, 19/11/2016 01:32 या दिवशी प्रकाशित केले.
नोटबंदी जाहीर झाली व ९ ला सकाळी सगळीकडे आहाकार माजला की काय असे वातावरण निर्माण झाले होते. माझ्याकडे रोख रक्कम फक्त ३४० रु होती. तर.. घरी आम्ही चार लोक आहोत. १. महिण्याचा किराणा - कार्ड पेमेंट २. गाडीसाठी पेट्रोल - कार्ड पेमेंट ३. औषधे - कार्ड पेमेंट ४. नेट बील - कार्ड पेमेंट ५. फोन बील - कार्ड पेमेंट ६. लाईट बील - कार्ड पेमेंट ७. सिलेण्डर - कार्ड पेमेंट ८. टिव्ही रिचार्ज - कार्ड पेमेंट ९. ड्रिक्स - कार्ड पेमेंट * यातील कित्येक लोकांना कार्ड मशीन घेण्यास मी गेल्या दोन वर्षापासून सांगत होतो व सकारण, उदाहरण देऊन पटवून दिले होते.

गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी गुरुवार, 17/11/2016 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
ढिश्श- क्लेमर! :- एका फाइव्हस्टार देऊळाच्या एका 'सेवक' भटजीची सद्य:~कालीन व्यथा! ;) गेले.. द्यायचे राहुनी तुमचे 500 शें चे ते ऒझे माझ्या माळ्यावरी.. आ.. त, करं-कचून बांधलेले..! आलो होतो देवळात मी काहि अभिषेकांसाठी फक्त वर्षाचे "झाले किती???" पाचशे पाचशे शोषिती रक्त अडिच लाखा चा दगड लावलाय त्यांन्नी सेह्विंग्ज ला बाकीच्यांचे निर्माल्य काहि.. शे-कोटिंचा पाचोळा! ================ मूळ गीतकार, गीत - आरती प्रभु

मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 17/11/2016 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी सांगा तुम्ही मला कशी जावू मी आता बाजारी या मोदी सरकारने, या तुमच्या मोदी सरकारने या या मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||धॄ|| मार्केटात आता आल्या नव्या नव्या साड्या घेण्यासाठी आम्हा सार्‍यांच्या पडतात उड्या लेटेस्ट फॅशन करायची आता पंचाईत झाली मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली या या मोदी सरकारने पाचशे हजाराची नोट बंद केली ||१|| भाजी पाला घेण्यासाठी मी गेले मार्कॅटात मोठ्या नोटा सोडून सार्‍या सुट्टे पैसे नव्हते हातात दररोजच्या जेवणाचीही पहा कशी चव गेली
काव्यरस

कणकवली येथे होणारे श्री सुभाष पाळेकर ह्यांची नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 12/11/2016 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, दिनांक २६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर ह्या दरम्यान श्री.सुभाष पाळेकर ह्यांची "नैसर्गिक शेती विषयी व्याख्यानमाला" कणकवली येथे होणार आहे. अधिक माहिती साठी श्री.सुनिल सावंत (९९६९५३४४३९) किंवा श्री. अमोल पाळेकर (९८८१६४६९३०) ह्यांच्याशी संपर्क साधावा. मी जाणार आहेच. आपलाच, (शेतकरी) मुवि ता.क. ====> सध्या माझ्याकडे आंतरजालाची जोडणी नसल्याने, वेळ मिळेल तसा मिपावर येत जाईन.

'चले जाव' चळवळः- काही प्रतिक्रिया

लेखक स्वामी संकेतानंद यांनी शनिवार, 12/11/2016 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
समजा १९४२ साली आतासारखी उठवळ माध्यमे असती तर काय बातम्या असत्या? १. गांधींनी जनतेस चिथावले ' करो या मरो', जनजीवन विस्कळीत २. आंदोलनकर्त्यांनी रेल्वे रूळ उखाडले, तारा कापल्या, जनतेचे हाल ३. गांधीसमर्थकांचा देशभर उच्छाद, आम आदमी घरात दडून! ४. वेळेत तार न पोचल्याने मुलगा आईच्या अंतिम दर्शनास मुकला ५. रेल्वे बंद, हजारो विद्यार्थी परीक्षेस मुकले ६. सर्वत्र अराजकतेचे दृश्य, आम आदमीची होत आहे गैरसोय ७. मजुरी बुडाल्याने गोदी कामगारांचा सवाल, 'आज चूल कशी पेटणार?' ८. इंग्रज सोडून गेल्यावर त्यांचे आर्दर्ली कुटुंबाचे पोट कसे भरणार?

रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी

लेखक ट्रेड मार्क यांनी मंगळवार, 08/11/2016 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
मोदी सरकारने रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी आणली आहे. लोकांकडे असलेल्या नोटा - ३ लाखांपर्यंत बँकांकडे व त्यावरील रक्कम आरबीआय कडे बदलून मिळेल त्यासाठी ३० डिसेंबर पर्यंत अवधी आहे. काळ्या पैश्यांविरोधात सरकारने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. याआधी काळा पैसा जाहीर करण्यासाठी मुदत दिली होती आणि दंड भरून तो पैसा नियमित करून घेता येत होता. त्या योजनेचा काही लोकांनी लाभ घेतला, पण ज्यांना वाटत होते की मोदी यापलीकडे काही करणार नाहीत त्यांना मात्र हा फार मोठा धक्का आहे. असे सांगितले जात आहे की या बदल्यात ५०० आणि २००० च्या नोटा येणार आहेत ज्यांना ट्रॅकर आहे.

म्हतारी...

लेखक विखि यांनी गुरुवार, 03/11/2016 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यान्दाच काय्तरी लिहीतोय, म्हनाव तस लिहीता येत नाहीये, जमून घ्या तेवढ..... तस पाहील तर हे घडुन तीन एक वर्ष झाली. पण आजबी दोन तीन दिवस झाले की सगळ समोर येत. कदाचीत याला कारण आजुबाजु ला घड्नार्या घटना असतील. आपली एक छोटी मदत एखाद्याला किती महत्वाची ठरु शकते ते मला त्या दिवशी कळाले. झाल अस की, माझा दिड वर्षाचा मुलगा पुण्यात एका मोठ्या हॉस्पिटलात अॅडंमिट होता. आय.सी. यु. ला असल्या मुळ तिथ बसुन देत नसत. म्हनुन मी बाहेर २/४ बाकडे होते तिथे येउन बसायचो, तिथे बरेच पेपर आणी मासिक ठेवलेले असायचे त्यामुळ तिथ जाउन कायतरी वाचत बसायच हा माझा कार्यक्रम ठरला होता.

जरा जपून

लेखक Bhagyashri satish vasane यांनी गुरुवार, 03/11/2016 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
बोलतांना जरा जपून बोलावं शब्द ही अर्थ बदलतात चालतांना जरा जपून चालावं कधी रस्ते ही घात करतात झुकतंना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजिर खुपसतात ओळखतांना जरा जपून ओळखावं कधी मानसे आपला रंग बदलतात पाऊल टाकतांना जरा जपून टाकावं कधी फुले ही काटे बनतात मागतांना जरा जपून मागाव कधी आपलेच भाव खातात नात जोडतांना जरा जपून जोडावं कधी नकळत धागे तुटून जातात...!