पैलवान-१
"मोप.... मोप... मोप पटांगण व्हतं राव!" शंकऱ्या, विनोद आणि रामाचे ग्लास धरलेले हात तोंडाशी जाईना, पुढचं ऐकण्यासाठी चकणा चावायचा पण थांबवला त्या तिघांनी.
"....तरीबी पब्लिक कुस्तीच्या रिंगणाजवळ एवढ दाटीवाटीनं बसल्यालं की एकाला ढकाल्ला असता तरी वळीन सगळी सांडली असती. कुस्तीच आशी आजाब लावल्याली! गावबी आजाबच म्हणायच! म्याबी लका पैलवान हाय, पण आपलीबी छाती झाली नस्ती त्या डोंगराच्या बगलत मान द्यायची. ह्ये मोठ्ठा तगडा राक्षिसावनी गडी आन दुसरं कोनतरी फाळकं होतं. पर अर्धा तास उलाटला तरी त्यो चिपाड काय पडना गड्या! त्या ढोल्यानं कुस्तीतले आसत्याल नसत्याल तेवढे डाव लावले पण ह्यो दुसरा काय दाद दिना!
मिसळपाव
नाटकापेक्षा आमच्या धंद्यात,
नेमका उलटा खेळ आहे.
तिथे भेळेला खाणारा आहे.
इथे खाणाय्राला-भेळ "आहे! "
स्टेज लागून तयार आहे.
नेपथ्यंही सज्ज आहे.
वधूपार्टी येऊन गरम,
आणी .. वरंपार्टी थंड आहे.