मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

मागे वळुन पाहताना..

मन्या ऽ ·
लेखनविषय:
मागे वळून पाहताना.. मागे वळुन पाहताना एक निरागस चेहरा दिसतो मज मनसोक्त खळखळुन हसताना मागे वळुन पाहताना तोच चेहरा दिसतो मज भेदरलेल्या डोळ्यांनी आसपास पाहताना मागे वळुन पाहताना लोकांचे चेहेरे न्याहाळताना तो चेहरा दिसे मज ओंगळवाण्या नजरा सहन करताना मागे वळुन पाहताना ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे पाहिले मी मुखवटे एकावर एक चढवताना मागे वळुन पाहताना स्वतःला आरशात बघताना पाहिले आहे मी स्वतःचीच किळस करताना मागे वळुन पाहताना ते स्पर्श सहन करताना पाहिले आहे मी स्वतःलाच तीळ तीळ तुटताना मागे वळुन पाहताना रोज रोज मरताना पाहिले आहे मी स्वतःलाच नैराश्याच्या खाईत झोकताना मागे वळुन पाहताना आज

हाक फोडी चांगुणा..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज सकाळी उठल्या उठल्याच रत्नाकर मतकरी गेल्याची बातमी कळली आणि सुन्न व्हायला झालं. कालच म्हणजे "सतरा मे"ला रात्री साडेअकराच्या सुमारास ते गेले. ज्येष्ठ साहित्यिक,नाटककार,रंगकर्मी,राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक अशी त्यांची बहुरंगी ओळख होती. सेवन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. इतके दिवस बातम्यांत ऐकू येणारा कोरोना आता परिचिताला झाला होता. मी तरुण वयात होते. एका दिवाळी अंकात त्यांची "पावसातला पाहुणा" ही कथा छापून आली होती. विलक्षण सुंदर गूढकथा होती ती! मला-आमच्या घरातल्या सर्वांनाच-आवडली होती.

पोलिटिकल कॅरेक्टनेसची हद्द

विद्यार्थी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
घरात एखादा पाळीव प्राणी असणे म्हणजे मोठी गम्मत असते. मांजरी तश्या स्वावलंबी असतात पण कुत्र्यांचे मात्र बरच करावे लागते. त्यातून कुत्रे जर अती एनर्जी असणारे असेल तर त्याला खेळवावे लागते. नाहीतर घरातल्या फर्निचरची वाट लागलीच म्हणून समाजा. बायकोला अनेक वर्षे विनवण्या वैगेरे करून शेवटी आम्ही एक लॅब्रॅडुडल कुत्रे घरी आणले. फार एनर्जी असते बाबा या कुत्र्यांच्यात, घरात खेळून काही दमेना. मग थोडी शोधाशोध केल्यावर घरापासून २-४ मैलांवर एक डॉग पार्क सापडले. अगदी मस्त आहे, लहान आणि मोठ्या कुत्र्यांसाठी वेगवेगळे भाग आहेत. आमच्या "कुकीला" सुद्धा हे डॉग पार्क फार आवडले.

टेस्ट

शेखरमोघे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अनेक दिवस काकांची भुणभुण चालू होती - आपण टेस्ट करून घ्यायला हवी. काकूनां वाटत होतं - काय जरूर आहे, सगळं व्यवस्थित तर आहे.  सकाळी उठल्यावर काकूंच्या लक्षांत आले - काका कधीच जामानिमा करून बाहेर पडले आहेत.  काकूंनी फक्त खात्री करून घेतली, बाहेर पडण्याचे कारण म्हणून वापरायची ढाल - वाणसामानाची पिशवी - काकांनी न विसरता बरोबर घेतली आहे.  कांही वेळाने लॅच उघडतानांचे काकांचे जोरजोरातले गुणगुणणे ऐकू आले, तेव्हा काकू स्वतःशीच पुटपुटल्या - खुषीत दिसताहेत म्हणजे टेस्ट निगेटिव्ह आली असावी, आता भुणभुण तरी कमी होईल.    लॅच उघडून आंत

शतशब्दकथा: अंगरखा

एस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुन्हा तेच आटपाट नगर होते. तोच राजा होता. तेच दरबारी होते. तीच प्रजा होती. तोच लहानगा होता. आणि पुन्हा तोच जादूचा अंगरखा होता. राजा पुन्हा बाहेर पडला. पुन्हा तो मुलगा ओरडला, "राजा नागडा!" राजा संतापला. परत गेला. दुसऱ्या दिवशी तोच प्रकार. तिसऱ्या दिवशीही तसंच. हे आता रोजचंच झालं. पब्लिकला त्याचं काही वाटेनासं झालं. कुजबूज चर्चेत बदलली. चर्चा मोठ्या आवाजात. आंदोलने झाली. उठाव झाले. दडपले गेले. राजा काही बधेना. जादूचा अंगरखा घालून फिरणे सोडेना. कुणाचेच ऐकेना. सूज्ञांनी हात टेकले. लोक दुर्लक्ष करू लागले. एक दिवस राजाला विषाणू डसला. राजा आजारी पडला. व्हेंटिलेटरवर गेला.

कृतघ्न -6

बाप्पू ·
याआधीचे भाग भाग 1 : https://www.misalpav.com/node/46154 भाग 2 : https://www.misalpav.com/node/46159 भाग 3: https://www.misalpav.com/node/46183 भाग 4: https://www.misalpav.com/node/46203 भाग -5 https://www.misalpav.com/node/46261 आता पुढे.. गाडी निघाली, आणि थेट सोलापूर च्या दिशेने धावू लागली. रामदास ला बाहेर पाहायचे होते कि आपल्याला नेमके कुठे नेले जातेय, पण त्याची मान उचलली जात नव्हती. तो जिवंत तर होता पण शरीराचे सर्व अस्तित्व च संपून गेले होते. माने पासून खाली आपले शरीर तो ना पाहू शकत होता ना त्याला कंट्रोल करू शकत होता.

निर्घृण खुन..

मन्या ऽ ·
लेखनविषय:
निर्घुण खुन.. काय अपराध होता तयांचा जे त्यांस असे मरण यावे? माणसांतल्याच लांडग्यांनी तयांस जीवे ऐसे मारीले या माणसांपरी ते लांडगे तरी बरे हेरतात ते सावज भुक शमविण्यासाठी संचारबंदी असोनी ऐसा जथ्था तेथ जमला अन् माणसांतल्या माणुसकीचा निर्घुण खुन तेथेची जाहला.. (Dipti Bhagat)

जालीय अस्तित्व अर्थात आयडी

प्रकाश घाटपांडे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आंतरजालावर मिपा, मायबोली, उपक्रम, मनोगत, ऐसी अक्षरे या सारखे काही संवादी संकेतस्थळे असतात. या आभासी मंचावर अनेक लोक आपल्या विचारांची, भावनांची अभिव्यक्ती मांडत राहतात. विषय कुठलेही वर्ज्य नाहीत, व्यक्त होणे सुसंस्कृत असावे एवढीच अपेक्षा. सभासद लिहू वाचू शकतात. सभासद नसलेले फक्त वाचु शकतात. सभासदाचा बायोडेटा त्याच्या अकाउंटवर ठेवता येतो. काही लोक तो फक्त आपल्या आयडी पुरता मर्यादित ठेवतात. खर्‍या नावाने लिहिणारे, पारदर्शी माहिती ठेवणारे फार थोडे. स्त्री की पुरुष,वय,रहिवास,व्यवसाय नोकरी इत्यादी व्यावहारिक माहिती. काही लोक देतात काही नाही.पारदर्शक नसण्याची अनेक कारणे असू शकतात.

विडंबन ( चायनाच्या वूहानमध्ये...)

मायमराठी ·
चाल -( निंबोणीच्या झाडामागे चंद्र...) चायनाच्या वूहानमध्ये, कोण शिंकला गं बाई कोरोनाच्या व्हायरसला, झोप का गं येत नाही।।धृ ।। किंवा (असा कोरोना कळेना, कसा जन्मला गं बाई) लोकं झोपले घरात, रस्त्यावर रोगराई दिवसभर फेसबुक, कसली गं नाही घाई लॉकडाऊन आशेचा, दारू मुळी मिळत नाही।।१।। कामवाली बाई नसता, भांडी घासणे कपाळी जरा चुना घेण्यासाठी, याचकाची आली पाळी काठी राखते समता, समजून गुरेगाई ।।२।। जगातल्या व्यवहारांची, होत आहे रोज माती स्पर्श कसे पसरत गेले, गात विध्वंसाची गाणी टेस्ट पॉझिटिव्ह येता, हातावर येई शाई।।३।। किंवा (विमानांतूनी उतरता) आरोग्यपथकं फिरती, माज त्यांना शिक्षा देई घेऊनी दगड हाती, रा

नवंविवाहित आणि जुनंविवाहित! (गप्पा)

अत्रुप्त आत्मा ·
लेखनप्रकार
एक नवविवाहित एका जुनंविवाहिताशी गप्पा मारतोय. नवं वि:-आता मी खूप आंनदात आहे. जुनं वि:- अजून काही दिवस तू 'असाच' आंनदात असणार नवं वि:- 'असाच' मंजे? जुनं वि:- 'असाच!' नवं वि:- मग नन्तर काय होईल? जुनं वि:- तू 'पाश्चात्तापदग्धवियोग' प्राप्त करवून घेशील नवं वि:- हा कोणता नवा योग जुनं वि:- छे रे छे! अरे बाळा,हा काळा बरोबर फुलत फुलत गेलेला योग आहे. नवं वि:- मंजे? जुनं वि:- अरे मुला,माझ्या गुलाबाच्या फुला, एक सांग ब्रे मला. तुला विवाहाच्या नवंमांडवा खालून पुढे सरून किती महिने झाले? नवं वि:-दोन! जुनं वि:- हां..म्हणूनच तुला येत नाही(अजून) फोन ...