मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

टेस्ट

शेखरमोघे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
अनेक दिवस काकांची भुणभुण चालू होती - आपण टेस्ट करून घ्यायला हवी. काकूनां वाटत होतं - काय जरूर आहे, सगळं व्यवस्थित तर आहे.  सकाळी उठल्यावर काकूंच्या लक्षांत आले - काका कधीच जामानिमा करून बाहेर पडले आहेत.  काकूंनी फक्त खात्री करून घेतली, बाहेर पडण्याचे कारण म्हणून वापरायची ढाल - वाणसामानाची पिशवी - काकांनी न विसरता बरोबर घेतली आहे.  कांही वेळाने लॅच उघडतानांचे काकांचे जोरजोरातले गुणगुणणे ऐकू आले, तेव्हा काकू स्वतःशीच पुटपुटल्या - खुषीत दिसताहेत म्हणजे टेस्ट निगेटिव्ह आली असावी, आता भुणभुण तरी कमी होईल.    लॅच उघडून आंत आल्यावर काकांचे लक्ष काकूंकडे जाता क्षणी काका ओरडले - बघ, लौकर जाऊन लाईनीत उभा राहिलो म्हणून दोन तरी बाटल्या मिळाल्या, नाहीतर हात हलवत परत यावे लागले असते!!    काकूंच्याही चेहेऱ्यावर खुषी उमटली.  

वाचने 2041 वाचनखूण प्रतिक्रिया 4

गामा पैलवान 07/05/2020 - 00:12
सटवाईला नव्हता नवरा अन म्हसोबाला नव्हती बायको! ;-) -गा.पै.

वामन देशमुख 07/05/2020 - 10:03
या कथेने शशक स्पर्धेत महिला क्रमांक प्राप्त केला असता!