मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

गूढ कथा: अक्कल दाढ

विवेकपटाईत ·

In reply to by श्वेता व्यास

विवेकपटाईत 23/02/2024 - 17:12
काही फाईल्स लाल फितीत नेहमीसाठी बंद ठेवणे योग्य असते. त्या उघडल्या तर उघडणाऱ्यालाच त्रास होण्याची शक्यता असते. कथेचा आशय सरकारी बाबू व्यवस्थित समजावून देऊ शकतो.

(काल्पनिक कथा) काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचताना दाढ दुखत आहे, असे वाटू लागले. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. सकाळी उठून ओळखीच्या दातांच्या डॉक्टरकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल.

रेवदंड्याचं दर्शन

पराग१२२६३ ·

गोरगावलेकर 20/02/2024 - 14:48
कोरलाई किल्ला : आत पाहण्यासारखं फारसं काही नसलं तरी पुरातत्व खात्यातर्फे किल्ला खूप छान राखला आहे. किल्ल्यावरून सागराचे तसेच कुंडलिका खाडीचेही सुरेख दर्शन होते. दोन वर्षांपूर्वी येथे जाऊन आले आहे आणि त्याबद्दल मिपावर लेखही लिहिला होता.

Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

तळजाई टेकडीवरील फिटनेसची जत्रा

चामुंडराय ·

कंजूस 09/02/2024 - 10:09
छानच. पायांनी रस्ते तुडवून शहरांमध्ये आरोग्य सुधारण्याची शक्यता नाही. ट्राफिकचे विषारी वायूच दिवसेंदिवस हवेत साठत आहेत. लोकांना भेटण्यासाठी मात्र जागा चांगली आहे.

तळजाई टेकडी मस्त आहे फेरफटका मारायला. तसेच वेताळ टेकडी, महात्मा टेकडी आणि परमहंस नगर (म्हातोबा) टेकडी सुद्धा. मात्र अजुन १०-१५ वर्षांनी पुण्यात टेकड्या आणि बागा राहतील का असा प्रश्न पडतो. बिल्डर आणि नगरसेवक लॉबीचा डोळा कधीपासुन यावर आहेच, कागदावर रेषा बदलल्या की सी आर झेड, ब्ल्यु लाईन, रेड लाईन सगळे झक मारत जाते. पैशानी सगळे मॅनेज होते. याशिवाय मोनो,मेट्रो, प्रस्तावित बालभारती रस्ता असे एक ना दोन विकास प्रकल्प टेकड्यांच्या मुळावर उठताहेत. भरीस भर म्हणुन रातोरात आगी लावुन झाडे जाळण्याचे प्रकार आहेतच. एकीकडे मशीन लावुन खणायचे, दुसरीकडे बंगले उठवायचे, तिसरीकडे झोपड्या बांधायच्या असे सर्रास चालु आहे. आता म्हणे थोरात उद्यानात मोनोरेल आणणार. स्थानिकांचा विरोध असुनही. बागेत रणगाडे,विमाने, डायनोसोर, सभा घेणे, गणपती विसर्जन सगळे काही चालते. काय राव? घ्या की जरा २ दिवस अ‍ॅडजस्ट करुन म्हटले की झाले.

टर्मीनेटर 09/02/2024 - 22:40
फिटनेस जत्रा आवडली 😀
भजी, सामोसा, थालीपीठ, डोसा अश्या खाद्यपदार्थापासून ते विविध प्रकारचे ज्यूसेस् आणि सुप्स्, स्प्राउटची भेळ असे तुलनेने पौष्टिक असलेले पदार्थ देखील उपलब्ध असतात आणि पुणेकरांच्या त्यावर उड्या पडतात.
हे परवडले….भल्या पहाटे घरून निघताना चहाही न पिता तिन-चार कि.मी. जॅागींगचे वर्तुळ पूर्ण करून मूळ स्थानी परतल्यावर पानवाल्याकडून सिगरेट घेउन पेटवणारे ‘महानुभव’ही पाहिले आहेत 😂

चौथा कोनाडा 10/02/2024 - 18:21
छान धागा, छान माहिती, छान प्रचि. तळजाई टेकडी झकास आहे, ८-१० वेळा जाण्याचे योग आले आहेत. रहता राहिलं जत्रेचं , आता जनताच एवढी आहे की जिथं तिथं जत्राच तयार होणार. रस्त्यांवर चालणारी सायकल हे चित्र लवकरच कालबाहय होईल असं दिसतंय... आमच्या कडं बरेच सायकल पट्टे (ट्रॅक) आहेत, पण सायकलस्वार क्वचितच दिसतात.

चामुंडराय 18/02/2024 - 09:42
गोरगावलेकर - हो, खरंच छान आहे तळजाई वन उद्यान. कंजूस - वाहतुकीचे प्रदूषण उद्यानाच्या आतमध्ये जाणवले नाही परंतु वाहने आणि वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे, हे खरे आहे. राजेंद्र मेहेंदळे - तळजाई टेकडीसाठी जागरूक नागरिकांचा दबाव गट आहे आणि ही मंडळी बिल्डर्स व इतरांवर लक्ष ठेवून आहेत असे कळले आहे. इतर टेकड्यांवर जाता आले नाही परंतु पुढच्या वेळेस नक्कीच जाईन. टर्मीनेटर - अगदी पहिल्यांदा तर इथे व्यायाम कमी आणि खादाडी जास्त आहे व जत्राच भरली आहे असे वाटले. चौथा कोनाडा - आजकाल उमम वर्गामध्ये गिअर असलेल्या हाय एन्डच्या सायकली घेण्याचे प्रमाण वाढत आहे असे दिसते, हा एक आशेचा किरण आहे.

Taljai1 गेल्या काही वर्षांमध्ये बहुसंख्य जनता ही आरोग्याबद्दल जागरूक झाली आहे. योगासने, विविध खेळ, व्यायामशाळा आणि इतर माध्यमांद्वारे आरोग्य आणि स्वास्थ्य मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. योग्य पोषण, व्यायाम, शारीरिक हालचाल (NEAT exercise) आणि पुरेशी विश्रांती ह्या द्वारे तंदुरुस्ती मिळवण्याचे आणि रोगांना दूर ठेवण्याचे अनेकांचे ध्येय आहे.

३० वर्षांपासून अखंडित....

पराग१२२६३ ·

नाॅर्थ ब्लॉकमधील असताना सलग पाच वर्ष परेड खुप जवळुन बघीतली. छान ,थोडक्यात आढावा इथे सादर केलात. संपूर्ण संकलनाचे एक काॅफी पुस्तक काढा. नक्कीच लोकांना आवडेल. धन्यवाद.

मी नेहरू प्लेस ला २-३ वर्षे नोकरी केली. २५ जानेवारी ला सक्तीचा हाफ डे मिळायचा सुरक्षा कारणास्तव . प्रत्यक्ष परेड दिल्लीत राहूनही पाहिली नाही . मुंबईस पळायचो सुट्टीसाठी. ऑफिसमधले सांगायचे कि नेहरू प्लेस हुन परेड जायची फार वर्षांपूर्वी

संग्रह सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही.

महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी स्मिताची सायकल यात्रा

मार्गी ·

चौथा कोनाडा 12/01/2024 - 18:12
अ ति श य कौतुकास्पद मोहिम !

अ‍ॅमेझींग !

YH1245DTGF आपल्या मोहिमेला भरघोस लाभो आणि पुढील वाटचाली साठी योग्य तो उद्देश सापडो या मनापासून शुभेच्छा !

मार्गी 24/01/2024 - 18:16
नमस्कार. स्मिताची गोवा मुंबई राईड मस्त सुरू आहे. पहिल्या दिवशी पोंडा ते सावंतवाडी 91 किमी, दुसऱ्या दिवशी सावंतवाडी ते राजापूर 114 किमी व आज राजापूर ते रत्नागिरी 65 किमी अंतर तिचं पूर्ण झालं. वाटेतले चढ, समुद्राजवळची ह्युमिडिटी, अनोळखी रस्ते असूनही ती जिद्दीने राईड करते आहे. वाटेत नर्सिंग महाविद्यालय, शाळा, सामाजिक संस्था अशा अनेक ठिकाणी तिचे कार्यक्रम होत आहेत. तिला ह्या रूटवर मदत करणाऱ्या सर्वांना धन्यवाद.

मार्गी 30/01/2024 - 19:28
नमस्कार. स्मिताची गोवा ते मुंबई सोलो सायकल मोहीम यशस्वी झाली. तिने 7 दिवसांमध्ये 600 किमी अंतर सायकल चालवली. वाटेतल्या शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स अशा विविध ठिकाणी तिचे कार्यक्रम झाले. चढाचे रस्ते व ह्युमिडिटी असूनही तिने जिद्दीने हे अंतर पार केलं. तिला ह्या प्रवासात अनेकांनी मदत केली. त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

नमस्कार. माझी मैत्रीण स्मिता अशी सायकल राईड करणार आहे- महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी सायकल यात्रा स्मिता मंडपमाळवीचे गोवा ते मुंबई सोलो सायकलिंग मोहीमेची उद्दिष्टे सामान्यत: प्रबोधनासाठी बैठका, चर्चा, ब्रॉशर्स व परिसंवाद अशा माध्यमांचा वापर केला जातो. पण इतरही पर्याय असतात. जेव्हा आपण सायकलिंगसारख्या अगदी वेगळ्या माध्यमाचा वापर करतो, तेव्हा आपण अनेक लोकांसोबत संवाद साधू शकतो व एखादी गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. हे लक्षात घेऊन मी, स्मिता मंडपमाळवी गोवा ते मुंबई एकटीने सायकल यात्रा करणार आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं.

वेगळा अनुभव देणारी एक गोष्ट!

मार्गी ·

तोच तोच पणा आहे. मालिकेत पुढे काय होणार याचा सहज अंदाज येतो. काहीतरी नवीन करावयास हवे. मालिका बघत नाही.

टीव्हीवरील मालिका बघण्या इतका वेळ आता नसतो. तरीही, ''शरीराच्या पातळीवर आई न होणं व त्याची वेदना, समाजाच्या नजरेमुळे होणारी घुसमट'' या समाजातील स्रियांच्या या महत्वाच्या पैलुंकडे दुर्लक्ष करता येत नाही. काहींना मुलंच होत नाही, अर्थात आधुनिक तंत्रज्ञानाने मुल होणं शक्य असले तरी अजूनही खुप गुंतागुंत आहेच. स्त्रियांची होणारी कुचंबना आणि त्रास आता काळ बदलला तरी कमी झालेला नाही. निसर्गही भयंकर बेक्कार आहे. सालं नै त्यांना भरभरुन दान टाकतो. काहींची तर अग्नी परिक्षा. सगळंच कठीण आहे. -दिलीप बिरुटे

✪ शारीरिक पातळीवर आई न होऊ शकण्याची वेदना ✪ घटस्फोट, ताण आणि सामाजिक चाको-या ✪ रक्तापलीकडच्या भावनिक नात्याची गुंफण ✪ डिप्रेशनमधून पुढे येणारी मुलगी- एक्स्प्रेशनची बॉस तेजश्री प्रधान ✪ बेस्ट सीईओ पण नापास बाबाचा प्रवास ✪ चाको-या मोडणारी "प्रेमाची गोष्ट" ✪ छोट्या "सईचा" अप्रतिम अभिनय नमस्कार. सामान्यपणे टीव्हीवरच्या मालिका म्हंटल्या की ठराविक मांडणी असते. त्याच त्या गोष्टी दाखवल्या जातात. क्वचितच काही उल्लेखनीय असं बघायला किंवा अनुभवायला मिळतं. पण सध्या असा एक अनुभव अनेकांनी घेतला येत असेल. स्टार प्रवाहवरची "प्रेमाची गोष्ट" मालिका!

वार्तालाप: कर्माची फळे आणि आधि भौतिक ताप

विवेकपटाईत ·

आणि समाजासाठी किंवा मित्रांसाठी किंवा नातेवाईकांसाठी केलेले कर्म वेगळे... ------ नौकरी करत असताना, उत्तम बॉस असेल आणि उत्तम सहाचारी असेल तर, कर्माचे फळ मिळतेच मिळते. पण, बॉस किंवा सहचारी साथ देत नसतील तर शिकायचे आणि नौकरी सोडून द्यायची. ------- सध्या वृद्धाश्रमात सेवा देत असल्याने, वृद्ध माणसांना उत्तम सेवा दिली की उत्तम फळ मिळतेच, ह्याचे खुप चांगले अनुभव आले आहेत. ------

तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे. आपण एखादे उद्दिष्ट ठेवून कर्म केले तर आपल्या इप्सिताप्रमाणेच फळ मिळेल असं काही नाही. पण त्यातून आपण काहीतरी शिकू जे कुठेतरी उपयोगीच पडेल, किंवा वेगळे काहीतरी फळ मिळेल. म्हणून फळ मिळणार नाहीये तर कर्मच कशाला करा अशी वृत्ती असू नये, असा अर्थ मी नेहमी घेते.

श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी असतात. एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली

अहिरावण ·

शाहु फुले आंबेडकर ह्या पुरोगामी विचारांच्या त्रयीतील सनातनींचा चातुर्वर्ण व्यवस्थेला सुरूंग लावून सनातनी जातीवाद्यांना सळो की पळो करून सोडनारे, दलित दिनदुबळ्यांना जातीवादातून ाहेर काढनारे, आधुनीक पुरोगामी महाराष्ट्राचे प्रणेते, भारतीय संविधानाचे जनक आदरणीय बाबासाहेब आंबेडकर ह्यांना अभिवादन.

Bhakti 06/12/2023 - 14:54
A माझ्या लेकीने हे चित्र मागच्या वर्षी बनवलं होतं(वयं ७) ,उत्स्फूर्तपणे आणि मला दाखवलं होतं .अजूनपर्यंत ती बाबासाहेबांविषयी अनेक गोष्टी आनंदाने सांगते.मराठी माध्यमातून ती शिकतेय ह्यामुळेच हे घडलं :)

In reply to by Bhakti

स्वधर्म 06/12/2023 - 16:06
पण तुमची मुलगी मराठी माध्यमातून शिकते आहे, हे वाचून आनंद झाला. माझी मुलेही मराठी माध्यमातूनच शिकली आणि त्यांना आणि मलाही त्याचा कसलाही तोटा जाणवलेला नाही.

स्वधर्म 06/12/2023 - 16:15
यांच्याविषयी नेहमी दलितांचे उध्दारकर्ते असे म्हटले जाते, पण खरे पाहता ते सगळ्या भारतीय नागरिकांचेच उध्दारकर्ते आहेत. कामगारांच्या हिताचे अनेक कायदे, शेतीबाबतचे कायदे (खोती पध्दत), स्त्रियांबाबतचे अनेक कायदे करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रूपयाच्या परिवर्तनियतेबाबतचा त्यांचा पी एचडीचा निबंध हा सुध्दा देशाच्या अर्थशास्त्राला दिशा देणार होता. त्यांनी इतरांच्या भावनेचा वापर करून आपल्या मनासारखे करून घेतले नाही. अंतरी अपार करूणा होती पण नेहमी बुध्दीवादाचा आधार घेतला. एवढा मोठा माणूस आपल्या देशात झाला याचा अभिमान वाटतो.

चौकस२१२ 07/12/2023 - 11:29
कोणीतरी पूरोगाम्यांची व्याख्या विचारली होती एक सुचलेली - जे बाबासाहेबांच्या आरक्षण आणि मुस्लिमांबद्दलचं काही परखड वक्तव्या कडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात https://www.firstpost.com/opinion/how-br-ambedkars-idea-of-islam-exposes-woolly-headed-liberals-of-the-day-10559281.html https://www.quora.com/What-were-Dr-Ambedkars-views-on-Islam - जे सावरकरांचच्या जातीनिर्मुलासाठी/ पतितपावन मंदिर सारखया प्रयत नांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात ते पुरोगामी कारण अशांना दोन्ही पचणारे नसते

In reply to by चौकस२१२

अहिरावण 07/12/2023 - 13:38
सहमत आहे. वरील व्याख्येत "लोका सांगे ब्रह्मज्ञान. स्वतः मात्र कोरडे पाषाण" ही उक्ती सार्थ करणारे ही टीप सुद्धा जोडा असे सुचवतो.

डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, अग्रणी सामाजिक सुधारक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय भिम !!

दिव्यांग दिवसानिमित्त एका संस्थेची ओळख

मार्गी ·
अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश: "सप्तर्षी फाउंडेशन" ✪ "इंटीग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन" ✪ बौद्धिक अक्षम मुलाकडून मिळालेली प्रेरणा ✪ बेवारसांचे वारस आम्ही ✪ जोडीने जाऊ पुढे ✪ संवेदनशीलतेची क्षमता ✪ "आमच्यासाठी आम्ही एक दिवसही काढला नव्हता" ✪ एक दिवस संस्थेचीही गरज उरू नये सर्वांना नमस्कार. आज ३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिवस. दिव्यांग ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये २१ प्रकारच्या दिव्यांग किंवा विविध प्रकारे विकलांग (differently abled) व्यक्तींचा समावेश होतो.

पीए नामा: आरक्षण आणि एका तरुणाची व्यथा कथा

विवेकपटाईत ·

रामचंद्र 07/11/2023 - 15:27
या बाबतीत मुस्लिम समाजाचे कौतुक करावेसे वाटते. फारशा सरकारी नोकऱ्या नाहीत. शिक्षण असतेच असेही नाही. पण रडत न बसता अंगमेहनत-छोटामोठा हंगामी का असेना स्वयंरोजगार करत या समाजातले तरुण आनंदात राहतात. एकमेकांना धरून राहणे आणि परिस्थितीशी शक्य तेवढे जमवून घेणे यामुळे बहुतेकदा ते तगून जातात. शिवाय वृद्ध व्यक्तींना घरातच कसे का होईना सांभाळले जाते, वृद्धाश्रमाची वाट दाखवली जात नाही. आणि आत्महत्या किंवा मानसिक रुग्ण यांचे प्रमाणही फारसे दिसत नाही. यातून इतरांनाही काही घेण्यासारखे नक्कीच आहे.

In reply to by रामचंद्र

अहिरावण 08/11/2023 - 19:08
सहमत आहे. कौटुंबिक एकोपा खूप असतो. वृद्धांना हाडहूड करण्याचे, डस्टबीन समजण्याचे, लाथ मारुन हाकलून देण्याचे प्रमाण हिंदू (विशेषतः ब्राह्मण) समाजापेक्षा खुप कमी आहे.

In reply to by अहिरावण

मी गेली, २०-२२ वर्षे, ह्या ना त्या नात्याने, वृद्धाश्रम आधारीत काम करत आहे... त्यामुळे, तशीच काही अडचण असल्याशिवाय, कुणीही (सामान्यत: किमान ९९%)घरातील वृद्धांना, वृध्दाश्रमात ठेवत नाही.. आणि वृद्ध माणसांना जातपात किंवा धर्म नसतो... ती सगळीच माणसे, पैलतीरावर नजर लावून बसलेली असतात...

In reply to by मुक्त विहारि

अहिरावण 09/11/2023 - 10:47
असहमतीबद्दल सहमती. गेल्या चाळीस वर्षांमधे आजुबाजूच्या पन्नास एक (त्यातील तीस एक ब्राह्मण) कुटुंबातील वृद्धांची वाताहात, विशेषतः आयटीमधे कामाला असलेल्या मुलामुलींनी केलेली आहे ती अगदी जवळून पाहिली आहे. अनेक जण वृद्धाश्रमात निधन पावल्यावर त्यांच्या त्याच गावात रहाणा-या मुलामुलींनी स्मशानात आम्ही नेणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा आमचा संबंध नाही अशी भुमिका घेतल्यावर समविचारी मित्रांच्या सहाय्याने त्यांचे अंतिम संस्कार केलेले आहेत. >>>तशीच काही अडचण असल्याशिवाय, कुणीही (सामान्यत: किमान ९९%)घरातील वृद्धांना, वृध्दाश्रमात ठेवत नाही.. तशीच काही अडचण केवळ २०-३० टक्के वृध्दांच्या बाबत असते. बाकी अडगड झालेले आहेत. >>ती सगळीच माणसे, पैलतीरावर नजर लावून बसलेली असतात... हे मात्र अगदी खरे...

In reply to by अहिरावण

रामचंद्र 09/11/2023 - 02:56
चाळीसेक वर्षांपूर्वीपर्यंतच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मण समाजात जेवढी तडजोडीची-जमवून घेण्याची वृत्ती होती, ती आता कमी झालेली दिसते. याला आर्थिक परिस्थितीत झालेली सुधारणा हे कारण वाटते. मात्र बऱ्यापैकी उच्चशिक्षित आणि सुस्थितीत असलेल्या बहुजनसमाजात ब्राह्मणांचा हा दुर्गुण सुदैवाने अजूनतरी तितकासा दिसून येत नाही. त्यांचाही शेतीचा आधार फारसा राहिला नाही. बहुतेकजण नोकरीपेशातच स्थिरावले आहेत. पण माणसं धरून ठेवण्याकडेच त्यांचा एकंदरीत कल दिसतो.

विजुभाऊ 07/11/2023 - 16:06
सरकारी नोकरी हा एक मोठा छलावा आहे. त्यातूनही युपीएस्सी ची परिक्षा ही उगाचच घरातल्याना आशा लावण्यासाठी ठेवली असावी असेच वाटते. सी ए पार्ट २ ही परीक्षा देखील अशीच. पार्ट १ बरेचजण क्लीअर करतात. आणि मग वर्षानुवर्षे पार्ट २ करत बसतात. निदान ते काही क्लेरीकल काम तरी करत असतात. कामाची लाज वाटणे या बरोबरच घरातल्यानी सहन करणे हे सर्वात मोठे कारण असते असल्या कर्मदरिद्री वागण्याचे. ( शब्द वाईट आहे .............पण वस्तुस्थिती आहे ही)

स्वधर्म 09/11/2023 - 19:26
या लेखाच्या शिर्षकात आरक्षण आहे, पण मजकूराशी त्याचा संबंध समजला नाही.

In reply to by स्वधर्म

सर टोबी 09/11/2023 - 22:17
सदर धागालेखकांच्या लेखांमध्ये मोदींची स्तुती अथवा मागील सरकारांवरील टिका अथवा दोन्ही गोष्टी कोणत्याही संदर्भाशिवाय येऊ शकतात.

In reply to by सर टोबी

सुबोध खरे 13/11/2023 - 09:41
आपला कोणताही प्रतिसाद श्री मोदींबद्दल गरळ टाकल्याशिवाय आला आहे का? इतका मोदीद्वेष बरा नव्हे प्रकृतीला. काळजी घ्या

(काही सत्य सत्य आणि काही काल्पनिक ) आठ- नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी जर सहा साडेसहा पर्यंत कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी चार्टर्ड बस घेत होतो. चार्टर्ड बस मध्ये सीटवर बसायला मिळत असे. त्या बसेस मध्ये जनकपुरी आणि उत्तम नगर जाणारे सरकारी कर्मचारी असायचे. जनकपुरी येथे राहणाऱ्या सुनील( टोपण नाव) नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याशी माझे चांगली ओळख झाली होती. एक दिवस त्याने मला विचारले पटाईत, तुझा ओळखीचा एखादा चांगला मनोचिकित्सक आहे का. कारण विचारल्यावर त्याने मला सांगितले त्याचा 32 वर्षाचा लहान भाऊ डिप्रेशन मध्ये आहे, नौकरी सोडा, घरात ही काही काम करत नाही. दिवसभर शून्यात पाहत बसून राहतो.