मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३ ·
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

रिमोट..

आजी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आधुनिक जगाचा कळीचा शब्द म्हणजे रिमोट. तो अनंत,अगाध, सर्वसमावेशक शब्द आहे. तो सर्व जग व्यापून दशांगुळे उरलेला शब्द आहे. घरीदारी रिमोट हवाच. लहान मुलांच्या खेळण्यात रिमोट हवा. तिथपासून ते प्रत्यक्षातले यान उडविण्यासाठीही रिमोट हवा. मोठमोठे नेते अनेक प्रकल्पांचं उद्घाटन प्रत्यक्ष तिथं न जाता रिमोटनं करतात. अगदी ग्रामपंचायती ते अख्ख्या देशाचा रिमोट कुणाच्या तरी हातात असतो. (महिला सरपंचबाईंचा रिमोट त्यांच्या नवऱ्याच्या हातात असतो.) आघाडी म्हणू नका,दल म्हणू नका, युति, गठबंधन, ब्रिगेड,सेना, काही म्हणू नका. प्रत्येकाला एक रिमोट असतो आणि तो भलत्याच कुणा माणसाच्या हातात असतो.

सुपरहिरो क्लॉ-एक्स वर एक लघुपट

विजयशेट्टी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, बर्‍याच लोकांना आठवत असेल की राज कॉमिक्स एक शॉर्ट फिल्म घेऊन आली होती, बहुधा फक्त 2, प्रत्येकाकडून पैसे गोळा केले होते, त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता असताना, ज्यांनी मास फंडिंग दिले त्यांना क्रेडिट सुद्धा मिळाले नाही (असे असावे) डोगा लोक शॉर्ट फिल्म बद्दल माहितीही नव्हती आणि काही प्रकाशन त्यांच्या व्यक्तिरेखेची शॉर्ट फिल्म काढणार होते, राज कॉमिकचे नाव विसरले लोकांनी नागराजची सिरीयल घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना नकार मिळाला आणि मालिका खूप चांगली निघाली .

आम्हां काय त्याचे ??!

आजी ·
लेखनप्रकार
अकरा मे चा दिवस. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता. रिटायर्ड केंद्र सरकार कर्मचारी श्रीमती. राधाबाई, सकाळी अकरा वाजल्यापासून टीव्हीसमोर बसलेल्या होता. त्यांचं असं नेहमीच होतं. क्रिकेट मॅच (त्यात भारत खेळत असला पाहिजे हं मात्र! 'इतर' दोन देशातल्या मॅचमध्ये उनको इंटरेष्ट नहीं ।) हां ,तर क्रिकेट मॅच -अगदी बाॅल टु बाॅल-,निवडणुकींचे निकाल,(विधानसभा, लोकसभा, अगदी पंचायत समित्यांचे सुद्धा), कोर्टाचे निकाल, असं काही असेल तर राधाबाई पहाटे उठून, लवकर सर्व आटोपून, शुचिर्भूत होऊन,धूतवस्त्र नेसून,सुखासनात टीव्ही समोर बसत. नजर (नासिकाग्रावर नव्हे तर) टीव्हीवर खिळलेली असे!