तळजाई टेकडीवरील फिटनेसची जत्रा
लेखनप्रकार
वाचने
2838
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
वन उद्यान मस्तच
छानच.
पायांनी रस्ते तुडवून शहरांमध्ये आरोग्य सुधारण्याची शक्यता नाही. ट्राफिकचे विषारी वायूच दिवसेंदिवस हवेत साठत आहेत. लोकांना भेटण्यासाठी मात्र जागा चांगली आहे.
तळजाई टेकडी मस्त आहे फेरफटका मारायला. तसेच वेताळ टेकडी, महात्मा टेकडी आणि परमहंस नगर (म्हातोबा) टेकडी सुद्धा.
मात्र अजुन १०-१५ वर्षांनी पुण्यात टेकड्या आणि बागा राहतील का असा प्रश्न पडतो. बिल्डर आणि नगरसेवक लॉबीचा डोळा कधीपासुन यावर आहेच, कागदावर रेषा बदलल्या की सी आर झेड, ब्ल्यु लाईन, रेड लाईन सगळे झक मारत जाते. पैशानी सगळे मॅनेज होते.
याशिवाय मोनो,मेट्रो, प्रस्तावित बालभारती रस्ता असे एक ना दोन विकास प्रकल्प टेकड्यांच्या मुळावर उठताहेत. भरीस भर म्हणुन रातोरात आगी लावुन झाडे जाळण्याचे प्रकार आहेतच. एकीकडे मशीन लावुन खणायचे, दुसरीकडे बंगले उठवायचे, तिसरीकडे झोपड्या बांधायच्या असे सर्रास चालु आहे.
आता म्हणे थोरात उद्यानात मोनोरेल आणणार. स्थानिकांचा विरोध असुनही. बागेत रणगाडे,विमाने, डायनोसोर, सभा घेणे, गणपती विसर्जन सगळे काही चालते. काय राव? घ्या की जरा २ दिवस अॅडजस्ट करुन म्हटले की झाले.
फिटनेस जत्रा आवडली 😀
भजी, सामोसा, थालीपीठ, डोसा अश्या खाद्यपदार्थापासून ते विविध प्रकारचे ज्यूसेस् आणि सुप्स्, स्प्राउटची भेळ असे तुलनेने पौष्टिक असलेले पदार्थ देखील उपलब्ध असतात आणि पुणेकरांच्या त्यावर उड्या पडतात.हे परवडले….भल्या पहाटे घरून निघताना चहाही न पिता तिन-चार कि.मी. जॅागींगचे वर्तुळ पूर्ण करून मूळ स्थानी परतल्यावर पानवाल्याकडून सिगरेट घेउन पेटवणारे ‘महानुभव’ही पाहिले आहेत 😂
छान धागा, छान माहिती, छान प्रचि.
तळजाई टेकडी झकास आहे, ८-१० वेळा जाण्याचे योग आले आहेत.
रहता राहिलं जत्रेचं , आता जनताच एवढी आहे की जिथं तिथं जत्राच तयार होणार.
रस्त्यांवर चालणारी सायकल हे चित्र लवकरच कालबाहय होईल असं दिसतंय... आमच्या कडं बरेच सायकल पट्टे (ट्रॅक) आहेत, पण सायकलस्वार क्वचितच दिसतात.
अजून दहा वर्षे थांबा.
इ व्यायाम करणारी पिढी येईल. म्हणजे टेकड्यांनी नकोत आणि जत्राही नसेल.
तळजाई पठाराजवळच्याच ठुबे बंगल्यासंदर्भात कुणाचे काही अनुभव आहेत काय?
In reply to तळजाई पठाराजवळच्याच ठुबे by रामचंद्र
शिवाजीनगर ला एच डी एफ सी बॅक शेजारीच एक ठुबे पार्क नावाचा मोठ्ठा बंगला आहे. बहुगतेक कुणी सरदार असावेत.
In reply to तळजाई पठाराजवळच्याच ठुबे by रामचंद्र
इथं इस्तृत चर्चा आहे.
https://www.maayboli.com/node/79712
गोरगावलेकर - हो, खरंच छान आहे तळजाई वन उद्यान.
कंजूस - वाहतुकीचे प्रदूषण उद्यानाच्या आतमध्ये जाणवले नाही परंतु वाहने आणि वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे, हे खरे आहे.
राजेंद्र मेहेंदळे - तळजाई टेकडीसाठी जागरूक नागरिकांचा दबाव गट आहे आणि ही मंडळी बिल्डर्स व इतरांवर लक्ष ठेवून आहेत असे कळले आहे. इतर टेकड्यांवर जाता आले नाही परंतु पुढच्या वेळेस नक्कीच जाईन.
टर्मीनेटर - अगदी पहिल्यांदा तर इथे व्यायाम कमी आणि खादाडी जास्त आहे व जत्राच भरली आहे असे वाटले.
चौथा कोनाडा - आजकाल उमम वर्गामध्ये गिअर असलेल्या हाय एन्डच्या सायकली घेण्याचे प्रमाण वाढत आहे असे दिसते, हा एक आशेचा किरण आहे.
लेख आवडला