मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समाज

गूढ कथा: अक्कल दाढ

विवेकपटाईत ·
(काल्पनिक कथा) काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचताना दाढ दुखत आहे, असे वाटू लागले. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर डोक्यात वेदनाही. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली. सकाळी उठून ओळखीच्या दातांच्या डॉक्टरकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल.

रेवदंड्याचं दर्शन

पराग१२२६३ ·
Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

तळजाई टेकडीवरील फिटनेसची जत्रा

चामुंडराय ·
Taljai1 गेल्या काही वर्षांमध्ये बहुसंख्य जनता ही आरोग्याबद्दल जागरूक झाली आहे. योगासने, विविध खेळ, व्यायामशाळा आणि इतर माध्यमांद्वारे आरोग्य आणि स्वास्थ्य मिळवण्याचे प्रयत्न होत आहेत. योग्य पोषण, व्यायाम, शारीरिक हालचाल (NEAT exercise) आणि पुरेशी विश्रांती ह्या द्वारे तंदुरुस्ती मिळवण्याचे आणि रोगांना दूर ठेवण्याचे अनेकांचे ध्येय आहे.

३० वर्षांपासून अखंडित....

पराग१२२६३ ·
संग्रह सव्वीस जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाल्यावर भारत सार्वभौम, प्रजासत्ताक झाला. तेव्हापासूनच दरवर्षी 26 जानेवारीला देशभर प्रजासत्ताक दिनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ लागलं. त्या कार्यक्रमांपैकी सर्वात मुख्य कार्यक्रम असतो नवी दिल्लीत आयोजित होणारे संचलन आणि अन्य कार्यक्रम. हा सोहळा मी 30 वर्षांपूर्वी पहिल्यांदा दूरदर्शनवर पाहिला होता आणि तेव्हाच मला तो प्रचंड भावलाही.

महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी स्मिताची सायकल यात्रा

मार्गी ·
नमस्कार. माझी मैत्रीण स्मिता अशी सायकल राईड करणार आहे- महिलांचा फिटनेस व कँसरबद्दल संवादासाठी सायकल यात्रा स्मिता मंडपमाळवीचे गोवा ते मुंबई सोलो सायकलिंग मोहीमेची उद्दिष्टे सामान्यत: प्रबोधनासाठी बैठका, चर्चा, ब्रॉशर्स व परिसंवाद अशा माध्यमांचा वापर केला जातो. पण इतरही पर्याय असतात. जेव्हा आपण सायकलिंगसारख्या अगदी वेगळ्या माध्यमाचा वापर करतो, तेव्हा आपण अनेक लोकांसोबत संवाद साधू शकतो व एखादी गोष्ट त्यांच्यासोबत शेअर करू शकतो. हे लक्षात घेऊन मी, स्मिता मंडपमाळवी गोवा ते मुंबई एकटीने सायकल यात्रा करणार आहे. हो, तुम्ही बरोबर वाचलं.

वेगळा अनुभव देणारी एक गोष्ट!

मार्गी ·
✪ शारीरिक पातळीवर आई न होऊ शकण्याची वेदना ✪ घटस्फोट, ताण आणि सामाजिक चाको-या ✪ रक्तापलीकडच्या भावनिक नात्याची गुंफण ✪ डिप्रेशनमधून पुढे येणारी मुलगी- एक्स्प्रेशनची बॉस तेजश्री प्रधान ✪ बेस्ट सीईओ पण नापास बाबाचा प्रवास ✪ चाको-या मोडणारी "प्रेमाची गोष्ट" ✪ छोट्या "सईचा" अप्रतिम अभिनय नमस्कार. सामान्यपणे टीव्हीवरच्या मालिका म्हंटल्या की ठराविक मांडणी असते. त्याच त्या गोष्टी दाखवल्या जातात. क्वचितच काही उल्लेखनीय असं बघायला किंवा अनुभवायला मिळतं. पण सध्या असा एक अनुभव अनेकांनी घेतला येत असेल. स्टार प्रवाहवरची "प्रेमाची गोष्ट" मालिका!

वार्तालाप: कर्माची फळे आणि आधि भौतिक ताप

विवेकपटाईत ·
श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी असतात. एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली

अहिरावण ·
डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, यांना आपण सर्वजण डॉ.बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखतो. दरवर्षी ६ डिसेंबर हा बाबासाहेबांचा पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. संविधानाचे जनक, दलितांचे उद्धारकर्ते, अग्रणी सामाजिक सुधारक अशा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भावपूर्ण श्रध्दांजली ! जय हिंद ! जय महाराष्ट्र !! जय भिम !!

दिव्यांग दिवसानिमित्त एका संस्थेची ओळख

मार्गी ·
अंधारामध्ये आपण मिळून आणू प्रकाश: "सप्तर्षी फाउंडेशन" ✪ "इंटीग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन" ✪ बौद्धिक अक्षम मुलाकडून मिळालेली प्रेरणा ✪ बेवारसांचे वारस आम्ही ✪ जोडीने जाऊ पुढे ✪ संवेदनशीलतेची क्षमता ✪ "आमच्यासाठी आम्ही एक दिवसही काढला नव्हता" ✪ एक दिवस संस्थेचीही गरज उरू नये सर्वांना नमस्कार. आज ३ डिसेंबर म्हणजे जागतिक दिव्यांग दिवस. दिव्यांग ही तशी खूप व्यापक संकल्पना आहे. त्यामध्ये २१ प्रकारच्या दिव्यांग किंवा विविध प्रकारे विकलांग (differently abled) व्यक्तींचा समावेश होतो.

पीए नामा: आरक्षण आणि एका तरुणाची व्यथा कथा

विवेकपटाईत ·
(काही सत्य सत्य आणि काही काल्पनिक ) आठ- नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी जर सहा साडेसहा पर्यंत कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी चार्टर्ड बस घेत होतो. चार्टर्ड बस मध्ये सीटवर बसायला मिळत असे. त्या बसेस मध्ये जनकपुरी आणि उत्तम नगर जाणारे सरकारी कर्मचारी असायचे. जनकपुरी येथे राहणाऱ्या सुनील( टोपण नाव) नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याशी माझे चांगली ओळख झाली होती. एक दिवस त्याने मला विचारले पटाईत, तुझा ओळखीचा एखादा चांगला मनोचिकित्सक आहे का. कारण विचारल्यावर त्याने मला सांगितले त्याचा 32 वर्षाचा लहान भाऊ डिप्रेशन मध्ये आहे, नौकरी सोडा, घरात ही काही काम करत नाही. दिवसभर शून्यात पाहत बसून राहतो.