मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विं दा करंदीकर यांचे निधन

डॉ.प्रसाद दाढे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ज्येष्ठ कवि व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित विं दा करंदीकर यांचे मुंबईत भाभा रूग्णालयात निधन झाले.. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो..

वाचने 6937 वाचनखूण प्रतिक्रिया 28

विसोबा खेचर 14/03/2010 - 11:03
खूप मोठा माणूस गेला..! विनम्र श्रद्धांजली. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

केशवसुमार 14/03/2010 - 23:35
खूप मोठा माणूस गेला!! :( माझे सगळ्यात आवडते कवी.. विंदा, बापट आणि पाडागांवकरांचा कवितांचा कर्यक्रम ऐकला आणि बाजारातून लगेच जाउन त्यांची धृपद आणि स्वेदगंगा ही पुस्तके विकत घेतली..त्यांची किती पारायणे केली माहिती नाही... आजचा दिवस खूप वाईट दिवस आहे.. :( , :( विंदांना विनम्र श्रद्धांजली. (दु:खी )केशवसुमार

II विकास II 14/03/2010 - 11:04
भावपुर्ण श्रद्धांजली. आजचा दिवस वाईट जाणार.

चिरोटा 14/03/2010 - 11:15
विंदांना विनम्र श्रद्धांजली. भेंडी P = NP

आशिष सुर्वे 14/03/2010 - 11:50
विंदांना भावपुर्ण श्रद्धांजली. मराठी जनता आपली सदैव उपकृत राहिल.. ====================== विंदांना भावांजली..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 14/03/2010 - 14:01
विंदाच्या कितीतरी सुरेख कविता असतील, पण विंदा म्हटले की मला साठीचा गझल, कावेरी डोंगरे, धोंड्या न्हावी, माझ्या मना बन दगड, ती जनता अमर आहे. अशा कवितांचे स्मरण होते. मोठा माणूस गेला. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रा 14/03/2010 - 19:19
असेच म्हणते - मोठा माणूस गेला. मला आठवतात ते एटू लोकांचा देश, अजबखाना आणि अशाच लहानपणी वाचलेल्या अनेक कविता..

बिपिन कार्यकर्ते 14/03/2010 - 14:37
यमाच्या बैलाला.... !!!!!!!!!!! आज माझ्या मनाला दगड बनायला सांगतो आहे पण नाही बनत आहे... :( बिपिन कार्यकर्ते

अनामिका 14/03/2010 - 14:41
नि:शब्द! भावपुर्ण आदरांजली! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

JAGOMOHANPYARE 14/03/2010 - 14:44
विंदाना श्रद्धांजली.. वि स खांडेकर वि वा शिरवाडकर आणि मग विन्दा करंदीकर नावाची सुरुवात वि ने आणि शेवट कर ने झाल्याशिवाय मराठी माणसाला ज्ञानपीठ मिळत नाही, हे सिद्ध करणारे लेखक हरपले.. *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

चिंतातुर जंतू 14/03/2010 - 15:38
देणार्‍याचे हात घ्यावे म्हणणार्‍या विंदांचे आग्रही व एकांगी लिखाणाविषयीचे विचार आपणा सर्वांस मननीय ठरावेत...
वैशिष्ट्यपूर्ण नवे लेखन करणारे लेखक हे काही वेळा एकांगी दृष्टिकोनाचा अंगीकार करतात आणि तो आक्रमक रीतीने व्यक्तही करतात. अशा वेळी सुबुद्ध वाचकांनी, त्यांनी तसे करणे कदाचित त्यांच्या लेखनाला उत्तेजक ठरत असेल व ती त्यांच्या सृजनवृत्तीची निकड असेल, हे लक्षात घेऊन त्यांच्या लेखनातील अंगभूत गुणवत्तेकडे दुर्लक्ष करू नये. सुबुद्ध वाचकांनी आपला दृष्टिकोन खुला ठेवावा आणि अभिरुचीच्या सापेक्षतेची नेहमी दखल बाळगावी. वाड्‌.मयीन महात्मता ही मुख्यतः मूल्याधिष्ठित अथवा गुणाधिष्ठित असली तरी तीसुद्धा अपरिवर्तनीय नसते. आग्रही व एकांगी दृष्टिकोनावर वाड्‌.मयेतिहासांचे डोळस वाचन हाच खरा उतारा आहे.
(साहित्य अकादमीची फेलोशिप स्वीकारताना केलेले भाषण, १९६६) साभार: सकाळ - चिंतातुर जंतू

हेरंब 14/03/2010 - 15:40
अरेरे, फार मोठा कवि गेला. अशी व्यक्ति पुन्हा न होणे. आमच्या आदर्शांपैकी आता फारच थोडे लोक राहिलेत या जगांत.

बाबुराव 14/03/2010 - 16:43
कारे नाडवीसी | आपुल्या मनासी ; पोषितो कुणासी ?| जगी कोण ? महारोग्यापोटी | पोरांची खिल्लारे ; जीवन तया रे | कोण देतो ? कोणे केली बाळा | दु:खाची उत्पत्ती वाढवी श्रीपती | पाप-पुण्य कोणी दिली भूक ? | कोणे दिले रोग? दारिद्र्याचे भोग दिले कोणी ? दु:खाच्या अनंता | भोगितो संसार ; येई भागाकार | आत्मरुपे. आत्म्याचे हे गुह्य | ब्रह्माला ना ठावे ; त्याच्या वंशा जावे | तेव्हा कळे. जन्माच्या प्रश्नाला | मृत्युचे उत्तर; देई विश्वंभर | दुजे काय ? सारे दु:ख मानवनिर्मिती हायेत. त्यात देवाचा काय रोल नाय. जल्माच्या प्रश्नाला मृत्यु एवढंच उत्तर देवाकडं. देव दुसरं कायबी देऊ शकत नाही. देवालाबी जाब इचारणारा लय मोठा माणूस हरपला. भावपूर्ण श्रध्दांजली. बाबुराव :(

रेवती 14/03/2010 - 17:55
विनम्र श्रद्धांजली!:( रेवती

In reply to by मुक्तसुनीत

नितिन थत्ते 14/03/2010 - 22:32
असेच म्हणतो. माझीही आदरांजली. :( नितिन थत्ते

In reply to by मुक्तसुनीत

सुनील 15/03/2010 - 06:57
भावपूर्ण श्रद्धांजली! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दिपाली पाटिल 14/03/2010 - 21:08
विनम्र श्रध्दांजली... दिपाली :

सुमीत भातखंडे 14/03/2010 - 21:29
विनम्र आदरांजली!!!

प्राजु 14/03/2010 - 22:50
माझी ही आदरांजली. मराठी साहित्याचा मोठा आधार गेला. - (सर्वव्यापी)प्राजक्ता http://www.praaju.com/

मिसळभोक्ता 14/03/2010 - 23:06
लिहिता लिहिता विंदा काय लिहून गेले, हे त्यांचे त्यांनाच कळले असेल की नाही, कुणास ठाऊक. ते म्हणाले, धुंदीस ह्या गतीच्या, सारेच पंथ प्यारे एका अर्थाने, पंथ हा शब्द धर्मांच्या उपशाखा, म्हणजे शिया-सुन्नी वगैरे, किंवा विहिंप-शिवसेना वगैरे, असा काहीसा. आम्हा संकेतस्थळ धार्मिकांसाठी, पंथ म्हणजे मनोगत, उपक्रम, मिसळपाव, मीमराठी वगैरे. ज्यांच्या आयुष्यात गती नाही, त्यांना हे सगळे पंथ वेगवेगळे. आमच्या गतिमान आयुष्यासाठी मात्र, हे सर्व पंथ सारखेच. विंदा, जियो ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

चतुरंग 15/03/2010 - 20:14
कालातीत तत्वे सांगणार्‍या महान लोकांचे विचार कसे सर्वंकष असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. देणार्‍याने देत जावे घेणार्‍याने घेत जावे म्हणणार्‍या विंदांचे हात धरुन परमेश्वराने त्यांनाच जवळ बसवून घेतले! (दु:खी)चतुरंग

प्रभो 15/03/2010 - 08:03
माझीही आदरांजली. --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! प्रभोवाणी

दिपक 15/03/2010 - 16:26
भावपुर्ण आदरांजली.