Skip to main content

साहित्यिक

हार्दिक निमंत्रण !

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 17/12/2009 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त मिपा परिवार , नमस्कार ! वाचकहो , मिपावर वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या माझ्या कवितांना आपण यथोचित प्रतिसाद दिलात. याच कवितांचा काव्यसंग्रह "साधा माणूस" या नावानं वंदना प्रकाशनाच्यावतिने प्रकाशित होत आहे. हा प्रकाशनसोहळा कोकण मराठी साहित्य परिषद , गिरगाव शाखेच्या विद्यमाने गुरूवार दि.७ जानेवारी २०१०रोजी सायं. ६ वाजता मुंबई मराठी साहित्य संघाच्या डॉ. पुरंदरे सभागृह, गिरगाव येथे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक याच्याशुभहस्ते , पं यशवंत देव आणि ज्योतिर्भास्कर जयंत सळगावकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. .

पूर्व दिशेला अरूण पथावर..

लेखक प्राजु यांनी रविवार, 29/11/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक धिंगाणा डॉट कॉम वर जाऊन आवाज चांदण्यांचे -२ या अल्बम मधली गाणी ऐकायचा मूड झाला. मनात आलं आणि मी चालू केली गाणी. ऐकता ऐकता, पूर्व दिशेला अरूण पथावर ध्वज सोन्याचा झळकत सुंदर .. पी. सावळाराम यांनी लिहिलेलं , हृदयनाथ मंगेशकरांचा संगित साज ल्यायलेलं , धर्मकन्या या चित्रपटातलं आशा भोसले यांच्या आवाजातलं गाणं ऐकलं.. आणि मन जवळ जवळ २० वर्ष मागे गेलं. नक्की या गाण्यामुळे गेलं की, त्या गाण्याशी जोडलेल्या आठवणींमुळे हे सांगणं खरंच कठीण आहे. आठवणींच्या मळ्याचं एक बरं असतं, वेळी-अवेळी कधीही तिथे जा.. तिथे नेहमीच सुगी असते. दुष्काळ सहसा नसतोच.

आहे मनोहर तरी

लेखक जयवी यांनी रविवार, 29/11/2009 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
सुनिता देशपांडे ह्यांचं “आहे मनोहर तरी” हे पुस्तक फार पूर्वी म्हणजे अगदी शाळकरी वयात वाचलं होतं. त्यावेळी त्यांचा खूप राग आला होता…की आपल्या पु.ल.देशपांडेंबद्दल असं कसं काय लिहिलं त्यांनी. म्हणजे तसं काही वाईट लिहिलं नव्हतं पण ….तरीसुद्धा आतून कुठे तरी वाईट वाटलं होतं. आता लग्न होऊन स्थिरस्थावर झाल्यानंतर…. नवरा-बायकोचं खरं नातं कळल्यानंतर…. थोडी परिपक्व झालीये असं वाटल्यानंतर….. अगदी ठरवून पुन्हा एकदा वाचलं हे पुस्तक आणि अगदी मनापासून भिडलं मनाला. आपण कधी कधी फक्त एकाच बाजूने विचार करतो आणि तोच बरोबर आहे असं गृहीतही धरतो. पण जेव्हा दुसरी बाजू आपल्याला कळते तेव्हा मात्र ओशाळल्यासारखं होतं.

इलिनॉईच्या दुगाण्या

लेखक शरदिनी यांनी गुरुवार, 19/11/2009 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
किंचित झरणी बोधित करणी मेलामेली भर्तृहरी अमर्त्य सेना वसंतसेना सेनासमथिंग कलहारी तूच सहारा... तूच सहारा रखरखीत या गूगल संकटनेवारी संतसंतिणी , मुग्ध हिरॉईनी उपग्रहाचा त्वरितध्वनी शरीरबांधणी भेटीगाठी रिचर्ड बेकहॅम चपळ त्रिपाठी ओहो राहुल आहा राहुल ब्रायन लारा दत्ता भट ब्रायन लारा दत्ता भट
काव्यरस

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

आठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई

लेखक दिपक यांनी सोमवार, 09/11/2009 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
काल पु.लंची जंयती आणि त्याच्या एक दिवस आधी सुनीताबाईंच्या जाण्याने अवघे साहित्यविश्व हळहळले. वरुन कडक शिस्तीच्या आणि करारी व्यक्तिमत्वाच्या पण आतुन मृदू स्वभावाच्या सुनीताबाई ‘आहे मनोहर तरी...’ नंतर केवळ पुलंच्या पत्नी म्हणून नव्हे तर एक उत्तम सिद्धहस्त लेखिका म्हणून साहित्यविश्वाला समजल्या. पु.लंच्या जडणघडणीतही त्यांचा वाटा मोठा आहे. आम्हा वाचकांना पु.ल. आणि सुनिताबाई त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातुन आणि थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या आठवणीतून उमजले, भावले.

जननायक प्रभू राम अभ्युदय कादंबरीचे महानायक

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 06/10/2009 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
जननायक प्रभू राम शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हजारो वर्षांच्या कालप्रवाहात या कथेला अनेक रंगांचे वेष्टण लाभले.

'नोकरशाई' च्या निमित्ताने

लेखक विनायक पाचलग यांनी शनिवार, 26/09/2009 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
नोक्रशाईचे रंग या पुस्तकाच्या अनुषंगाने केलेले एक मुक्तचिंतन. ''नोकरशाही व्यवस्था'' नाव घेतल्यावरच दचकलात ना!" आता कोणती नवी गडबड! "अशीच तुमचा प्रतिक्रिया असणार, अगदी बरोबर आहे. सर्वसामान्यांना नको वाटणारी अशीच ही व्यवस्था . ती सरकारी ऑफिसेस, गर्दी, ते कधीतरीच भेटणारे साहेबलोक! चहापाणी ,अग आई ग!आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेबलाखालची देवाण-घेवाण. थोडक्यात काय, तर लोकांना त्राही त्राही करून सोडणारी एक व्यवस्था आणि त्याचबरोबर मेंदूत अगदी नकळतपणे कुठेतरी उमटणारा 'नको रे बाबा!' चा सूर! खरे ना? सर्वसामान्य माणसांच्या डोक्यात साधारणत: हेच चित्र उभे राहणार, आणि राहिलेच पाहिजे म्हणा!

एक पुस्तक वाचताना...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 20/09/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आंतरजालावरच एका नव्या संवादाला सुरवात झाली होती. मैत्रीच्या वाटेवरची ती पहिली पावलं. अडखळती. स्वाभाविकच चर्चेचा विषय वाचन, श्रवण, दर्शन या गोष्टींचाच. एका प्रश्नाच्या उत्तरात या मित्रानं त्याच्या वाचनाची यादी सहज समोर ठेवली. मोठी. माझं वाचन खूपच कमी. मग आवडलेल्या पुस्तकांचा विषय निघाला. त्या चर्चेतच उल्लेख झाला 'व्यासपर्व'चा. दुर्गाबाईंचं हे पुस्तक आपल्याकडं होतं हे आठवून गेलं. आपल्या संग्रहातील काही, बर्‍याच किंवा अनेक पुस्तकांचं जे होतं तेच या पुस्तकाचंही झालं होतं. ते कपाटातून गायब होतं. ते गायब झाल्याचं आधीही ठाऊक होतंच.