आधी सहन करता येत नसे, पण आता सवयच झालीय. भारतात एक अब्ज माणसे आहेत. त्यातले निदान पन्नास-साठ कोटी तरी पुरुष असणारच. त्यातले दहा-वीस कोटी वजा केले, तरी तीस-चाळीस कोटी माणसे तरी रोज येता-जाता रस्त्यावर थुंकत असतात. कोणाच्या थुंकीत कफ असतो, कोणाच्या थुंकीत तंबाखू, पान मसाला, तर कोणाच्या थुंकीत सगळ्याचं एकत्रित मिश्रण!
मी रोज कॉलेजला जाण्यासाठी बोरीवलीवरुन ट्रेन पकडतो. किती वाजता कुठे जाणारी ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्म ऐवजी कोणत्या प्लॅटफॉर्मवर किती मिनीटांनी उशिरा येणार आहे हे सांगितल्यावर किंवा सांगायच्या आधी "" यात्रीयोंसें निवेदन है कि वे कृपया इधर उधर ना थुंके. थुंकनेसे बिमारी फैलती है.