Skip to main content

राहणी

रांगोळी

लेखक मृत्युन्जय यांनी गुरुवार, 14/10/2010 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
शेणाने सारवलेले आंगण मागे पडुन त्याची जागा जशी विटा सिमेंटने घडलेल्या फरश्यांनी घेतली आणि ऐसपैस घराची जागा फ्लॅटने घेतली तसतशी रांगोळी हळुहळु लुप्त होत चालली आहे. तरी अजुनही काही गृहिणी (आणि काही बाप्येसुद्धा) ही कला टिकवुन आहेत. कामचलाउ का होइना रांगोळी प्रत्येक घरात कोणा ना कोणाल येत असतेच. अगदीच काही नाही तर छाप वापरुन वेळप्रसंगी वेळ निभावुन नेली जाते. रांगोळीचे प्रकारही तसे अनेक ठिपक्यांची रांगोळी, फुलांची रांगोळी, नक्षी, अक्षरभारती, फ्रीहँड, प्रसारभारती. आता तर पाण्यात रांगोळी काढण्याचे तंत्र आणि कलादेखील विकसित झाली आहे. सर्वांनाच सर्व प्रकारची रांगोळी काढता येइलच असे नाही.

अघटीत!!

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 12/10/2010 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुनी चांगली मैत्रीण, कॉलेजमधे एकदम बब्ली गर्ल, एकदम एंथु, अस्खलीत ईंग्रजी बोलणरी, जगाची माहिती असणारी, सुंदर, चुलबुली, सर्वांना ती खुप आवडयची, मनमोकळा स्वभाव, हसत खेळत रहाणारी एक गोड मुलगी. लग्न झाल्यानंतर बरेच दिवस टच मधे नव्हती.. गेले बरेच दिवस अचानक अचानक खुपच सोशल झाली.. मला शंका आली.. पण म्हंटल की असेल बुवा. कधी कधी ऑनलाईन यायची.. खुप विनोद करायची. आणि विनोदाची अपेक्षा ठेवायची. मला वाटलं काहीतरी चुकतय. मध्यंतरी एका मिपा सदस्याच्या कार्यक्रमाला तिला बोलावलं होतं, काही कारण काढुन तिने टाळलं. पुन्हा बरेच दिवस गेले, मग अचानक फिलॉसॉफिकल कोट्स, वेगवेगळे स्टेटसेस.

मिपाकरांसाठी खुषखबर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 11/10/2010 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच आम्ही केलेल्या पहाणीनुसार अनेक नवोदित मिपालेखक व त्याचबरोबर काही जुने माननीय पण लेखक म्हणुन दुर्लक्षीत असलेले जेष्ठ मिपासदस्य अनेक अडचणींना तोंड देत आहेत. सर्वात महत्वाची अडचण म्हणजे त्यांनी केलेले लेखन साधारण २०/२५ मिनिटातच दुसर्‍या पानाच्या दिशेने प्रवास चालु करते. अशावेळी सतत ऑफिसचे काम / बॉसची नजर / इतर कामे / प्रवास अशा अनंत अडचणीतुन मार्ग काढून त्यांना लॉग-इन होउन आपला धागा पुन्हा वर आणावा लागतो. बर्‍याचदा तर धाग्यावर एकही प्रतिक्रीया आलेली नसल्याने प्रतिक्रीयेला उत्तर म्हणुन अथवा धन्यवाद म्हणुन देखील धागा वर न काढता येण्याची अडचण उदभवते, प्रतिसादासाठी टाहो फोडावा लागतो.

जमीन का पाणी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 08/10/2010 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
"जमीन का पाणी" हा खेळ कोण खेळत नाही लहानपणी? पण गंमत म्हणजे आपल्याही नकळत हा खेळ मोठेपणीदेखील चालूच रहातो. भावनेच्या भरात वाहून जाऊन एखाद्या निर्णयाप्रत यायचं की थंड डोक्याने निर्णय घ्यायचा हा तो खेळ. पैकी या "डाऊन टू अर्थ" - जमीनीवरच्या लोकांच्या आम्हा पाण्यातील लोकांना खूप हेवा वाटतो. हे ना निराशेच्या भोवर्‍यात गटांगळ्या खातात .....

आम्हीही पाणी वाहून आणतो !!!

लेखक लतिका धुमाळे यांनी गुरुवार, 07/10/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीत आल्यावर माझ्या लक्क्षात एक गोष्ट आली , ईथे गाड्यानची डिकी मोठी असते. त्यात खूप सामान मावते. डिकी उघडली की त्यात बाटल्यान्चे क्रेट्स दिसायचे, सुरवातीला मला वाटले बियरच्या , फळाच्या रसाच्या नाहितर वाईनच्या बातल्या असतील. पण लक्क्षपूर्वक बघितल्यावर लक्क्षात आले की पाण्याच्या बाटल्या जास्त असतात. गाडी कोणतीही असूदे , मर्सडीज, बीएमड्ब्ल्यू , कोणतीही , प्रत्येकजण गाडीतून पाणी वाहून नेत असतो. निरनिराळी पेय मिळणारी मोठी मोठी दुकाने असतात, त्या समोर किमती गाडयात पाण्याच्या बाटल्यान्चे क्रेट्स ठेवताना मी कितीतरी लोक पाहिले आहेत.

अकलेचे तारे आणि जावईशोध

लेखक भाऊ पाटील यांनी मंगळवार, 05/10/2010 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
सुमार काँग्रेस्करांनी त्यांच्या आजच्या अग्रलेखात राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेवरुन (काहीच्या )काही तारे तोडलेत आणि जावईशोध लावलेत. त्याची उदाहरणे: १) राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा भरवल्याने रोजगारनिर्मितीतही आपण जी भरारी मारली आहे, ती लक्षात घ्यायला हवी. ‘असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया’ने या संदर्भात दिलेली आकडेवारी पुष्कळच बोलकी आहे. देशांतर्गत उत्पादनात वाढ होऊन ते एक लाख सतरा हजार कोटी रूपयांवरून एक लाख पंचाहत्तर हजार कोटी रूपयांवर पोहोचणार आहे.

महागाईगीत: कसली भाजी करू मी आज

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 01/10/2010 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
महागाईगीत: कसली भाजी करू मी आज
अहो काही सुचेना मला रोजरोज कसली भाजी करू मी आज ||धृ|| दोडके गिलके भेंडी मटार शेवगा भोपळा वाल गवार सार्‍यांनीच मार्केटात संप केला आज कसली भाजी करू मी आज ||१|| बटाटे आणले सगळेच संपले फ्रिजमध्ये टोमॅटो काहीच न उरले काय!
काव्यरस