या आधीच्या काही आठवणी : मी चित्रकार कसा बनलो... काही आठवणी :
http://misalpav.com/node/18587
आमचे सक्सेना सर त्यांच्या तरुणपणी सहा महिने मांडूगडावर (मांडवचा किल्ला) जाउन राहिले होते, त्यांची त्याकाळची तिथली अद्भुत निसर्गचित्रे आजही मला आठवतात. ती बघून आम्ही तीन मित्रांनी मांडवला जायचे ठरवले. छप्पन मैलांचा प्रवास सायकलने सहज पार पडला. वाटेत खेडूत वा आदिवासींचे घोळके दिसले, की थांबून स्केचेस करायचो (सुमारे १९७० साली)
रात्रीच्या सुमारास मांडव ला पोचल्यावर तिथल्या राम मंदिराच्या ओट्यावर झोपी गेलो.... रात्री भयंकर थंडी पडली, आम्ही पांघरुणे वगैरे काहीच आणली नव्हती...