मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवास

ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी!!!!!!!!!

स्मिता दत्ता ·
ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी!!!!!!!!! ताडोबाचं जंगल आणि टायगर सफारी करायची खूप वर्षांपासून इच्छा होती. एक तर महाराष्ट्राचं टोक असलेला चंद्रपूर जिल्हा पहावा असं मनात होतच त्याचबरोबर ते जंगल, तिथले जनजीवन सारं पाहयाची इच्छा होती त्यामुळे जेव्हा माझी मैत्रीण विनयाने ताडोबा च्या सफारीचं आयोजन संदीप आणि रसिका करतायेत तू येणार का विचारल्यावर लगेच नाव दिलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रवासाची तयारी केली आणि नागपूरला जायला निघालो. संध्याकाळी साडेपाचची ट्रेन सकाळी नऊच्या दरम्यान नागपूरला पोचणार होती आणि तिथून दोन तीन तासाचा ताडोबाचा रस्ता. ट्रेन साडेपाच वाजता पुण्याहून निघाली.

जुन्नर भटकंती -२

Bhakti ·
जुन्नर भटकंती-१ पहिल्या भटकंतीतच मी नाणेघाटला पावसाळ्यात परत येण्याचं ठरवलं होतं. सकाळच्या शांत गारव्यात जुन्नरकडे निघालो.आता रस्ता ओळखीचा झालायं.जुन्नरच्या जवळ आल्यावर मोठमोठ्या केळीच्या बागा आणि दुरच्या हिरव्या डोंगरांवर पसरलेली धुक्याची साय आनंदाची ग्वाही देत होती. साधारण आठ वाजता जुन्नरला पोहचलो.पोटात इंधन भरून समोर भव्यतेची साद देणार्या शिवनेरीकडे कूच केले.मोगल,सुलतानी, निजामशाही या संकटांच्या हलकळ्ळोलात रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान! यावर जाणार्या दोन वाटांपैकी अर्थातच सात दरवाज्यांची सो

आशियामधला सर्वात तरुण राजवाडा

पराग१२२६३ ·
उमेद भवन स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत.

पावसाळी भटकंती - कमळगड

प्रसाद गोडबोले ·
मिपाकरांसोबत पावसाळी भटकंती - कमळगड मिपाकरांसोबत आता भटकंतीचे योग जुळुन येणे दुर्मिळ होत चालले आहे . बहुतांश लोकं आपापल्या व्यापात , संसारात मग्न आहेत , काहींची वयं झाली , काही राज्याबाहेर गेले , काही देशाबाहेर गेले , काही मनाबाहेर गेले. त्यामुळे आता जास्त फिरणं होत नाही , झालं तरी लिहिणं होत नाही . लिहिलं तरी कधी काय सेन्सॉर केले जाईल ह्याची शाश्वती नाही . प्रवासवर्णन भटकंती वगैरे तर नाहीच नाही ! बाकी माझं आपलं एक वैयक्तिक मत आहे की भटकंती किंव्वा प्रवासवर्णन कसं असलं पाहिजे की आपलं लेखन वाचुन , फोटो पाहुन इतरांना वाटलं पाहिजे की यार हा ट्रेक करायला हवा , ह्या ग्रुप सोबत आपण जायला हवं .

मदत हवी आहे - दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे राहण्यास जागा

Trump ·
दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे पर्यटनासाठी जायचे योजत आहेत. सदर प्रवास हा हिप्पी आणि कमनियोजीत (कमीत कमी नियोजीत), कमीत कमी खर्चात अशा प्रकारचा करायचा आहे. त्यामुळे हॉटेल हा शेवटचा पर्याय आहे. कृपया राहण्यासाठी ठिकाणे सुचवा. १. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपासुन जवळ असावे. २. जेवण स्वतः बनवण्याची मोकळीक असावी. ३. ठिकाण सुरक्षित असावे, मालक प्रामाणिक असावा. दिलेले कपडे, बिछाणे, भांडी स्वच्छ असावीत. आपत्कालीन व्यवस्था असावी. ४. जवळ तयार जेवणाची व्यवस्था असावी, गरज पडल्या विकत घेता येईल. किराणा मालाचे दुकान जवळ असावे. ५. भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. ६.

ही वारी चुकायची नाय

Avinash Anushe ·
सालाबादा प्रमाणे यावर्षीही IAS (Indo Athletic Society) ची सायकल वारीची तयारी लवकरच सुरू झाली. यावर्षी ठरवले होते की चांगला सराव करून वारी चांगल्या वेगात पूर्ण करायची आणि परंतु लांब पल्याची राईड करणे काही शक्य झाले नाही आणि एक महिना आधी हाताला इजा झाली व सायकल चालवू शकलो नाही आणि रेकी राईडलाही जाता आलं नाही. मग शेवटी ठरवलं की यावर्षी मुख्य वारीच्या राईड मध्ये सगळ्यांबरोबर सहभागी होऊया.

पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे

पराग१२२६३ ·
pune पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.

एक सहल: मणिपूर धुमसत नव्हते तेव्हा..

चलत मुसाफिर ·
जानेवारी 2022मध्ये ऐन थंडीच्या कडाक्यात आम्ही मणिपूर राज्याची एक छोटेखानी, चार दिवसीय, रोमांचक रस्ता सहल स्वतःच्या चतुष्चक्रीने केली होती. इंफाळ, लोकटाक व मोरे या ठिकाणी भेट दिली होती व इंफाळमध्ये एका उच्यमध्यमवर्गीय मैती कुटुंबाने चालवलेल्या airbnbमधे राहिलो होतो. मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात उफाळलेला कुकी- मैती संघर्ष हिंसेच्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या वाचून ती सहल पून्हा आठवली. या दुव्यावर इथे माझ्या ब्लॉगवर या सहलीचा प्रकाशचित्र वृत्तांत आहे. इंग्रजीत असला तरी समजण्यास कठीण जाऊ नये. https://chalatmusafir.wordpress.com/2022/01/17/imphal-good-things-come-to-those-who-drive/ धन्यवाद.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

पराग१२२६३ ·
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.