Thrills on wheels
Thrills on wheels
(Thane - Statue of Unity - Thane)
पहिला टप्पा
प्रवासाचा पहिला टप्पा अर्थात चॅलेंज होत ते म्हणजे चिपळूण - ठाणे प्रवास. याआधी फक्त शेजारच्या सीट वर बसून प्रवास केलेला. आता स्वतः गाडी चालवत जायचं होत. जमेल की नाही? नाही जमलं तर काय? अशी घालमेल चालू होती. गाडी मध्येच पंक्चर झाली तर? निदान थिअरी तरी माहिती आहे. प्रॅक्टिकलची कधी वेळ आली नाही त्यामुळे जरा धाकधूक होती. परत एकदा रिविजन करून घेतली.
घरातल्या मोठ्यांना नमस्कार करून ७ वाजता निघालो. तशी या रस्त्याला गर्दी कमी होती त्यामुळे तिथे कुठेच काही त्रास झाला नाही. खेड क्रॉस करून कशेडी घाट लागला.
मिसळपाव
त्या घटनेला यंदा 11 वर्ष पूर्ण होत आहेत. तीन दिवस आधीच स्वप्नपूर्तीचा एक अनुभव आला होताच, आता स्वप्नपूर्तीचा आणखी एक दिवस उजाडला होता. त्या दिवशी सकाळपासूनच उत्साहित वाटत होतं. अधूनमधून भावूकही व्हायला होत होतं.
यावेळी प्रत्यक्ष खंडाळ्याच्या घाटामध्ये वेळ काढायचा असं ठरवलं होतं. अचानक निघालो आणि पटकन शिवाजीनगर गाठलं. खंडाळ्यापर्यंत जायचं असल्यामुळं सकाळच्या शेवटच्या लोकलशिवाय पर्याय नव्हता. सध्या लवकर अंधार होत असल्यामुळं दुपारची लोकल पकडून खंडाळ्याला पोहोचणं सोयीचं वाटत नव्हतं.
यंदाच्या दिवाळीच्या निमित्तानं मुंबईमधल्या भायखळा रेल्वेस्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीविषयीचा हा विशेष लेख.
दररोज मुंबई-पुणे-मुंबई अशा फेऱ्या मारून सुमारे 3,000 प्रवाशांची ने-आण करत असली तरी तिच्या कारकिर्दीची दखल क्वचितच कोणी घेतली असेल. इतकंच काय तिचा वाढदिवसही कधी असतो, हेसुद्धा कुणाला माहीत नाही. त्यासंबंधीचा अधिकृत पुरावाही सापडत नाही. दख्खनच्या राणीच्या अगदी उलट परिस्थिती आहे ही सगळी.