Skip to main content

प्रवास

एक सहल: मणिपूर धुमसत नव्हते तेव्हा..

लेखक चलत मुसाफिर यांनी गुरुवार, 11/05/2023 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
जानेवारी 2022मध्ये ऐन थंडीच्या कडाक्यात आम्ही मणिपूर राज्याची एक छोटेखानी, चार दिवसीय, रोमांचक रस्ता सहल स्वतःच्या चतुष्चक्रीने केली होती. इंफाळ, लोकटाक व मोरे या ठिकाणी भेट दिली होती व इंफाळमध्ये एका उच्यमध्यमवर्गीय मैती कुटुंबाने चालवलेल्या airbnbमधे राहिलो होतो. मणिपूरमध्ये गेल्या आठवड्यात उफाळलेला कुकी- मैती संघर्ष हिंसेच्या अस्वस्थ करणाऱ्या बातम्या वाचून ती सहल पून्हा आठवली. या दुव्यावर इथे माझ्या ब्लॉगवर या सहलीचा प्रकाशचित्र वृत्तांत आहे. इंग्रजीत असला तरी समजण्यास कठीण जाऊ नये.

बेलग्रेडचा जुना राजप्रासाद

लेखक पराग१२२६३ यांनी सोमवार, 03/04/2023 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझे आजोबा नोकरीच्या निमित्ताने 60 वर्षांपूर्वी तत्कालीन युगोस्लाव्हियाची राजधानी असलेल्या बेलग्रेडमध्ये काही वर्ष राहत होते. त्यामुळं माझ्या आजी-आजोबांकडून आणि माझ्या आईकडून युगोस्लाव्हियाविषयी मी बरंच ऐकत आलो आहे. बेलग्रेड शहर आणि युगोस्लाव्ह जनतेबद्दल ते कायमच भरभरून सांगत आले आहेत. त्या काळात भारत आणि युगोस्लाव्हियाचे संबंध अतिशय घनिष्ठ होते. त्यामुळं सामान्य युगोस्लाव्ह जनतेमध्ये भारत-भारतीयांविषयी अतिशय उत्सुकता आणि आदर असल्याचं त्यांना त्यांच्या वास्तव्यात जाणवत होतं.

Thrills on Wheels - चौथा टप्पा

लेखक मालविका यांनी गुरुवार, 23/02/2023 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
Thrills on Wheels ( Thane - Statue of Unity - Thane) चौथा टप्पा २६ जानेवारी. आजपासून परतीचा प्रवास सुरू. येताना जेव्हढे रिलॅक्स होतो त्यापेक्षा जरा काळजीत होतो. काळजी एवढ्याचसाठी की आलो तेव्हा कुठे थांबणार हे पक्क होत, हॉटेल बुक केलेली होती. आता आम्ही आमचा अंदाज घेवून त्यातल्या त्यात मोठ्या शहरात जाऊन मग तिथे हॉटेल बघून राहणार होतो. त्यामुळे वेळेत निघणं, वेळेत पोहोचणं गरजेचं होत. सुरवातीला अंकलेश्र्वर नक्कीच होत. निघालो आणि केवडियाचा परिसर सोडला नि मस्त टेल विंड्स लागले. इतके दिवस एकही BRM ला या टेल विंडस नी साथ दिली नव्हती.

Thrills on Wheels तिसरा टप्पा

लेखक मालविका यांनी सोमवार, 20/02/2023 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
Thrills on Wheels ( Thane - Statue of Unity - Thane) तिसरा टप्पा २३ तारखेला साधारण तीन वाजता हॉटेल वर पोहोचलो. उरलेला वेळ अजिबात फुकट घालवायचा नव्हता. निवांतपणे तयार होऊन हॉटेल मधून नंबर घेवून एक रिक्षा बोलावली. आणि आम्ही गरुडेश्वरला गेलो. साधारण ५ किमी वर आहे गरुडेश्वर. १० मिनिटात तिथे पोहोचलो. छान दर्शन झालं. नर्मदा नदी किनाऱ्यावर जाण्यासाठी मोठ्या मोठ्या पायऱ्यांचा घाट बांधला आहे. डावीकडे धरणावरून येणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह आहे. अतिशय सुंदर असं ते दृश्य होत. घाट उतरून पाण्यात पाय बुडवून घेतले. मैयाला मनोभावे नमस्कार केला. तिचे आशीर्वाद घेतले. मन भरून आल. सूर्यास्त होत होता.

नर्मदे हर , /;/ .

लेखक विअर्ड विक्स यांनी रविवार, 19/02/2023 18:37 या दिवशी प्रकाशित केले.
लेख वाचण्यागोदर पूर्वसूचना - हा लेख १० दिवसीय नर्मदा पदपरिक्रमेच्या (परिभ्रमणाच्या) अनुभव कथनावर आधारीत आहे. पूर्वपीठिका - मला दुर्गभ्रमणाची आवड आहे , याच आवडीमुळे माझ्या अनेक ठिकाणी पदभ्रमण मोहीमा झाल्या आहेत.माझ्या भावाने जेव्हा नर्मदा परिक्रमेसाठी मला विचारले, त्या क्षणी माझी पाटी कोरी होती.सहसा भ्रमण मोहिमेसाठी कोणी विचारले असता , मला थोडी फार त्या ठिकाणाबद्दल कल्पना असते. पण या वेळी स्थिती वेगळी होती, त्यामुळे या परिक्रमेबद्दल सौं ना विचारले , त्यांनी " नर्मदे हर हर" हे पुस्तक वाचलेले असल्याने मला जाण्याचा सल्ला दिला.

Thrills on Wheels दुसरा टप्पा

लेखक मालविका यांनी रविवार, 12/02/2023 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
Thrills on wheels ( Thane - Statue of Unity - Thane) दुसरा टप्पा सकाळी ५ वाजता उठून तयार होऊन सायकल खाली घेवून आलो नि बॅग सायकलला जोडल्या. माझी मैत्रीण कांचनचा नवरा सूरज सायकलिस्ट आहे. तो आम्हाला ठाण्याहून अहमदाबाद हाय वे पर्यंत सोबत करणार होता. बरोबर ६ वाजता तो हजर झाला.ठाण्याचे एक एक रस्ते पार करत घोडबंदरच्या चढाला लागलो. सुदैवाने अजिबात ट्रॅफिक नसल्याने आणि सकाळच्या फ्रेश मूड मध्ये चढ चढून उतार एकदम मस्त उतरलो. काशिमीरा जंक्शन ला उजवीकडे वळून अहमदाबाद हाय वे ला लागलो. साधारण ३० किमी झाले होते. एके ठिकाणी चहा प्यायला आणि फोटो काढून सूरज आम्हाला बाय करून पाठी फिरला.

वाई ते पुणे

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 11/02/2023 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
अलिकडेच एके दिवशी पाचगणीला गेलो होतो. बऱ्याच वर्षांनी पाचगणी, वाईला भेट देत असल्यामुळं गेल्या वेळेपेक्षा आता तिथं बदललेलं बरंच काही दिसत होतं. पाचगणीची भेट आटपून पुण्याला परत येण्यासाठी सकाळी निघालो. पाचगणीच्या एसटी स्थानकात पोहचल्यावर पुण्याच्या बसला वेळ आहे समजलं. त्यामुळं समोर उभ्या असलेल्या वाईच्या बसमध्ये आम्ही बसलो. वाईला पोहचल्यावर काही वेळानं पोलादपूर-स्वारगेट बस आम्हाला मिळाली. पोलादपूर ते स्वारगेट बस कोणत्या मार्गावरून जाते, हे पाहिल्यावर असा पूर्ण प्रवास एकदा करावा असं वाटू लागलं. बसच्या फलकावर पोलादपूर-महाबळेश्वर-पाचगणी-वाई-खंडाळा-शिरवळ-स्वारगेट असे लिहिलेलं होतं.