जुन्नर भटकंती-१
तसा घरून निघायला उशीरच झाला.राष्ट्रीय महामार्ग ६१ ला पोहचलो.हा रस्ता खुप चांगला असल्याने या मार्गाचे प्रवास आवडतात.पिवळ्या फुलांनी बहरलेल्या मार्गांना मागे टाकत जुन्नरच्या दिशेने निघालो.
जुन्नर सुरू होताच खोडद गावातील रेडिओ दुर्बीण दुरुन नजरेस पडते.१९९० साली पुणे जिल्ह्यातील खोडद(ता.जुन्नर) गावात मीटर तरंगलांबीची महाकाय रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली.
कित्येक दिवसांपासून नाणेघाट पाहायची इच्छा फलद्रूप होणार होती.सातवाहन काळातील मार्ग जो डोंगर फोडून व्यापारासाठी अंदाजे इसपु.२३०ला बनवला गेला(इतरत्र वाचलेल्या माहितीनुसार)
नाणेघाटाला पोहचल्यावर पहिल्यांदा जो रांजण दिसला ज्याचा वापर त्याकाळी वाटसरुच्या पाण्यासाठी केला जात.या अशा पुरातन वस्तूंना स्पर्श करताच काळाचे कंकण गळून पडतात,काळ हा खरा नसुन जीवन जगणं हे मापक आहे असं काहीतरी वाटतं.
जुन्नर मार्गे आल्याने नाणेघाटाच्या शिखरावर होतो.एक चिंचोळी दरी, खाली उतरण्यास पावसाच्या पाण्याने गुळगुळीत झालेल्या पायर्या . जरा भीतीच वाटत होती.१५ मिनिटांत डावीकडे एक सातवाहन काळातील गुहा खोदलेली आहे.ज्यात ब्राम्ही लिपीतील सातवाहन कुळाचा गौरव असलेले शिलालेख आढळतो.मार्ग जरा कठीणच वाटला .घोडे कसे दरीतून चढत उतरत असतील याच आश्चर्य वाटले.
तसेच पाणतेरडा,कोळसुंद आणखिन एका पर्पल फुलांचे सौंदर्य नव्याने पहिले.
जरा निवांत त्या ऐतिहासिक पायर्यांवर बसून उगाच सार्थक, अभिमान काय काय वाटून गेले.तिथून परत येताना.जीवधन ,चावंड , शिवनेरी किल्ले वाटेत दिसले पुढच्या जुन्नर भेटीत यांचाच मागोवा घेण्याचे ठरवले.
पुढे गिरिजात्मक गणेशाचे-लेण्याद्री लेणींसमुहाकडे निघालो.
वाटेत चमचमत्या सोनेरी भातशातांनी मन सोनमय झालं.तिथल्या काळ्या आईच्या कुशीत डोलणार्या तांदळाच्या ओंब्यांना डोळेभरून पाहिले,स्पर्श केले, अन्नदाता सुखी भव !
आजुबाजुला असणार्या सह्याद्रीच्या उंचच डोंगराच्या हिरव्या कुशीतून लेण्याद्रीला पोहचलो.माझ्या कन्येचे नाव गिरीजा त्यामुळे जागोजागी होटेल गिरीजा, गिरीजा लिंबु सरबत , गिरिजात्मक चहा अशी नावे पाहून स्वारीच्या आश्चर्यमिश्रीत आनंदाला पारावार उरला नाही.
३०० पायर्या असणार्या लेणी समूह चढयला काहीसा दमछाक करणारा,आईचे गुडघे साथ देईना,पण इच्छा शक्ती दांडगी! एक काठी विकत घेऊन हळू हळू ,थांबत बसत येत होती.तेव्हा वाटलं केदारनाथ वगैरे आताच करून घ्यावं ,पुढचं कोणाला माहिती..
मर्कटांची सेनाच सेना सर्वत्र होती.चढणार्यांना मर्कटलिला पाहून अप्रुप वाटत होते.
डोंगरावर लेण्यांचापाशी पोहचलो .उंच कड्यांहून अखंड घरंगळत येणाऱ्या धारांनी गारवा दिला.पहिल्यांदा वरील बाजूस असणाऱ्या गुफेतील गिरीजात्मकाचे दर्शन घेतले.दोन लेण्यांना जोडण्यासाठी याची स्थापना झाली.या लेणीच्या प्रवेशद्वारापुढे उंचच स्तंभ आहेत.स्तंभांच्या वरच्या भागावर गाय,सिंह इत्यादी प्राण्यांचे बैठे स्वरूपातील शिल्प घडविले आहे.पुढे विस्तीर्ण गड रांगा दिमाखात उभ्या दिसतात.
खाली चैत्यगृह लेणी आहे.कार्ला इतर ठिकाणी असलेल्या स्तुपासारखाच येथे पाताळ,वेदिका,त्यावर गोलाकार पृथ्वी,सात हार्मिका स्वर्ग यांची रचना आहे.येथील स्तंभ आणखिन उंच आहेत.त्यावर देखील विविध प्राणी शिल्प दोन दोन जोडीत आहे.एक स्फिंक्स ज्यामध्ये मानवी चेहरा व सिंहाचे धड आहे.ग्रीक संस्कृतीचा त्याकाळचा प्रभाव दिसून येतो.प्रवेशदारातून बाहेर पडतात त्याचा पानाच्या आकाराने लक्ष वेधले.
पुढे आणखिन गुंफा होत्या पण त्याच शिल्पे नसून केवळ मोठ्या आकाराच्या खोल्या होत्या,हे पाहून वेरूळ लेणीची आठवण झाली.आनंदाने पायर्या खाली उतरलो.
पुढे ६-८ किमी.वर असणाऱ्या ओझरकडे निघालो.ओझरचा विघ्नहर , अतिशय स्वच्छ, सुंदर काळ्या दगडांना आधुनिक पोलिश दिलेले मंदिर आहे.गाभारा अतिव प्रसन्न होता . मंदिर परिसरात व बाहेरील उद्यानात अनेक दुर्मिळ वनस्पती /झाडे जपलेली आहेत.नाजूकशा पारिजातकाचा सुगंध मंद दरवळत होता, प्रफुल्लित करत होता.
दर्शन घेऊन बाहेरच्या स्वच्छ निर्मळ तलावाकाठी मावळतीच्या रंगांची उधळण क्षिताजापाशी थंड पाण्यात विसावलेल्या पावलांनी जलधारांच्या आधिन होत अनुभवलेली.
ही छोटेखानी भटकंती चंद्राच्या नाजुकशा मनमोहक कोरीच्या साक्षीने घराच्या दिशेने धावू लागली.
-भक्ती
प्रतिक्रिया
जुन्नर भटकंती-१
छान भटकंती झाली आहे, माझ्या
छानछान फोटो आणि वाहतं लेखन ओढ्यासारखं आवडलं.
छान लिहिलंय, तीनेक
अर्थात तुम्ही लिहिलेल्या त्या
सुरेख!
हो , भातशेती शिवनेरी जवळचीच
तो भातशेतीच्या मागचा मात्र
सुरेख!
व्वा, छान भटकंती वर्णन आणि
धन्यवाद चौको!
सुंदर एकदिवशीय भटकंत
धन्यवाद!मी परत जाणार,मी परत
छान
@तर्कवादी
भक्ती,
मस्त
वाह!
testing photo sharing
@तर्कवादी
धन्यवाद