मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रवास

जुनेरलं नातं...निरोपाची वेळं

कर्नलतपस्वी ·
प्राची ताईच्या कवीता नेहमीच काहीतरी नवीन देऊन जातात. प्रतिपदेची चंद्रकोर बघून काही ओळी सुचल्या होत्या पण पुर्ण नव्हत्या झाल्या त्या आज पुर्ण झाल्यासारख्या वाटतात. जुनेरलं नातं... आभाळीची चंद्रकोर शोभते तुझ्या भाळी तुझ्या पैंजण नादाने आनंदाची मांदियाळी चंद्रकोरीचा गारवा सुखावतो डोळा विचार चांदण्याचा मनी घुमतो पारवा चंद्रकोर झाली बिंब उजळल्या दाही दिशा चंचल मन शिंजीर पालवल्या नव्या आशा जसे नभी सुर्य चंद्र दिनरात अशी साथ कधी तार कधी मंद्र ताल,सुरांचे आर्त साथ कधी सरू नये जुनेरल्यां नात्यावर निरोपाची वेळं कधी येवू नये जुनेरले नाते नियतीचा खेळं एक जायं दिगंताला एक फुपाट्यातं जळं

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har ·
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

रेवदंड्याचं दर्शन

पराग१२२६३ ·
Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

बेलापूरचा किल्ला

गोरगावलेकर ·
सात आठशे वर्षांचा इतिहास असला तरी काहीसा दुर्लक्षित असा नव्या मुंबईतील बेलापूरचा हा किल्ला. नुकताच एका प्रतिसादात मी या किल्ल्याचा उल्लेख केला होता. किल्ला सिद्धींनी १५६० ते १५७० या काळात बांधला. त्यानंतर पोर्तुगिजांनी याचा ताबा घेतला. १७३३/१७३७ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याचा ताबा मिळवला.

इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास

पराग१२२६३ ·
Indrayani at CSMT पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

पराग१२२६३ ·
VB प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

पराग१२२६३ ·
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

देखणं चेन्नई सेंट्रल

पराग१२२६३ ·
MGR Chennai Central पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते.

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३ ·
PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

एक प्रवास.

अमरेंद्र बाहुबली ·
प्रेरणा श्री. मेहेंदळेंचा हा धागा http://misalpav.com/node/51490 काही वेळा आपल्याला प्रवास करायचा असतो पण त्यात काही असे अनुभव येतात की ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. पुढील आयुष्यात आपण या चुका टाळतो. असाच एक प्रवास मी अनुभवला होता. वर्ष नीट लक्षात नाही २०१७ किंवा १८ असावे. त्या काळी मी मध्य प्रदेशात शाजापूर ह्या ठिकाणी नोकरीला होतो. शाजापूर हे इंदोर च्या उत्तरेला १०० किमी वर आहे. मला शाजापूर ते धुळे हा ३५० किमी चा प्रवास करायचा होता. मी ५ वाजेची ड्यूटी संपवून संध्याकाळी बस पकडायला शाजापूर बसस्थानकावर गेलो.