मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता माझी होशील का ?

निरन्जन वहालेकर · · जे न देखे रवी...
काव्यरस
कविता माझी होशील का ? भेटलीस तू अवचित मजला, प्रीतिचा नव वसंत फुलला, प्राजक्त होऊनी वसंतातले, कवनी माझिया बरसशिल का ? कविता माझी होशील का ? रिमझिम रिमझिम पावसातल्या, च्रोरून अपुल्या भेटीगाठी, आठवणीत त्या चिब होऊनी, कवनी ओलेती प्रगटशिल का ? कविता माझी होशील का ? काय जाहले गमे न मजला, आभासे तू ठायी ठायी, आभासांचे गंध होऊनी, कवना गंधित करशिल का ? कविता माझी होशील का ? सांगायचे मज बरेच काही, मनांत तुझिया तसेच विरले, उकलूनीया ती गुपिते सगळी , कवन सांगता करशील का ? निरंजन वहाळेकर

वाचने 2162 वाचनखूण प्रतिक्रिया 4

In reply to by अनामिक

बेसनलाडू गुरुवार, 08/19/2010 - 00:31
शीर्षकावरून अंमळ गोंधळ झाला खरा (कविता, माझी होशील का? असे (न दिलेल्या) विरामचिन्हांसकट वाचले गेले) (मिश्किल)बेसनलाडू