मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मंतरलेली रात्र

सुमित_सौन्देकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
तूज भेटिची ती रात्र, उशीरानेच जरा उगवली आेढीच्या आतूरतेप्रमाणेच, लवकर मावळलीही युगां प्रमाणे जाणवला, वाट बघण्याचा काळ तो त्यातील गंमत काही औरच, असहाय्य तरीही सुखद तो ठरली वेळ, ठरला काळ, ठरले बाकी सारे काही पण ठरतच न्हवते बोलायचे कोणी आणि काय ते माहीत नाही लाटांच्या सानिध्यात, सुरुवात काहीशी अंधुक झाली संगीतमय त्या प्रसंगी मज पूनवेची भरती आली शर्करेसम तूझे ते आेठ, प्रश्नार्थक गुरफटलेले अन नाजूक तूझ्या त्या देही, जणू चंदन पांघरलेले बोलक्या डोळ्यांस तूझ्या पाहूनी, मी मुका बापूडा मुकलो शब्दसखे सोडूनी गेले, अन मी एकटा पडलो तूझ्या चेहरयावरचे, भाव टिपण्यास मी तत्पर जणू चातक मी आकाशी, पावसाच्या थेंबास आतूर जग धूसर धूसर, अन युगे लोटलेली अशी दिर्धायू मीठीची ऊब, मज वेड लावूनी गेली त्या अनाकलनिय भावनांची, मज किंमत कळली नाही परतीच्या वाटेवरती, याची खंत मनाला खाई

वाचने 1065 वाचनखूण प्रतिक्रिया 0