मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रेमकाव्य

प्रेम रंग

तृप्ति २३ ·
प्रेम रंग ही कविता  प्रेमाच्या विविध रंगांवर केली आहे . तुम्हाला ही कविता कशी वाटली हे तुम्ही कंमेंट ने कळवू  शकता.

आठवण

सुमित_सौन्देकर ·
सरसरत्या सरिनी तुझी आठवण यावी रिमझिम पावसात माझ्या सवे तू भिजावी हुरहुर काळजात किती माझ्या ग मनाची तगमग फार होई कशी तुला कळवावी हुरहुर काळजात किती माझ्या ग मनाची तगमग फार होई कशी तुला कळवावी कधी उगवतो दिस तोहि मावळू पाहतो तुला कुशीत ग घेण्या जिव कासाविस होतो झालो मायेला पारखा तुझ्या माझ्या विरहाने दोन शब्दाच्या प्रेमाला आत्ता किती ग बहाने कधी डोळे मिटताहि स्वप्ने तुझीच का यावी किलबीलती पहांट तुझ्या सवेच दिसावी आता ओढ़ या मनाची कशी कुणाला कळावी राती चांदण्या साथीने माझ्या अंगनी तू यावी

प्रपोज डे

अविनाशकुलकर्णी ·
प्रपोज डे ------------- बेसावध,धुंद क्षणी मनात तिचा विचार आला तिच्या आठवणी ने वेडा जीव व्याकुळ झाला * ताटातूट झालेली ,ती तिच्या मार्गाने ,मी माझ्या वॉट्सपले भेटू यात का? संध्याकाळी एखाद्या * भेटणे तर असंभव होते मार्ग निराळे झालेले होते ती मेसेजली भेटू यात संध्याकाळी एखाद्या * मी पण म्हणालो भेटू यात संध्याकाळी एखाद्या माहीत होते, ना तिला वचन पाळणे शक्य होते, ना मला

तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली

खिलजि ·
तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली गंध मनाचा उडाला नभी थेम्ब बनुनी खाली कोसळली तुझी आठवण साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली झिजूनी काय मिळवले, माउली ? चूल मोकळीच राहिली हात जरी असले मदतीस हजार तुझी चव मात्र आतच राहिली उत्तरे न मिळती कोड्याची सर्व दडले या अंतरी मनी साठले भंगार सारे अंगार बनुनी जाळी जीवा ज्वाला जिथे तिथे पोहोचली तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली चूक घडली , क्षमा नाही , अक्षम्य अपराध हा आम्ही काशी नाही दाविली उभी हयात चिंतेत गेली चितेवरी ती लोपली गेली मित्रा, सोडूनि आम्हा कायमची माझी माउली सिद्धेश्वर विलास पाटणकर

सैल नसू दे मिठी जराही!

सत्यजित... ·
अंगांगाची झाली लाही... सैल नसू दे मिठी जराही! मेघामाजी उनाड तडिता तू सागर मी अवखळ सरिता मला वाहू दे तुझ्या प्रवाही... सैल नसू दे मिठी जराही! पदरामधुनी लबाड वारा घिरट्या घालत फिरे भरारा गंध तनुचा दिशांत दाही... सैल नसू दे मिठी जराही!

तो,ती आणि अबोल प्रेम

mr.pandit ·
त्याने 'तुझ्यावर प्रेम आहे' म्हटल तर ती खळखळुन हसते हो किंवा नाही काहीही सांगत नाही फक्त्त् थोडी अबोल होते ती अबोल झाली की त्याच्याही जीवाची तगमग होते त्याची होणारी तगमग पाहुन ती पुन्हा खळखळुन हसते. त्याच्या या प्रेमापुढे नेहमी अस्वस्थ् उदास होते ती तिचही आहे त्याच्यावर प्रेम् पण सांगत नाही ती तिच्या अशा वागण्याने तो ही हतबल निराश होतो आता थांबायला हव आपण अस वाटुनही पुन्हा अडकतो याचा शेवट कसा होईल हे न त्याला माहीत् न् तिलाही पण खुप प्रेम आहे तुझ्यावर हे सांगायचय् कधीचे तिलाही - निखिल १५-०१-२०१८

तुझ्या नाजूक ओठांनी...

सत्यजित... ·
अवेळी मोहरावे तू.. ऋतूंना साद घालावी तुझ्या नाजूक ओठांनी कळ्यांची चुंबने घ्यावी! फुले वेचून मी सारी तुझ्या हातात देताना तुझ्या अलवार स्पर्शांनी मला आलिंगने द्यावी!

कवि बिल्हणाची 'चौरपंचाशिका' - एक शृंगाररसपूर्ण काव्य.

अरविंद कोल्हटकर ·
११व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या 'बिल्हण' ह्या काश्मीरी कवीच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या 'चौरपंचाशिका' ह्या कमीअधिक ५० श्लोकांच्या काव्यामागची कथा अशी आहे. काव्याचा कर्ता एका राजकन्येचा शिक्षक म्हणून कार्यरत असतांना तरुण शिक्षक आणि त्याची शिष्या हे परस्परांवर अनुरक्त झाले आणि कवि गुप्ततेने रात्री आपल्या प्रियशिष्येच्या सहवासामध्ये प्रणयक्रीडा करण्यात घालवू लागला. अनेक रात्री ही गोष्ट गुप्त राहिली पण अखेरीस राजाच्या कानावर ही गोष्ट पडली. संतप्त राजाने अपराधी कवीस मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.

मोह

ज्योति अळवणी ·
मंद धुंद ही हवा... सहवास तुझा हवा हवा.. नितळ कांतीवरील दवातून.. ओघळू दे गंध नवा! पहाट वारा... सरसर काटा.. नयन पुष्पे अर्धोन्मलीत ती.. कोकीळ कंठी माळ अडकली; युगुल कबुतरे मूक होती! मोहक कटीवर घट्ट मिठी अन्.. कुंतलात त्या मन बहकले! नव यौवना तू.. मोहक.. सुंदर.. सूर्य किरणांनाही मोह पडे!