Skip to main content

प्रेमकाव्य

प्रेमाचं गणित

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 10/05/2017 18:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुझं शंकुसारखं धारदार नाक शुभ्रवर्णी दंतमाला अन हसल्यावर उमटणारा गालावरचा पॅराबोला इंटिग्रेशनच्या चिन्हासारखे तुझे लिमिटबद्ध लांबसडक केस डोळ्यांमधले कूटप्रश्न अन देहबोलीचे अॅनालॉग संदेश
काव्यरस

काळाचे गीत

लेखक चांदणे संदीप यांनी मंगळवार, 09/05/2017 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
तूहि नव्हतीस, मीही नव्हतो बघ काळ कसा बदलतो तारे ते जे सदाच असती आपल्या जागी नभात वरती आज मोजण्या जागे कोणी मनात अन् मोगरे माळूनि फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या चर्चा साऱ्या गावकुसाच्या कशी न कळली तू गेलेली नियती अशी उलटलेली पुन्हा भेटलीस का वळणावर? घेऊन कुंकू परके, भांगावर उभय उरातहि ते काही आधीसारखे हलले नाही         तूहि नव्हतीस मीही नव्हतो         पुरते आपण अनोळखी होतो         तू आहेस अन आज मीही         समोरासमोर अगदी, तरीही         त्याच्या हाती सर्व आहे         बघ काळ बदलला

म्हणूनच तर मी घोरत होते

लेखक माहितगार यांनी सोमवार, 17/04/2017 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्री म्हणे तू कुजबूजाट केला पण तेव्हातर मी झोपेत होते मध्यरात्री म्हणे सळसळ थरथारायचे होते माहितीए का पोट माझे थयथयाट करत होते मध्यरात्री म्हणे शांतता भंगून हवी होती म्हणूनच तर मी घोरत होते प्रेर्ना

एक कप तिचा....

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 16/04/2017 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याचा हिशोब साचा एक कप तिचा,एक माझा! दिसायला दोन्ही एकच फ्लेवरंही सारखाच फक्त चाखण्याची रित ज... रा निराळी म्हणूनच.. एक कप तिचा,एक माझा! माझा आधी संपेल, तिचा नंतर चालायचंच हे असं जंतरमंतर! अगदी निरंतर.. त्यातूनच घडते जादू शेवटी टेस्टी... लज्जतदार... सुरंगी पण तरिही.. एक कप तिचा,एक माझा! एकत्र असून थोडं वेगळेपण वेगळं असूनही थोडस्सं एकत्रपण..! तिचं सावधपण माझं अंधळेपण जगण्यातली वागण्यातली गोडी वाढवणारं.. त्याच कारणानी.. एक कप तिचा,एक माझा! गोडिच्या बेरजा, अजाणतेपणी केलेल्या वजा-बाक्या! कधी गुणाकार.. कधी भागाकार परत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या!!! पण गणित तिथेच येऊन थांबतं..

आज तु आठवलीस...

लेखक Pradip kale यांनी गुरुवार, 13/04/2017 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज तु आठवलीस आज तु आठवलीस अन् डोळे अासवांनी ओघळले कधी खंत तर कधी आनंद दोहोंमध्ये बरसत राहीले खंत यासाठी की, मी व्यक्त नाही झालो कधी तुझ्यापाशी गुज करीत राहीलो स्वत:च स्वत:शी भीती नव्हती बोलण्याची, हो भीती नव्हतीच मुळी बोलण्याची भीती होती ती नकाराची, आणि हो कदाचीत संस्कारांचीही अन् आनंदाचे यासाठी की, आठवतात ते क्षण, जेव्हा तु पहीली दिसलीस अन् नसेल तुलाही माहीत कदाचीत, पण हे हृदय घेऊन गेलीस, ताल बिघडले मनाचे, हो तालचं बिघडले मनाचे कारण तु सुरचं घेऊन गेलीस आता आजही शोधत असतो फक्त तुला, कधी मोगर्याच्या गंधात कधी फुलांच्या पाकळ्यात कधी सागराच्या लाटेत कधी चंद्राच्या चांदण्यात तर कधी तार्यांच्या
काव्यरस

कविता

लेखक संदीप-लेले यांनी शुक्रवार, 07/04/2017 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज वाटते एक कविता अशी जन्मावी हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी तू नुकतीच नाहलेली अन ओलेती असावी केस मोकळे, दवबिंदूंनी पापणी मिटावी ऊन कोवळे लेऊन कांती तुझी चमकावी आज वाटते ... अशी पाहुनी तुला, मला अस्फूट स्फुरावी जवळ येउनी तू माझ्या नयनी वाचावी ह्या हृदयीची त्या हृदयी होऊन जावी आज वाटते ... मिठीत माझ्या दिठी तुझी ती अलगद यावी गात्रांमधली थरथर होऊन तू प्रसवावी ओठ टेकता तुझ्याच ओठांतून उमटावी आज वाटते एक कविता अशी जन्मावी हाताने तर नव्हेच आणि ती मी न लिहावी

लाल टांगेवाला

लेखक रासपुतीन यांनी बुधवार, 22/03/2017 12:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, मी वाचलेल्या आणि न वाचलेल्या पुस्तकांची त्यांच्या प्रकारानुसार (आत्मचरित्रे, विनोदी, कादंबरी ई.) गूगल शीट/वर्कशीट/स्प्रेडशीट बनवत आहे. यामध्ये पाहिलेले अन अजून परत पाहण्याची इच्छा असलेले, आवडलेले अन न आवडलेले मराठी/हिंदी/इंग्रजी/तेलगु/कन्नड्/भोजपुरी चित्रपट ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. आवडत्या/नावडत्या डिशेस व होटेल्स ह्यासाठी एक स्वतंत्र स्प्रेडशीट असणार आहे. तसंच केलेला आणि न केलेला व्यायाम सुद्धा प्रकारानुसार (पोहणे/पळणे/सायकलिंग) असा ऍप मधला डाटा एकत्र करत आहे.

"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 20/03/2017 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
"वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले. वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही तब्बल चार वर्षानंतर, पुन:लेखन करून, संवाद, लावण्या आणि प्रसंगात बदल करून, "वगनाट्य - वैरी भेदला अर्थात प्रेमाला सीमा नाही" पुस्तकरूपाने प्रकाशित झाले.

कुणीतरी असावे, कवि:समाधान कदम

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 24/02/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
,,,, ,,, संबंधीत विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळे पर्यंत या धाग्यातील मजकुर वगळला आहे. तसदी बद्दल क्षमस्व. कवि: समाधान कदम कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील नवकवि समाधान कदम यांनी त्यांची कविता २२/२/२०१७ च्या मराठी विकिपीडीया कार्यशाळे दरम्याने त्यांची कविता मराठी विकिपीडियावर प्रकाशित केली होती, मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय परिघात कविता लेखन बसत नसल्यामुळे ती मराठीतून वगळली गेली. ती इथे प्रकाशित केली मराठी विकिपीडियावर जशी आली तशी प्रकाशित केली (उत्तरदायकत्वास नकार लागू)

मला ती आवडायची...... - कवि: राजू पवार

लेखक माहितगार यांनी शुक्रवार, 24/02/2017 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
,,,, ,,, संबंधीत विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळे पर्यंत या धाग्यातील मजकुर वगळला आहे. तसदी बद्दल क्षमस्व. कवि: राजू पवार विद्यार्थी, कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथील विद्यार्थी नवकवि राजू पवार यांनी त्यांची कविता २२/२/२०१७ च्या मराठी विकिपीडीया कार्यशाळे दरम्याने त्यांची कविता मराठी विकिपीडियावर प्रकाशित केली होती, मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय परिघात कविता लेखन बसत नसल्यामुळे ती मराठीतून वगळली गेली. ती इथे प्रकाशित केली मराठी विकिपीडियावर जशी आली तशी प्रकाशित केली (उत्तरदायकत्वास नकार लागू)