मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सैल नसू दे मिठी जराही!

सत्यजित... · · जे न देखे रवी...
अंगांगाची झाली लाही... सैल नसू दे मिठी जराही! मेघामाजी उनाड तडिता तू सागर मी अवखळ सरिता मला वाहू दे तुझ्या प्रवाही... सैल नसू दे मिठी जराही! पदरामधुनी लबाड वारा घिरट्या घालत फिरे भरारा गंध तनुचा दिशांत दाही... सैल नसू दे मिठी जराही! माझ्याशी तर वाद घालते मला नाही,ते तुला सांगते पायामधली पैंजण काही... सैल नसू दे मिठी जराही! रोम-रोम रोमांचित होवू स्पर्शच केवळ स्पर्शच लेवू अधरा दे अधरांची ग्वाही... सैल नसू दे मिठी जराही! चंद्रसरींनी चिंब भिजू दे तुझे चांदणे मनी रूजू दे धरेस दुसरे नकोच काही... सैल नसू दे मिठी जराही! —सत्यजित

वाचने 5756 वाचनखूण प्रतिक्रिया 13

वीणा३ 01/02/2018 - 11:18
एकदम मस्त !!! जामच गोंधळ आहे, मिठी सैल असावी का नसावी कळेना झालाय :P दोन्ही मिठ्या छानच वाटतायत ;)

सत्यजित... 03/02/2018 - 18:47
सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक धन्यवाद!

नाखु 03/02/2018 - 23:14
ये. एक मिठीसी कविता है!!! दै मिपा समाचार वाचनीय रोमांचकारी जुगलबंदी दै मिपासत्ता

सत्यजित... 05/02/2018 - 21:26
स्नेहांकिता,नाखु,राघव मनःपूर्वक धन्यवाद!