"सतीश आळेकर" : डीव्हीडी उद्घाटन
लेखनविषय:
लेखनप्रकार
- Read more about "सतीश आळेकर" : डीव्हीडी उद्घाटन
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
प्रख्यात नाटककार सतीश आळेकर यांच्या नाट्यप्रवासाचा आढावा घेणारी " नाटककार सतीश आळेकर" या नावाची डिवीडी लवकरच प्रकाशित होत आहे. एका प्रतिभावान नाटककाराच्या प्रवासाच्या निमित्ताने, महाराष्ट्रातल्या आणि मराठी भाषेच्या स्वातंत्र्योत्तर काळातल्या बदलत्या सामाजिक आलेखाचे दर्शन या फिल्ममधे घडावे ; या बदलांचा परिणाम लेखकाच्या जडणघडणीवर कसकसा झाला हे आपल्याला यातून पहायला मिळणार आहे.
आळेकरांच्या नाटकातील आशय , भाषा आणि वेगवेगळ्या प्रयोगक्षम घटकांचा आढावा घेतानाच , एकूण मराठी नाटकाच्या परंपरांशी त्यांचे काय नाते आहे तेही या फिल्ममधे पहायला मिळेल.
ज्या माणसाची ही कैफ़ियत तेंडुलकर मांडतात तो त्यांना खरंच भेटला होता आणि त्याचं आयुष्य पाहून त्यांना हे लिहावेसे वाटले....