नमस्कार,
मी या आधी आमच्या खेडे गावात चालणारी नाट्य चळवळ या बाबत आपणाशी बोललो आहे. आमच्या नाटकातील मुलांची कमाई आपणास मी दाखवणार आहे आज अनेक चित्रपटातून आमच्या शाळेची मुले चमकत आहेत आमच गाव म्हणजे बालकलाकारांच गाव अशी आमच्या गावाची ओळाख पुण्या मुंबई मध्ये झाली आहे. आम्ही दोन वर्षा पुर्वी पुणे व मुंबई येथे आमच्या मुलांची नाटके घेऊन गेलो होतो त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आमच्या शाळेतली मुले आज देवराई, बाधा, असला घो हवा मला, गाभ्रिचा पाऊस, प्रतिसाद एक कप चहा या चित्रपटात अभिनय करून गावाचे व शालेचे नाव मोठे केले आहे.झी पुरस्कारासाठी सचिन मोडकर याला नामांकन मिळाले होते.